अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनिधी
shegaon:आज दिनांक- ८ डिसेंबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे समर्थ सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन बुलढाणा शाखेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
shegaon:यावेळी त्या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक सचिन गायकवाड, मल्हारी गायकवाड, विजय काळवाघे, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे तसेच संत निरंकारी मंडळाचे सर्व सन्माननीय महानुभाव, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
mnsnews:आचार सहिता संपताच मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे याच्या आदेशानुसार मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर सरायकर याच्या हस्ते पद जाहीर करण्यात आले.
व राज साहेबाचा विचार घरो घरी पोहचवा असा संदेश देण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे व जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर याच्या मार्गदर्शनात घेण्यात आला हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी पवन तडस यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच हिंगणघाट चा संपूर्ण पदभार हा शहर अध्यक्ष म्हणून केतन भाऊ तायवाडे यांच्या कडे सोपविण्यात आला
तसेच शहर संघटक स्वप्नील दाते शहर सचिव योगेश नासरे
शहर उपाध्यक्ष रमेश राऊत शहर उपाध्यक्ष कामेश बावणे
mnsnews:सर्कल अध्यक्ष सागर घवघवे तालुका संघटक देवा काटकर तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले तालुका सचिव सुधीर बुरीले इत्यादी नवीन कार्यकरणी गठीत करण्यात आली व उर्वरित पदे हे काही दिवसात जाहीर करू आणि जिल्हा अध्यक्ष साहेब कडून सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या व पक्ष् बांधणीचा आदेश पण देण्यात आला
Hingnghat:हिंगणघाट :- स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतदि. ०५/१२/२०२४ रोजी हिंगणघाट परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरतर्फे खात्रीशिर खबर मिळाली की, गोल बाजार, हिंगणघाट येथील लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरचा मालक सुनिल वनकर हा त्याचे नोकरांचे मदतीने लॉरेक्स व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर संगणमताने तेथे येणाऱ्या ग्राहकांकडुन नगदी पैशाच्या स्वरूपात रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढया रकमेची ईलेक्ट्रॉनीक मशिनवर चाबी भरून ईलेक्ट्रॉनीक मशिनवर येणाऱ्या फिरत्या आकडयांवर स्वतःचे फायदयाकरीता पैशाची पैज लावून हारजितचा जुगार खेळीतो,
अश्या माहीतीच्या आधारे पोलीस स्टाफसचे मदतीने रेड केला असता सदर ठिकाणावरून चालक नोकर व ग्राहक क्रमांक १) शेख समिर शेख अब्दुल्ला, वय २१ वर्ष, रा. हनुमाण वार्ड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, २) रवि प्रकाश गुप्ता, वय ४४ वर्ष, रा. ग्राम देवखतपुर, तह. सिराथु जिल्हा कौशंबी, उत्तर प्रदेश ह. मु. दिवाकर वाघमारे रा. कलोडे चौक, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांचे राहते घरी किरायाने,
३) राकेश रामस्वरूप चौरसिया, वय ५८ वर्ष, रा. ग्राम धमना, तह. जिल्हा फत्तेपुर उत्तर प्रदेश ह.मु. दिवाकर वाघमारे रा. कलोडे चौक, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांचे राहते घरी किरायाने, ४) सुरज भैयाजी काटकर, वय २८ वर्ष, रा. टिळक चौक, नेताजी वार्ड, हिंगणघाट, वर्धा, ५) राहुल विलास वाघमारे, वय २२ वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा ६) विकास प्रकाशराव धनविज, वय २९ वर्ष, रा. आजनगांव, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा, ७)
सचिन रमेश अंबादे, वय ३४ वर्ष, रा. माहत्माफूले वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा, ८) तेजस उत्तमराव गायकवाड, वय ३२ वर्ष रा. भिमनगर, संघमित्रा विहारजवळ, हिंगणघाट जिल्हा वर्धा, ९) वैभव दिलीप माद्देश्वर वय २७ वर्ष, रा. विरभगतसिंग वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा, १०) शेख समिर शेख इस्लाम वय ४८ वर्ष, रा. सेंटर वार्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा व मालक ११) सुनिल वनकर रा. म्हसाळा, वर्धा
(पसार) यांचेवर जुगार कायद्यातंर्गत कारवाई करून त्यांचे ताब्यातुन १) व्हिडीओ गेम पार्लर मधील १६ इलेक्ट्रॉनीक मशिन त्यांचे चाब्यांसह (ज्यात हाय ५ फाईव्ह, मिनी फ्री प्ले, गेम झॉन, गोल्ड मार्केट, मेट्रो, मास्टर, रेनबो, मिंट, एक्सट्रा अशा कंपनीच्या मशिन आहे.) प्रती मशिन किंमत १३,००० रू. प्रमाणे एकुण कि. २,०८,०००/- रू., २) प्लॉस्टीक चेअर २८ नग प्रती ८०० रू. प्रमाणे २२,४००/- रू. ३) एक व्हिल चेअर किंमत ३,०००/- रू. ४) एक मायक्रोटेक
कंपनीचा इंन्व्हटर किंमत ६,०००/- रू ५) गती ट्रस्ट कंपनीची बॅटरी किंमत १२,०००/- रू. ६) नगदी ३९,०३०/- रू असा एकुण जु.कि. २,९०,४३०/- रू. चा मुद्देमाल पुराव्याकामी ताब्यात घेवून आरोपी क्र. ०१ ते ११ यांचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Hingnghat :सदरची कारवाई मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, अरविंद येणुरकर, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, मुकेश ढोके स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.
