Home Blog Page 63

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)

0

 

पिंपळगाव सराई , बुलढाणा, महाराष्ट्र दि. ०४/०१/२०२५ शिक्षण प्रसारक मंडळ चिखली व्दारा संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी सन २००१ पासून २००५ मध्ये १० वी मार्च ची परीक्षा दिलेले विद्यार्थी निमंत्रीत करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मोठ्या संखेने माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी सकाळी ११:०० वाजता उद्‌घाटन समारंभ आयोजीत करण्यान आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली चे संचालक सहदेवराव सुरडकर यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आनंदराव हिवाळे यांची उपस्थिती होती .त्यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की सोशल मिडीयाचा जपून वापर करा, केवळ ट्रोल करण्याकरीता त्याचा वापर करू नका, याशिवाय वाचन संस्कृती आपण वाढवली पाहिजे तसेच आईवडीलांची सेवा केली पाहिजे असे सांगीतले .

रा. स्व. संघाचे धाड तालूका संघचालक सुभाषजी बारसकर यांनी श्रावण बाळ व त्यांच्या आई-वडीलाचे उदाहरण देऊन आई वडीलांच्या प्रती आपला समर्पण भाव कसा असला पाहिजे ते सांगीतले .

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

याशिवाय या कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती . शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक संतोषआप्पा खबुतरे , सहदेवराव सुरडकर तसेच पि. सराई गावच्या सरपंच रुपालीताई केशव तरमळे, शाळा सल्लागार समीती सदस्य मदनराव गवते, , शेषरावजी गायकवाड, साहेबराव गवते, भावसिंग सोळंके, रमेश देशमाने इत्यादी .

याच कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई यांना शिवराज्यभिषेक सोहळा दर्शन या तैलचित्राच्या दोन प्रतिमा भेट दिल्या .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मांजाटे यांनी केले, आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक भगवान आरसोडे यांनी केले.

उद्‌घाटन सत्रानंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला . भोजनानंतर दुपारी मुक्तसंवांद सत्र घेण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत प्रा. रामकृष्ण शामराव जाधव होते .

या संवाद सत्रामध्ये सन २००१ ते २००५ या कालावधीत असणाऱ्या आजी – माजी शिक्षकांची उपस्थिती होती. उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य दिनकर आंभोरे, प्रकाश जावळे, राजेंद्र जाधव, विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य प्रमोद ठोंबरे या शिवाय सेवानिवृत्त शिक्षक प्रा. प्रमोद शेवाळे, विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी वामनराव आरबुने, रामदास घगे तसेच विद्यमान शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग होता .

या मुक्तसंवाद सत्रात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्यात दिलखुलास संवाद झाला . माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कालावधीतील गंमतीशीर अनुभव कथन केले. या मुक्तसंवांद सत्रात सर्वांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातच माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकासासाठी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक रूपाने मदत दिली. या संवाद सत्राचे सूत्रसंचालन देविदास दळवी केले.

या संपूर्ण मेळाव्याचे समन्वयक तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांनी याच कार्यक्रमात शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत माजी विद्यार्थ्यांनी करावी असे आवाहन केले.

संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आपले शालेय पूर्व जीवनाचा आनंद घेतला . अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉइंट वर जाऊन आपापल्या मित्रांसोबत सेल्फीचा आनंद घेतला .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे कौश्यल्याने आयोजन केले होते .

buldhana:या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे अध्यक्ष, सचिव सर्व संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांचे शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगीनी व शिक्ष‌केतर कर्मचारी बंधू भगीनी यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयात सृजन वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव संपन्न( Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे :-

Hingnghat:ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट येथे सृजन वार्षिक स्नेहसंमेलन संस्थापक गिरधर राठी, अध्यक्ष अर्पणा राठी, सचिव श रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या महोत्सवात 25 डिसेंबर 2024 व 26 डिसेंबर 2024 रोजी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शितल ताई शेगोकार (shegaonnews)

या दिवशी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून महोत्सवाचे उद्घघाटन करण्यात आले सरस्वती स्तवनाने व स्वागत नृत्यने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात प्री- प्रायमरी तसेच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचे जोरदार सादरीकरण केले.

