buldhana:आज दिनांक – 10 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बांग्लादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते
,यामध्ये जास्तीत-जास्त हिंदूंनी सहभागी व्हावे अशी आवाहन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी केले होते.
सदर आव्हानाला प्रतिसाद देत असंख्य हिंदू बांधवांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चासाठी आपली उपस्थिती लावली होती,
buldhana:यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह असंख्य संत,महात्मा,राजकीय नेते तसेच हिंदू समाजातील जागरूक माता-भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमिन शेख शेगाव पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र सह सचिव
अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधि
shegaonnews:संभाजीनगर, दिनांक 9 डिसेंबर रोजी पोलीस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी भाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय दराडे बारामती व अहिल्यानगर पोलीस बॉईज महिला आघाडी सुनिता गुलाटी जामखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बॉईज असोसिएशनची पुढील दिशा ठरवण्यात करिता पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये पोलीस व पोलीस कुटुंबीयांच्या व जनतेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
नवीन सरकार मध्ये स्वतंत्र गृह मंत्री असला पाहिजे मागील शिंदे सरकारने अनेक जातीसाठी वेगवेगळे महामंडळ तयार करण्यात आले त्याच भरतीवर पोलिसांच्या मुलांचीही तुकाराम ओंबळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व बेरोजगार पोलीस पाल्यांना त्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून त्याद्वारे उद्योग धंद्याचे निर्मिती होईल
2013 मध्ये जी पोलीस कर्मचारी पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना तात्काळ पोलीस उपनिरीक्षक पदी देण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या मुलांकरिता वस्तीगृहाची निर्मिती करण्यात यावी.
पोलीस वाल्यांना शैक्षणिक आरक्षण मिळण्यात यावे असे अनेक विषयावर यामध्ये चर्चा करण्यात आली यावेळी संस्थापक रवी वैद्य राष्ट्रीय संघटक माणिक निमसे कोर कमिटी सदस्य गोकुळ दाभाडे प्रदेशाध्यक्ष विकास सुसर प्रदेश सहसचिव प्रमोद खाडे प्रदेश कार्यकारणी सदस्य
shegaonnews:अरुण सदाशिव अरुण दाभाडे उद्योग आघाडीचे दत्तात्रय धोकटे मामा विद्यार्थी आघाडीची सागर बनसोडे युवक आघाडीचे प्रा रवी अंभोरे सुनील पारखे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री दाभाडे शितल खरात वैशाली दवंडे अंजुषा कुलकर्णी संध्या जैन अलका खरात आशा खरात मीना पवार कुसुम हेगडे व जामखेड तालुक्यातून अनुष्का वारे उषा जास भाटी कुंदा गुळवे सुनीता कांबळे देवशाला गुळवे सुशीला गुळवे उषा सदाफुले ज्योती गायकवाड शोभा सुरवसे सोनाली दळवी स्वाती पिसाळ जामखेड तालुकाध्यक्ष अरुण शिरसाठ महादेव रसाळ सुधीर साठे आनंद कोळपकर विनोद परदेशी सचिन बकरे खंडू कांबळे संजय गोरे दिलीप देशमुख भगवान नागरगोजे अशितोष दराडे शेख कैसर प्रवीण मोरे हे सर्व बैठकीत उपस्थित होते
Hingnghat:हिंगणघाट;- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू है असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील येळी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी (सेवा) वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो, तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे.
वना, वर्धा नदीवर असलेले जवळ जवळ सर्व वाळू घाट या रेती डेपोला जोडले आहेत. मात्र या डेपोवर रेती न टाकता है डेपो धारक नदीत अनधिकृत रित्या पोकलॅन्ड मशीन, यांत्रिकी बोट लाऊन टिप्पर च्या माध्यमातून नदीपात्रातून २४ तास थेट विक्री करत असून शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवीत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कार्यालया पुढून देखील सर्रास २४ तास आणि देखत वाळू भरलेल्या गाड्या घेऊन जातात. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि हि ग्रुप पणे विक्री केली जात आहे.