dr babasaheb ambedkar ):भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ( पुण्यतिथिचा ) हा दिवस (महापरिनिर्वाण दिवस ) म्हणून संपुर्ण देशभरात नव्हे तर जगात साजरा केला जातो.
या अनुशंघाने आज दि.6.12.2024 रोजी किनगाव जटुटु येथील जि.प.शाळेत ( महापरिनिर्वाण ) दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांच्या जिवनावर अनिल पवार सर व वर्ग 4 थी चा विद्यार्थी शैलेश गोविंद वाघमारे यांनी प्रकाश टाकले यावेळी उपस्थित.
dr babasaheb ambedka:rअनिल पवार सर,दिघेकर मॅडम,डोंगरे मॅडम,नागरे सर व शाळा समीतीचे अध्यक्ष नारायण राऊत,उपअध्यक्ष सचिन मुळे, पत्रकार सय्यद जहीर, परमेश्वर खरात, सय्यद वाजीद,रवी राठोड उपस्थित होते.
हिंगणघाट:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी वंदन करण्यासाठी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेत, रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याचा संकल्प केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…(Hingnghat )
रक्तदान म्हणजे फक्त सेवा नसून ती आपल्याला समाजासाठी योगदान करण्याची संधी देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि मानवतेच्या मूल्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.
Hingnghat :त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांचा आदर्श आत्मसात करून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी केला.याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, विजय तामगाडगे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सिद्धार्थ मस्के, सुभाष सोयाम, पुरुषोत्तम कांबळे,नितीन भुते, झाडे बावाजी,सुरेश गायकवाड,सुशील घोडे, विपूल थूल, पंकज भट्ट,आकाश हुरर्ले, चेतन ढोरे, मयूर पाटिल,आदी उपस्थित होते…
dr babasaheb ambedkar:मुंबई, दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले.
दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधीत करीत होते.
कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिद्र्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, हे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे.
देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी – सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलल्या कामातून संविधानाचा अंमल दिसून येतो.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. यावरून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानल्या जाते. त्यांनी तेव्हा लिहीलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे.
इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल. राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा पहिल्यांदा विचार करणार असून संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे. त्यांनी दिलेले संविधान हे कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार
उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
dr babasaheb ambedkar:सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
policenews:शेगाव : (प्रतिनिधी) दि.४ ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि 18 वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकांच्या ताब्यात देऊन ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ यशस्वी केले आहे.
बुलडाणा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांचे आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान-13 हि शोध मोहीम दिनांक ०१ डिसेंबर ते दिनांक ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणे करीता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमे अंतर्गत 18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पो. उपनि, गजानन शिंदे, व तीन पोलीस अंमलदार एक महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे.
