Home Blog Page 62

हा माझा सत्कार नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा सत्कार आहे -: ना.पकंज भोयर(Hingnghat)

0

 

वर्धा जिल्हाला मंत्रीपद मिळाले हा आपला बहुमान -: आमदार समीर कुणावार* प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तथा नागरी सत्कार समितीच्या वतीने माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे नवनियुक्त राज्यमंत्री ना.श्री. पंकज भोयर व नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे यांचा नागरी सत्कार समारंभ स्थानिक निखाडे भवन हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला होता या नागरी सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार हे होते त्याच्याच पुढाकाराने सदर सत्कार सोहळा आयोजित केला केला होता

यावेळी सत्काराला उत्तर देताना ना.भोयर यांनी हा सत्कार माझा नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा हा सत्कार असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली मंत्रीपदामुळे आधीपेक्षा माझी जवाबदारी वाढली

भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)

असून माजी खासदार रामदास तडस,आमदार समीर कुणावार,आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे , जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या साथीने जिल्हाला विकासकांच्या वेगळ्या उंचीवर नेण्याच्या माझा मानस असल्याची प्रतिक्रिया दिली आमदार बकाणे व वानखेडे यांची सुध्दा समायोजित भाषणें झालीत.

स्वागताध्यक्ष कुणावार यांनी ना.भोयर यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला प्रथमच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्याने हा संपूर्ण जिल्ह्याचा बहुमान असून प्रथमच जिल्ह्यातील चारही विधानसभा काबीज केल्याने आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांना याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी मंचावर हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Hingnghat :यावेळी हिंगणघाट येथील सामाजिक संस्थांनी मान्यवराचा सत्कार केला कार्यक्रमाला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

भाविकांसाठी पवित्र लोणार धारातीर्थी स्नानासाठी खुली करा-आमदार सिध्दार्थ खरात(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार विकास आराखडा आढावा बैठक संदर्भ लोणार विकास आराखडा समिती ए.डी.पी शर्मा,जिल्हाधिकारी किरण पाटील, पुरातत्त्व विभागाचे अरून मलीक, फॉरेस्टचे राठोड,विभागीय अधिकारी जोगी,तहसीलदार भुषण पाटील, मुख्यधिकारी वि.भा.वराडे यांनी आज लोणार येथे भेट दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या भेटीची माहीती कार्यकर्ते यांना मिळाली त्या आमदार सिध्दार्थ खरात यांना दिली असता ते तात्काळ येथे दाखल झाले यावेळी आमदार खरात यांनी समितीशी चर्चा केली यावेळी मी लोणारला लोणावळा करेन अशी भुमिका मी मतदारांना मांडली होती माझ्या या भुमिकेची लोकांनी स्वागत केले व भरभरुन मतदान केले.

यामुळे लोणारला लोणावळा करायचा असेल तर या समितीमध्ये स्थानिक आमदार व खासदार यांचा समावेश करण्यात यावा अशी सुचना यावेळी खरात यांनी दिल्या. तसेच तिर्थक्षेत्र धारतीर्थ सर्वांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी केली.

स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांना विश्वासात घेऊनच विकास झाला पाहिजे यामुळे लोकांच्या समस्या भाविक पर्यटकांची समस्या आपल्याला मांडता येईल. समितीमध्ये समावेश होई पर्यंत अनौपचारिक मला प्रत्येक बैठकीला बोलवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केली.

विकास आराखडा समितीच्या समावेशासाठी गरज पडल्यास न्यायालयात याचीका दाखल करू व लोणारचा लोणावळा करू असे आमदार खरात म्हणाले.

Lonarnews:यावेळी मा.नगराध्यक्ष भुषण मापारी, उबाठा शहरप्रमुख गजानन जाधव,काग्रेंसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, कृषि उत्पन्न बाजार समिति के सदस्य तेजराव घायाळ,राजु बुधवत ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष,प्रा.गजानन खरात, युवा तालुका प्रमुख जिवन घायाळ,गजानन मोरे,शालीक घायाळ,तानाजी मापारी, शे.करामत,एजाज खान,उबेद खान,परविन सरदार, उपस्थित होते.