यामुळे शासनाने या सर्व वाळू डेपो वरील व वाळू घाटावरील व्हिडिओ रेकोर्डिंग आम्हाला घ्यावी तसेच या सर्व अनधिकृत वाळू तस्करीवर कुठल्या पद्धतीने कारवाई करणार या बाबत आमच्याशी चर्चा करावी. या संपूर्ण वाळू डेपो आडून एकही गाडी वाळू चोरी आम्ही करू देणार नाहीत. वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. नियमानुसार वाळू घाटात जाणार्या डेपो धारकांच्या गाड्याची यादी व जीपिएस ट्रकर नंबर आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावे.
रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाहीत. शासन रेती तस्कारीवर आळा लावण्यात असमर्थ ठरल्यास रस्त्यावर उतरून मोठ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल तसेच विधानभवनात या बाबत प्रश्न उपस्थित केला जाईल असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, कृषि सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे,
Hingnghat:समाजसेवक सुनिल डोंगरे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,श्रीकांत भगत,माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार,अमोल बोरकर,विजय तामगाडगे,राजेश भाईमारे,सिंदी रेल्वे युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, हिंगणघाट तालुका युवक अध्यक्ष राहुल वानखेडे,सुनिल भुते,महादेव वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, उमेश नेवारे,अनिल लांबट, अजय पर्बत,मनोज मुरार, आशिष जाधव, नितीन भुते, सिद्धार्थ मस्के,प्रवीण कलोडे,संदीप सोनटक्के, गजानन महाकाळकर,विष्णू वाघमारे,करीम खान, सुनिल घोडखाडे, प्रवीण भुते,विशाल घोडे,सुशील घोडे, विपुल थुल,राहुल जाधव,आकाश हूरले, दौलत येलगुंडे, खुशाल चौधरी, विशाल माथनकर,नंदू काळे, कुणाल गोल्हर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Hingnghat:तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक हनुमान वार्ड मधील हनुमान मंदिरात ह. भ.प. राजा महाराज शेंडे ,ह.ब.प दिलीपराव डहाके ह भ प मोहन महाराज गंडाईत यांचे हस्ते श्री संताजी महाराज यांचे पालखीचे पूजन करण्यात आले.
या नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात भजनी मंडळ, लेझीम पथक प्रमुख आकर्षण ठरले. श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य झाकी सुद्धा प्रमुख आकर्षण ठरले.
ढोल ताशा व बॅण्ड पथकाचे निनादात ,भगव्या पताकासह श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयघोष करीत निघालेल्या शोभा यात्रेत शेकडो समाज बांधव व महिला सहभागी होत्या.या शोभायात्रेचेशहरातील प्रमुख चौकात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.
नागरिकांनी ठिकठिकाणी संताजीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. हिंगणघाट प्रांतीय तैलिक महासंघाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाणी व सरबत वाटप करण्यात आले. ही शोभायात्रा विठोबा चौक, कारंजा चौक, विनायक चौधरी चौक, आंबेडकर चौक मार्गे स्थानिक हरिओम सभागृह येथे भागवताचार्य ह भ प श्री गजानन महाराज कपिले आणि संच यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर कथेची व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते यावेळी काल्याच्या कीर्तनाने शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
Hingnghat:उपस्थित मान्यवरांनी संताजींच्या जीवनावर प्रकाश टाकून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजना करीता समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
courtnews:मलकापूर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50000 रू दंड तसेच दंड न भरल्यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश दिनांक 09/12/2024 रोजी मलकापुर येथील वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्री. एस. व्ही. जाधव साहेब यांनी आरोपीस सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापुर येथे राहणारी अल्पवयीन मुलीला आरोपी किसना यादव सोनोने तसेच अमोल समाधान वानखेडे रा. मलकापुर या दोघांनी त्यांचे घरी बोलावुन पिडीतेवर लैगिक अत्याचार केला.