सादर पथक हे शोध मोहीम दरम्याण पेट्रॉलीग करीत असतांना, ग्राम जवळा बसस्थानक येथे प्रसाद शशिकांत सांळुखे वय १३ वर्ष रा. वालेकर हा रडत असतांना मिळून आला. त्यास विचारपुस केली असता त्याने सांगतले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंप्री चिंचवड येथील राहणार असून आपण रागाचे भरात पुणे येथुन लक्झरी बसमध्ये शेगांव व तेथून जवळा येथे ऑटोने आलो आहे असे सांगितले.
policenews:पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडुन त्याचे कुटुंबाची माहिती घेतली. त्यांनतर ठाणेदार प्रविण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंखे रा. पुणे यांचा मोबाईल क्रं. प्राप्त करुन त्यावर संपर्क करुन मुला विषयी माहिती देण्यात आली. त्यांनतर पालक शेगावात पोहचल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हि कारवाई पो.अ.सा.विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव, विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
vidhansabha:हिंगणघाट: महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार अतुल वांदिले यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने पक्षाने कठोर कारवाई करत माजी आमदार राजु तिमांडे आणि कृ.उ.बा.स सभापती सुधीर कोठारी यांना निलंबित केले आहे.
माजी आमदार राजु तिमांडे यांनी पक्षाने दिलेले अधिकृत उमेदवार असतानाही अपक्ष उमेदवारी दाखल करत पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन केले. तसेच सुधीर कोठारी यांनी पक्षाचे अधिकृत कामकाज न करता बंडखोरीचे समर्थन केले. या दोघांच्या कारवाया पक्षशिस्तीला धोका पोहोचविणाऱ्या असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी ही निलंबनाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वचनबद्धतेला प्राधान्य देत अशी कारवाई भविष्यातही करण्यात येईल असे पक्षाने स्पष्ट केले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिली.
vidhansabha:यावेळी पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अमोल बोरकर, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, विजय तामगाडगे, राहुल वानखेडे, अनिल आडकीने, प्रवीण कलोडे उपस्थित होते.
Hingnghat:सिंधी रेल्वे मुस्लिम कब्रस्तान कमिटी तर्फे बाबा मस्तान शहा यांच्या कबरे वर चादर चढविण्यात आली आमदार समीर कुनावार हे हिंगणघाट मतदार क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रिय आमदार आहे
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा त्यांना मंत्रिपद मिळावा यासाठी सिंधी शहराचे कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी यांनी गावातील मुस्लिम बांधवांना तसेच मज्जिद चे मौलाना यांना सोबत घेऊन बाबाच्या दरबारावर चादर चढविण्यात आली मज्जित चे मौलाना बाहुद्दिन यांनी प्रार्थना केली की समीर कुणावर हे मंत्री व्हावे जसा विकास मोठ्या कब्रस्तानचा झाला तसा विकास छोट्या कब्रस्तानचा व्हावा अशी प्रार्थना केली.
मुस्लिम कब्रस्तान परिसरात असलेली बाबा मस्तान शहा दर्गा येथे आमदार साहेबांसाठी चादर(Hingnghat)
Hingnghat :कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी इसराइल सुफी साहेब यांनी आमदार कुणावर यांची प्रशंशा केली व त्यांनी सांगितले आमदार साहेबांनी कब्रस्तान कमिटी करिता भरपूर फंड दिला व कब्रस्तान परिसराचा विकास झाला असे सांगण्यात आले त्यांच्यासोबत कब्रस्तान कमिटीचे सदस्य सरदार कुरेशी एकता क्लबचे पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते
accdent:सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 3.12.2024 वार रोज मंगळवार ला रात्री ठीक 9 वाजता बिबी दुसर बीड रोड पेट्रोल पंपाच्या बाजूला ट्रक व ॲम्बुलन्स चा समोरासमोर अपघात झाला असून त्यामध्ये ॲम्बुलन्स चालक अक्षय उकंडा आडे रा (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता लोणार जि बुलढाणा जागीच ठार झाला आहे.
ॲम्बुलन्स बिबी कडून दुसर बीड कडे जात होती तसेच ॲम्बुलन्स वाहक राजेश्वर वाकळे वय वर्ष 30 रा वाशी मुंबई हा गंभीर रित्या जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सर्व नागरिक बिबी ग्रामीण रुग्णालयाचे 108 चे कर्मचारी डॉ देवानंद फड ॲम्बुलन्स चालक राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत दिली त्यानंतर जखमी वाकळे यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे.
accdent:घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली पुढील तपासणी बिबी पोलीस स्टेशन करीत आहे