यावल येथील तहसीलदार, मोहनमाला नाझीरकर यांनी पत्रकारांचा केला गौरव आणि सन्मान.(Yavalnews)

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:आज रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगोडे ,यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एम.एच.तडवी,

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यांच्यासह मंडळ अधिकारी सौ. बबीता चौधरी,यावल तलाठी गजानन पाटील यांनी जिजामाता जयंती,स्वामी विवेकानंद जयंती पत्रकारांच्या उपस्थितीत साजरी करून व औचित्य साधूत नुकताच पत्रकार दिन सर्वत्र साजरा झाल्याने यावल व फैजपूर येथील पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव व कौतुक केले.

तसेच ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांना सुद्धा स्थानिक मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या मार्फत सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित सर्व पत्रकारांनी आयोजक तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

यावल येथील तहसीलदार, मोहनमाला नाझीरकर यांनी पत्रकारांचा केला गौरव आणि सन्मान.(Yavalnews)

Yavalnews:या कार्यक्रमांमध्ये यावल फैजपूर येथील तालुका प्रतिनिधी आयुब पटेल शेखर पटेल सुरेश पाटीलअरुण पाटील सुधीर चौधरी रणजीत भालेराव प्रमोद वाणी सुनील गावंडे विकी वानखेडे अशोक तायडे जीवन चौधरी सुधाकर धनगर भूपेंद्र झोपे राजेंद्र तायडे फारुख शेख मिलिंद टोके समीर तडवी संजय शराफ योगेश व सर्व उपस्थित होते

नागपूरच्या शास्त्रज्ञांनी केले विविध गावांमध्ये माती परीक्षण शेतकऱ्यांचा होणार फायदा(buldhananews)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

buldhananews:लोणार तहसीलमधील किनगाव जट्टू, खंडाळा, बिबी आणि चिखला या चार गावांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) 2.0 अंतर्गत जमिनीचे काम सुरू आहे. डॉ. रंजन पॉल, ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग, नागपूर (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय) मधील मृदा शास्त्रज्ञ डॉ. रंजन पॉल यांच्या नेतृत्वाखालील या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट सरकारी धोरण-निर्धारण आणि कृषी क्षेत्रात मदत करण्यासाठी माती डेटा गोळा करणे आहे.

सर्वेक्षणादरम्यान, डॉ. रंजन पॉल यांच्यासह रोशन अरविंद कडू आणि त्यांच्या टीमने मातीच्या क्षितिजाचे परीक्षण करण्यासाठी आणि प्रयोगशाळेच्या विश्लेषणासाठी नमुने गोळा करण्यासाठी निवडलेल्या ठिकाणी 5×5 फूट खड्डे खणले.

पोलीस स्टेशन शेगाव चे ना पो का ज्ञानदेव डाबेराव, यांची दबंग कामगीरी बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक करण्यात आली(Policenews)

या नमुन्यांचे विश्लेषण नागपुरातील ICAR-NBSS आणि LUP प्रयोगशाळेत केले जाईल जेणेकरून मातीचे वर्गीकरण आणि कृषी पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मातीच्या इतर गुणधर्मांचे वर्णन करणाऱ्या मृदा संसाधनांवर तपशीलवार अहवाल तयार केला जाईल.

“या भागातील मातीचे स्वरूप समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. एकदा विश्लेषण पूर्ण झाल्यावर, एक सर्वसमावेशक अहवाल सरकारला सादर केला जाईल, जो धोरणांचा मसुदा तयार करण्यात आणि शाश्वत जमीन वापरासाठी पुढाकार घेण्यास मदत करेल” डॉ. पॉल म्हणाले.