व त्यामधुन ती गर्भवती राहिली. सदर घटनेबाबत पिडीता हिने पोलिस स्टेशन मलकापुर शहर येथे अप. नं 299/2020 नुसार कलम 376(3), (2), (जे), (एन), डीए, 323, 504, 506,34 भा.दं. वि. सहकलम 4, 5 (एल) (जे) (2), 6 बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचे गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करून तपासाअंती दोषारोपपत्र वि. विशेष न्यायालय मलकापुर येथे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणातील आरोपी किसना यादव सोनोने हा प्रकरणाची सुनावणी दरम्यान फरार झाला आहे. आरोपी अमोल समाधान वानखेडे याचा जामिन अर्ज वि.न्यायालयाने फेटाळण्यात आल्यानंतर आरोपी यास न्यायालयीन बंदी ठेवुन सदरचे प्रकरण चालविण्यात आले.
आरोपी अमोल समाधान वानखेडे यांचेविरूद्ध सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी तसेच डी.एन.ए. तज्ञ, व तपास अधिकारी यांचे पुराव्यानंतर आरोपी नं 2 अमोल समाधान वानखेडे याचे विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अंतिम सुनावणी होवुन सरकार पक्षातर्फे शैलेश जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी अमोल समाधान वानखेडे रा. मलकापुर यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 सहवाचनिय कलम 5 (जे) (ii)आणि 5 (1) नुसार जन्मठेप म्हणजेच उर्वरीत आयुष्य आहे तो पर्यंत तसेच 25,000/- रू दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम
4(2) पोक्सो कायद्यानुसार जन्मठेप व 25,000/- रू दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम 323 भा.दं. वि.नुसार 1 वर्षे शिक्षा तसेच कलम 506 भा.दं. वि. नुसार 1 वर्ष शिक्षा आरोपीस सुनावली आहे. आरोपीस वि.न्यायालयाने कलम 323, 506, 376 (2) (एन), 376 (2) (जे), 376(3)भा.दं.वि.तसेच कलम 4(2), 6 सहकलम 5 (जे) (ii), आणि कलम 6 सहवाचनीय कलम 5 (1), बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले.
आरोपी अमोल समाधान वानखेडे यांचेकडुन 50,000/- रू वसुल झाल्यानंतर सदर रक्क्म पिडीतेस देण्याचा आदेश वि.न्यायालयाने दिलेला आहे तसेच सामाजिक न्याय विभागा मार्फत देण्यात येणाऱ्या पिडीत नुकसान भरपाई योजनेअंतर्गत सुद्धा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बुलढाणा यांना अतिरीक्त नुकसान भरपाई ठखुन पिडीतेस देण्याबाबत सुद्धा आदेश देण्यात आला आहे.
courtnews:सदर प्रकरणाचा तपास तपासअधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्री. गणेश शिंदे यांनी केला होता. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस उपनिरीक्षक श्री. संतोष भिकाजी कोल्हे पो.स्टे.मलकापुर शहर यांनी काम पाहिले. पिडीतेतर्फे अॅड. विशाल गोविंदा इंगळे यांनी सरकार पक्षास मदत केली.
हिंगणघाट :- नितेश चंपतराव ठोंबरे,वय 36 वर्ष रा. कान्होली काञी ता. हिंगणघाट जि. वर्धा
ह.मु. शांहलगडी रोड हिंगणघाट येथे 4-5 वर्षापासुन् येथे किरायाने पत्नी व मुलासह राहत असुन पेंन्टीग मजुरीने काम करते.