शैक्षणिक कार्यक्रमात पावर पॉइंट प्रेझेंटेशन तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा मंचावर घेण्यात आली. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वधर्मसमभाव व शूरवीर सैनिक नाटिका, शृंगार रसाने परिपूर्ण लावणी, तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे वीर रसात्मक नृत्य, मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे नारी शक्ती नृत्य, विविध राज्यातील नृत्य प्रकाराचे दर्शन घडवणारे व सामाजिक जागृती, विज्ञान निष्ठा वाढवणारे नृत्य हे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वतः विद्यार्थ्यांनी केले. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजराने विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाला दाद दिली.’वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो.

Hingnghat:त्याने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्यवाला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरधर राठी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शितल ताई शेगोकार (shegaonnews)

0

 

shegaonnews:आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची शेगाव येथे आढावा बैठक दिनांक चार एक 2025 रोजी विश्रामभवन शेगाव येथे पार पाडली असता शेगाव येथील शितल शेगोकार यांची आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे तर प्रकाश सरदार प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंत देवचंद समदूर भाई सिद्धार्थ पैठणी पंडित परखर मोर रामेश्वर खरात

मेहकर महादेव धायसे वाशिम पद्मा मोहोळ मंगळूर पीर विनोद कुमार गणवीर तसेच मोनाली मॅडम कारंजा लाड आबाराव वाघ विकास खरात भानुदास पवार भिकाजी दाभाडे इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे स्वागत करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले

हॅकरने हडपलेले ५० हजार सायबर ब्रांच कडून परत(Sbibank)

या संघटनेची स्थापना मागील वर्षी झालेली असून संघटनेत राज्यभरातील जवळपास 300 बौद्ध पत्रकार सभासदांची संख्या असून दररोज नवीन नवीन सदस्य जुळत असल्याची माहिती दिली आहे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 स*** सुरू केलेल्या मूकनायक वर्तमानपत्राचा सन्मान व मानवंदना म्हणून भव्य मूकनायक सन्मानपत्रकार दिन साजरा करण्यात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले

या कार्यक्रमाला युवकांचे प्रेरणास्थान सुजात दादा आंबेडकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्याचा एकमुखी ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला तर सुजातांनी ही आमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पत्रकार शितल शिवकर यांना आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली

या बैठकीत पत्रकारांचे लक्षणीय उपस्थित होती तसेच मूकनायक सन्मान व पत्रकार दिवस 31 जानेवारी रोजी शेगाव येथे संपन्न होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली तसेच आंबेडकर वाईस मीडिया फॉर्म मध्ये कार्यरत असणाऱ्या सदस्य पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे विनंती सुद्धा करण्यात आले

shegaonnews:माननीय शितलताई शेवकर यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना या पदाचे मानकरी ठरवले त्याबद्दल आंबेडकरी वाईस मीडियाचे ताईने आभार मानले आणि त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ती अवश्य चांगल्या रीतीने पार पाडतील असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले…

हॅकरने हडपलेले ५० हजार सायबर ब्रांच कडून परत(Sbibank)

0

 

हॅकरकडून अनेक लोकांच्या फसवणुकीला सायबरचा मदतीचा हात

Sbibank:बुलढाणा जिल्ह्यात MCN न्युज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार यांच्या खात्यातून ५ महिन्यापूर्वी कपात झालेली ५०,००० रू.ची रक्कम सायबर पोलिस दल,बुलढाणा सेशन कोर्ट तसेच स्टेट बँक संग्रामपूर यांच्या सकारात्मक पाठपुराव्याने नुकतीच आज दीं.४ जानेवारी रोजी परत जमा करण्यात आली आहे….