हे सर्वेक्षण PMKSY 2.0 अंतर्गत कार्यक्षम संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या ध्येयाचा एक भाग आहे. स्थानिक शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि आशा व्यक्त केली आहे की निष्कर्ष सुधारित कृषी उत्पादकता आणि प्रदेशासाठी दीर्घकालीन फायद्यासाठी योगदान देतील.

सर्वेक्षण केलेल्या गावांमध्ये सिंचनाच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, मातीची गुणवत्ता, आरोग्य सुधारण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी या वैज्ञानिक प्रयत्नातून मौल्यवान अंतर्दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे.

buldhananews:या टीम मध्ये कृषी तज्ञ रामराव इंगळे समूह संघटक रामेश्वर सोनकांबळे सिव्हिल इंजिनिअर श्रीकांत घुमरे कृषी सहाय्यक कविता साखरे मंडळ कृषी अधिकारी अनिल सांगळे कृषी पर्यवेक्षक विलास जाधव प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 क्लस्टर क्रमांक 03 नागपूरचे शास्त्रज्ञ व तसेच पाणलोट समितीचे बीबी किनगाव जट्टू चिखला या गावाचे अध्यक्ष सचिव प्रामुख्याने उपस्थित होते

पोलीस स्टेशन शेगाव चे ना पो का ज्ञानदेव डाबेराव, यांची दबंग कामगीरी बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक करण्यात आली(Policenews)

0

 

ईस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव, अब्दुल हमीद चौक ते जवळा टी पाॅईंट आठवडी बाजार शेगाव येथील घटना, घटना तारीख 7/1/202521/28 वेळी व ठिकाणी फिर्यादी ना पो का ज्ञानदेव डाबेराव बन 2270 पोलीस स्टेशन शेगाव हे शेगाव टाऊन मध्ये पेट्रोलिंग करत असताना यातील नमूद आरोपी सौ निमा नरेंद्र लोंडे हीचोरी करण्याच्या उददेशाने शेगाव मधील बाजारमध्ये फिरत असुन दुस-या बाजार करणा-या महीलेच्या हातातील पर्समधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना आमच्या समक्ष मिळनु आली आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

पोलीस स्टेशन शेगाव चे ना पो का ज्ञानदेव डाबेराव, यांची दबंग कामगीरी बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक करण्यात आली(Policenews)

Policenews :तसेच आम्ही सदर महीलेची आम्ही कोर्ट चेकर या अॅप वर माहीती काढली असता पोस्टे बाभुळगाव जि यवतमाळ येथे अपनं 312/22 कलम 379, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अप नं- 09/2025 कलम 303 (2) 62 BNS सदरचा दाखल करुन तपास मा. पोनि. सा. आदेशाने पोहेका सुसुर ब न 1092 यांचे कडे देण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिरात पोलीस स्टेशन रायपूरच्या वतीने कार्यक्रम संपन्न (buldhananews)

0

buldhananews:प्र.श. 7 जानेवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु कॉलेज पळसखेड भट मध्ये दिनांक 7 जानेवारी 2025 वार मंगळवार ला पोलिस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री शिवाजी हायस्कूल रायपुर येथील स. शिक्षक गजानन जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख मार्गदर्शक व अतिथी म्हणून मा. दुर्गेश राजपूत ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम सोनुने, शिक्षक प्रदिप जाधव, तुळशीदास आकाळ, सोमनाथ नप्ते यांची उपस्थिती होती.

बिबी येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने सदस्य नोंदणी(Lonar)

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथे ‌मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ठाणेदार मा. दुर्गेश राजपूत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, समाजामध्ये शांतता प्रस्तावित व्हावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जातो.