विषारी औषध प्राशन करून पेंटिंग मजुराने केली आत्महत्या(Hingnghat )
दि. दि.09/12/2024 ला वणा नदीचे काठावर विठ्ठल मुर्तीचे जवळ विषारी औषध प्राशन करून मृत्यू अवस्थेत होता पुढील तपास हिंगणघाट पोलीस करित आहे
सिंदी (रेल्वे ):- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज शाखा सिंदी (रेल्वे )च्या वतीने बाजार चौकात आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज याची 400 वी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ गंधारे, प्रमुख अतिथी अशोक डांगरे, संजय कोपरकर,गंगाधर कलोडे, सुरेशराव सोनटक्के,याच्या उपस्थितत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम संताजीच्या पुतळ्याचे व प्रीतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ गंधारे यांनी संताजी जगनाडे महाराराजांच्या जीवनचरित्र व कार्यावर माहिती देत प्रकाश टाकला सोबतच संजय कोपरकर यांनी सुद्धा समाज एकत्रीकरणाचे महत्व पटवून देत आपले विचार व्यक्त केले. यावेळी मंच्यावर उपस्थिती गंगाधर कलोडे यांनी समाजभवन बांधकामा करिता 2000 स्केअर फूट जागा दान देण्याची घोषणा यावेळी केली.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत सोनटक्के, प्रस्तावना अमोल सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल गवळी यांनी केले
Hingnghat:कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा चे शहर शाखा अध्यक्ष रामेश्वर घंघारे , सचिव रामभाऊ सोनटक्के यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला वैशाली पेटकर, सविता बुरले, पुष्पा सोनटक्के,स्नेहल कलोडे,प्रशांत कलोडे,किशोर सोनटक्के,प्रभाकर तडस,तेजस सोनटक्के, गणेश काळबांडे, मनोज पेटकर,प्रभाकर कलोडे, जयंत बडवाईक, विनायक सोनटक्के, आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते
अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनीधी
relvenews:अकोट: अकोट अकोला रेल्वे ही सुरु झाली असून करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा मिळावा यासाठी पुर्णाजी खोडके यांनी रेल्वे मंत्री मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती,
पुर्णाजी खोडके यांनी चोहोट्टा बाजार परिसरात स्वाक्षरी अभियान सुद्धा राबवली होते. परिसरातील ग्रामपंचायतचे ठराव घेतले होते व संबंधित यांच्याकडे मागणी केली होती.त्यांच्या मागणीची दखल घेत रेल्वे अधिकारी यांनी सदरील करतवाडी रेल्वे येथील मागणी करण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली.
व सर्वे केला व रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यापर्यंत पाठवला . होता आता करतवाडी रेल्वे येथील रेल्वे थांबा कधी मिळणार याकडे 84 खेड्यातील पंचकुशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.. तरी याकरिता लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी आणखी पाठपुरावा करणे गरजेचे आहे..
या ठिकाणी जर रेल्वेला थांबा मिळाल्यास तर चोहोट्टा बाजार परिसरातील 84 खेड्यातील व्यापारी वर्ग शेतकरी बांधव विद्यार्थी व नागरिक यांना मोठा फायदा होणार व रेल्वे विभागाला पण सुद्धा फायदा होणार. सदरील थांबा हा महत्त्वाचा आहे तरी सर्वे झाल्यानंतरही हे काम कुठे रखडले. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सुरू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे…..
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज.
सदरील थांबा हा महत्त्वाचा असून याकरता लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करण्याची गरज.
करतवाडी रेल्वे इथे रेल्वेला थांबा मिळावा याकरिता मी परिसरातील ग्रामपंचायतचे ठराव आणि परिसरातील नागरिकांच्या सह्या एक स्वाक्षरी अभियान राबवून घेतल्या व संबंधित लोकप्रतिनिधी रेल्वे विभाग रेल्वेमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्र पाठवून… मागणी केली होती.. करतवाडी रेल्वे येथे रेल्वेचा थांबा अत्यंत आवश्यक असून..