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

याबाबात MCN प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार यांच्या सोबत घडले असे की असे की त्यांना व्हॉटसअप वर आलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या बनावट लिंकवर त्यांच्याकडून बँकेचे ॲप समजून अनाधनाने क्लिक झाल्याने त्यांच्या करंट खात्यातून लागोपाठ १५ हजार आणि ५ हजार असे चार एसएमएस त्यांच्या मोबाईल वर आले.. आपला मोबाईल हॅक झाला लक्षात येताच त्यावर क्षणात त्यांनी सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर केलेल्या दूरध्वनीच्या संपर्क तक्रारीत हॅकरचे खाते गोठवन्याची प्रक्रिया करण्यांत आली..

दुसऱ्या दिवशी पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या सदिच्छा भेट व सहकार्याने बुलढाणा सायबर पोलीस दलातील राजदीप वानखडे यांच्याशी संपर्क केला त्यांच्या कडून मिळालेल्या निर्देशानुसार एडवोकेट शुभम टेंभे खामगाव यांच्या मार्फत बुलढाणा कोर्टात प्रकरण दाखल केले..

कोर्टासमोर सादर केलेली कागदपत्रे व पुरावे दरम्यान ५ महिन्यानंतर बुलढाणा सेशन कोर्टाकडून फिर्यादी रवींद्र शिरस्कार यांच्या बाजूला निकाल लागला..

Sbibank:स्टेट बँक संग्रामपूर रजिस्टर मेल आयडी वर आलेल्या कोर्टाच्या निकाली प्रकरणाचा आदेशाला दुजोरा देत संग्रामपूर स्टेट बँकचे ब्रांच मॅनेजर संदेश मगरे यांनी सायबर नोडल ऑफिस मुंबई शाखेच्या निदर्शनात आणत अखेर आज दीं.४ जानेवारी रोजी हॅकरच्या होल्ड लावलेल्या खात्यातील खात्यात रक्कम वजा करत रवींद्र शिरस्कार यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे..

सावित्रीबाई फुले जन्मदिन शिक्षकदिन म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिर प. भट येथे संपन्न(buldhana)

0

जावेद शहा बुलढाणा

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलडाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे* *सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी अभिवादन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रा. किशोर सिरसाट होते तर अतिथी म्हणून सा.शिक्षिका ज्योती सरकटे, व शिक्षकदिनी प्राचार्या बनलेल्या आचल धनावत होत्या.

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित…(medianews)

Buldhana:सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, दीप-प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा किशोर सिरसाट म्हणाले की, शिक्षक ही सर्वोच्च पदवी होय ती सर्वसामान्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुलें मुळेच प्राप्त झाली.

सावित्रीमाई नसत्या तर आजची महिला शिक्षिका व चांगल्या हुद्द्यावर नसत्या, सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणाचाच प्रसार केला नाही, तर बालविवाह, सती प्रथा, जातीय विषमता आणि विधवांच्या दुर्दशेविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी विशेष आश्रयस्थाने तयार केली, जिथे विधवांना सन्मानाने जगता येईल. त्यांनी स्त्रियांना आपली ओळख आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी प्रेरित केले. असे म्हणत अध्यक्षीय भाषण संपवले.

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आज दिवसभर शाळेचा कार्यभार विद्यार्थ्यातूनच विविध वेशभूषेतील शिक्षक-शिक्षिका बनलेले विद्यार्थी यांनी वाहिला व अनुभव घेतला.

Buldhana :कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.प्रिती कव्हळकर व नम्रता इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा शेजोळ हिनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शेगाव शहर पोलीस स्टेशन च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी(Shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

Shegaonnews:शेगाव: दि. 03/01/2025 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट विचार मांडून आपले मनोगत व्यक्त करतेवेळी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली.

Shegaonnews :त्यांचे विचार प्रेरणा देणारे आहे त्यांचे विचार महिलांसाठी व समाजासाठी प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन शेगाव शहर पोलीस स्टेशनठाणेदार व पोलीस कर्मचारी.उपस्थित होते

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित…(medianews)

0

 

medianews:दिनांक 30 डिसेंबर 2024 ला साखर खेरडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुन्हे व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यावेळी शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

दैनिक भारत संग्राम च्या वतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे प्रथम स्मृती प्रीत अर्थ तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आणि समाजभूषण अर्जुनराव गवळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव हवा या हेतूने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन साखरखेर्डा या गावी करण्यात आले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