संपूर्ण भारतामध्ये उत्कृष्ट काम महाराष्ट्र पोलीस यांचे आहे. आपण विद्यार्थ्यांनी पोलीस खात्यामध्ये रुजू झाले पाहिजेत. यादरम्यान प्रामुख्याने रस्ता सुरक्षा, सायबर क्राईम व लैंगिक शिक्षणाचा अभाव या तिन बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजामध्ये फेसबुक इन्स्टा व सोशल मीडियाच्या माध्यमातून कशाप्रकारे सायबर गुन्हे घडतात व नकळत कमी वयाच्या विद्यार्थ्यांकडूनही कशाप्रकारे एखादी पोस्ट शेअर केल्याने गुन्हा घडू शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच रस्ता सुरक्षा च्या बाबतीत जर कुठले वाहन आपल्या घरचे पालक किंवा आजूबाजूला कोणी चालवत असेल तर त्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे, जेणेकरून अपघात घडल्यास जीव वाचू शकतो.

तसेच आज सगळ्यात जास्त घडणारे गुन्हे म्हणजे या वादळी अशांततेच्या वयातील मुले-मुली यांचे विरोधी आकर्षण! 15 ते 18 या वयोगटातील तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. मुलांमध्ये परस्पर विरोधी आकर्षण असतं व त्या माध्यमातून मुले आई-वडिलांचा विचार न करता चुकीचे पाऊल उचलतात व गुन्ह्यास बळी पडतात. हे करत असताना आपण आई-वडिलांचा निश्चित विचार करावा. ज्ञानाचे क्षेत्र खूप मोठे आहे. त्यामुळे केवळ एका गोष्टीकडे आकर्षित होऊन आपण आपलं संपूर्ण आयुष्य पनास लावू शकत नाही. म्हणून आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत.

buldhananews:पहिल्यांदा आपण त्याचा विचार केला पाहिजे. आई-वडिलांचा विचार केला पाहिजे आणि परिपूर्ण माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे आपल्या भाषणात ठाणेदार साहेब म्हणाले.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. व श्री शिवाजी हायस्कूल रायपुर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले.

बिबी येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने सदस्य नोंदणी(Lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

दिनांक ७/१/२०२५ रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने लोणार व बिबी मंडळामध्ये सदस्य नोंदणीचा कॅम्प ऑर्गनाईज केले होते भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सदस्य नोंदणी केली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

Lonar:भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प राबवण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शुभम देसाई हे होते तर या कॅमच्या आयोजन ता. अध्यक्ष राम डुकरे पाटील यांनी केले होते.

Lonar:यावेळी शेकडो नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी कॅम्पमध्ये सहभाग घेऊन सदस्य नोंदणी केली
यावेळी शहर अध्यक्ष सागर मुर्तडकर, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल काबरा, जिल्हा सरचिटणीस प्रविण धाईत, बाळासाहेब कुलकर्णी, भागवत मुळे, ऋषिकेश धाईत , दीपक लोहारे , आशिष अग्रवाल , संदीप आखाडे, शिवाजी आंधळे, भागवत आटोळे,सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

बिबी व किनगाव जटुटु येथे ठिकठिकाणी पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न(Lonar )

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

Lonar:सालाबाद प्रमाणे या ही वर्षी मोठ्या उत्साहात
6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी बिबि व किनगाव जटुटु येथे ठिकठिकाणी पत्रकाराचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये बिबी येथील ग्रामपंचायत कार्यालया येथे सर्व प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)

त्या नंतर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पुत्र दिपक गुलमोहर सचिव अमोल मोरे व तसेच सर्व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य यांनी सर्व पत्रकारांचा मानसन्मान करून सत्कार करण्यात आला त्यानंतर सचिव अमोल मोरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले व त्यानंतर बिबी पोलीस स्टेशन मातोश्री अर्बन राजश्री शाहू अर्बन मध्ये सुद्धा पत्रकाराचा मान सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Lonar:यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे पत्रकारांना मार्गदर्शन व शुभेच्या दिल्या यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार मधुकर मोहिते राजकुमार मुळे काशिनाथ राऊत भागवत आटोळे देवानंद सानप रमेश खंडागळे ऋषी दंदाले कृष्णा पंधे रामप्रसाद जाधव मिलिंद चव्हाण ब्रह्मानंद वाकोडे रोशन चव्हाण शीलवंत इंगळे सय्यद जहीर अशोक मुंढे वितेश चव्हाण सुनिल इंगळे दिनकर काकड काशिनाथ काळे गजानन डोईजडव व त्याच प्रमाने किनगाव जटुटु येथील श्रि स्वामी समर्थ मंदिरात देखील किनगाव जटुटु गाव कर्यानी दर वर्षी प्रमाने याही वर्षी गावातील पत्रकाराचे शाल, श्रिफळ व भेट वस्तु देऊन संन्मानीत केले