येथील 84 खेड्यातील नागरिकांकरता सदरील थांबा हा महत्त्वाचा आहे…. यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. परतवाडी रेल्वे येथील मागणी केलेल्या स्थानकांची पाहणी केली होती.. व सदरील रेल्वे विभाग यांच्याकडे अहवाल पाठवला होता…
आता खूप दिवस झाले असून.. सदरील थांबा हा नागरिकांच्या 84 खेड्यातील अत्यंत महत्त्वाचा असून… लोकप्रतिनिधी व सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पुर्णाजी खोडके सामाजिक कार्यकर्ते अकोला अकोट रेल्वेला आहेत तीन ठिकाणी थांबे… अकोला ते अकोट धावणऱ्या गाड्यांना तीन स्थानकांवर थांबत आहे.. , उगवा, गांधीस्मारक व पाटसुल रेल्वे या स्थानकांवर या गाड्या थांबत आहेत .
relvenews:सर्व थांब्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा थांबा करतवाडी रेल्वे
असून. मध्यस्थ. अकोला अकोट मध्ये चोहोट्टा बाजार परिसरालगतच करतवाडी रेल्वे असून या ठिकाणी रेल्वेला जर थांबा मिळाला तर हा थांबा अत्यंत महत्त्वाचा असून या लागून 84 खेडे आहेत.. करतवाडी रेल्वे या ठिकाणी रेल्वे ला थांबा मिळाल्यास सोईचे होईल यासंदर्भात परिसरातील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन व नागरिकांना सह्या गोळ्या करून. पुर्णाजी खोडके यांनी स्वाक्षरी अभियान घेऊन. रेल्वे विभागाकडे मागणी केली. रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली होती मात्र आता हा थांबा कुठे अटकला. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे…..
घटनास्थळ – गोराडा धरण सुनगाव शिवार
घटना तारीख व वेळ- दि. 08/12/2024 चे/6.00 वा पूर्वी दाखल तारीख वेळ 08/12/2024 चे 12/52 वा दरम्यान, गळफास घेतल्याने मृत्यु दाखल करण्यात आले अधिक-समाधान तायडे ब. न १६९५ ,तपास अधि-नापोका ब.न 504 इरफान शेख मो.न
हकीकत अशाप्रकारे आहे.
crimenews:की, नमुद घतावेळी व ठिकाणी मृतक नामे वैभव रामभाउ कोकाटे वय 25 वर्ष रा सुपो पळशी ता जळगाव जामोद याचा फिर्यादी यांनी शोध घेतला असता मृतक याने गोराडा धरनाचे काठावर असलेल्या पळसाचे झाडाला नायलॉन दोरीचे सहायाने गळफास घेतलेला दिसला अशा रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करुन तपास मापोनिसा यांच्या आदेशाने बिट नापोकों इरफान शेख ब . न 504 यांचे कडे देण्यात आला.
Hingnghat:हिंगणघाट :-होमगार्ड दिनानिमित्त महासमादेशक होमगार्ड मुंबई यांच्या आदेशानुसार दरवर्षी प्रमाणे हिंगणघाट पथक चे सर्व अधिकारी व सैनिक यांनी श्रमदानातून स्थानिक शमशान भूमी परिसरात स्वच्छता अभियान राबावण्यात आला.
होमगार्ड : (गृहरक्षक दल) . भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली.
मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली. हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.
6 डिसेंबर होमगार्ड स्थापना दिवस साजरा करत वरिष्ठ पलटण नायक, फिरोज पठाण, पलटण नायक, वसंता नाईक,, अनायुक्त अधिकारी गणेश गेडाम, बावणे, यांना हुद्दा बहाल करण्यात आला
Hingnghat:यावेळी तालुका समादेशक कैलाश रोकडे, कंपनी कमांडर मनोहर ढवळे, वरिष्ठ पलटन नायक फिरोज पठान, पलटन नायक गणेश नौकरकार, आकाश वाकेकर, वसंता नाईक, राजेंद्र लाजूरकर, व समस्त अनायुक्त अधिकारी, व हिंगणघाट होमगार्ड पथक चे समस्त महिला, पुरुष सैनिक, यावेळी उपस्थित होते