त्यामध्ये शेगाव शहराचे वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा या पुरस्काराने माननीय उपस्थित मान्यवर माननीय संजय खडसे उपविभागीय अधिकारी, यांच्या हस्ते उद्घाटक माननीय रविकांत दादा तुपकर, स्वागत अध्यक्ष दिलीप खंडारे, रावसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद रफिक,

उपसरपंच प्रमुख अतिथी गजानन करेवाट, ठाणेदार अर्जुन गवई, प्रकाश शिंदे, ऍड. वर्षाताई कंकाळ, डॉ. निवृत्ती जाधव, विठ्ठल परिहार, समय जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते, शेगाव शहरातील माझी शहराध्यक्ष प्रविण बोदडे सर हे वंचित बहुजन आघाडीचे पदावर रुजू असताना त्यांनी येणाऱ्या तरुण पिढीला म्हणजेच युवा शाखेच्या भवितव्यावर खूप जोर दिला प्रत्येक ठिकाणी युवा शाखेचे ग्रुप तयार करून समाजामध्ये तरुण पिढीचा जल्लोष तयार केलेला आहे.

medianews:समाजामध्ये एक तरुण पिढीचा अस वातावरण तयार केले आहे, अतं दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा या तथागतांच्या मार्गाने चालणारे नवीन युवक पिढी तयार करण्याचं काम ते चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांचे हे काम पाहता त्यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने साखरखेर्डा येथे सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याचे श्रेय ते त्यांचे आई-वडील यांना देत आहेत..

पत्रकार नारायण दाभाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव (medianews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

medianews:जिल्हा प्रतिनिधीदैनिक भारत संग्राम आयोजित ‘ स्व. मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४ – २५ साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा

आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

जिल्हा बुलढाणा येथे आज पर्यंत निर्भिड पत्रकारिता करत असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने नारायण दाभाडे यांना सन्मानित करण्यात आले.

पत्रकार नारायण दाभाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव (medianews)

medianews:यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे साहेब, शेतकरी नेते रविकांतदादा तुपकर, प्रविणदादा गिते विश्वस्त लोकजागर परिवार, सुभाष दराडे मा. नगरसेवक दे. राजा हे उपस्थित होते. आयोजकांचे मनस्वी आभार…

आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

Hingnghat:सिंदी (रेल्वे ):- आमदार समीर कुणावार यांनी सिंदी शहरातला भरघोस निधी दिलेला असून त्याच्यात असणाऱ्या सेवा भाव वृत्तीला चा बोध घेत कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1जानेवारी बुधवार ला नगर परिषद हॉल मध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)

Hingnghat:सदरच्या रक्त शिबिरा करिता नागपूर येथील आयुष ब्लड सेंटर ची टीम येणार असून या शिबिरात रक्त दान करणे करिता जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे या शिबिराचे आयोजक राजू गंधारे, अमोल सोनटक्के, स्नेहल कलोडे, प्रभाकर तडस, संजय भंसाली, आनंद छाजेड यांनी केले आहे

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- जगद‍्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते, संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम श्री.साई हॉल, नंदोरी रोड येथे पार पडला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

याप्रसंगी संत संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य अतुल वांदिले यांनी मनोगतात व्यक्त केले.

 

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)

Hingnghat :याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक युवा महासभेचे कार्याध्यक्ष अतुल वांदिले, योगेश्वर महाराज, चंद्रकांत वाढई, किरण वैद्य, साखरकर गुरूजी, संदीप रेवतकर, मधुकरराव चाफले गुरुजी, दशरथ ठाकरे, बालु वानखेडे,अमोल बोरकर, वामनराव गिरी, मधुकरराव खडसे, किशोर शेगोकार, भाऊराव कोटकर, शंकर देशमुख, किशोर गाठे, सुनील भुते, किशोर चांभारे, सुधाकर वाढई, जगदिश वांदिले, बंटी रघाटाटे, बच्चू कलोडे, गजानन महाकाळकर, जगदिश पिसे, अनिल अडकिने, अमोल मुडे,राजू मुडे आदी उपस्थित होते.