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना डी.आर.यू.सी.सी. सदस्यत्वाचे ओळखपत्र प्रदान(Shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

शेगाव, दि. ___ : राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना रेल्वे विभागाकडून डी.आर.यू.सी.सी. (डिव्हिजनल रेल्वे यूजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यत्वाचे ओळखपत्र प्रदान करण्यात आले. हा विशेष सोहळा शेगाव रेल्वे स्थानकावर स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षा मनीषा टाकसाळ, दिव्यांग आघाडीच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षा मनीषा खेडकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष वैशालीताई जोशी, शेगाव तालुका अध्यक्ष प्रीती तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)

कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील सक्रिय पदाधिकारी बबीता बहुराशी, रूपाली धावडे, रूपाली ठाकरे, रश्मी इंदूरकर, पुनम माधणे, मोनाली उंदीरवाडे, अर्चना वानखडे, सुशीला ताथरकर, स्नेहल बऱ्हाणपूर, अनिता इंगळे, सुजाता थातरकर, उर्मिला तायडे, अन्वय ठाकरे, मनीषा भगत, ज्योती घोगले, पुष्पा काळे यांचीही उपस्थिती होती.

महिला भगिनींच्या संघटनेने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार बांधवांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि संघटनेच्या उपक्रमांना पाठिंबा दिला.

या ओळखपत्रामुळे माधुरीताई शर्मा यांना रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी सांगितले. महिलांच्या प्रवासी सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठीही संघटना विशेष प्रयत्नशील राहील, असे माधुरीताई शर्मा यांनी आपल्या मनोगतात म्हटले.

Shegaonnews :कार्यक्रमाचे संयोजन अतिशय यशस्वीरीत्या पार पडले आणि रेल्वे विभागाने संघटनेच्या कार्याला दिलेला पाठिंबा यापुढील काळात महिलांच्या हक्कांसाठी उपयोगी पडेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

साकळी येथिल ग्रामपंचायतिच्या वतीने पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान(Yavalnews)

0

 

. यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपकभाऊ नागो पाटील व मित्रपरिवार तसेच साकळी ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने आज दि.६ रोजी पत्रकार दिनानिमित्त साकळीसह परिसरातील तसेच यावल येथील सन्माननीय पत्रकारांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यावेळी जवळपास २५ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गावातील सन्माननीय नागरिक उपस्थित होते.त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात सरपंच दिपक भाऊ पाटील व मित्र परिवार तसेच साकळी परिसर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात दुपारी दोन वाजेपर्यंत 26 रक्तदात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केले.

संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांनी रक्त संकलन केले.पत्रकार दिनानिमित्त साकळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांचा प्रथमच गौरव करण्यात आला ही अतिशय प्रशंसनिय बाब आहे.

Yavalnews:त्यावेळी लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील, उपसरपंच नूर बी तस्लिम खान, ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर, सलीम मज्जीत शेख, खतीब तडवी, मुकेश खेवलकर, बाबा मेंबर, राजु सोनवणे,अकबर शेख हुसेन, माजी उपसरपंच फखरुद्दीन खान कुरेशी,विनोद खेवलकर, मुकेश बोरसे, सचिन कोळी, नरेंद्र मराठे, उमेश बडगुजर, योगेश कुंभार, ग्रामविकास अधिकारी डिगंबर धनगर,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच साकळी व साकळी परिसर त्याचप्रमाणे यावल तालुका प्रतिनिधी उपस्थित होते