Home Blog Page 64

आमदार श्री मनोज कायंदे यांचा एक फोन आणि 96 तासांमध्य डीपी चालू ( manojkaynde)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

manojkaynde:सतत शेतकरी कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच अडचणीत असल्याने शेतकऱ्याला नाहक त्रास भोगाव लागतो पळसखेड चक्का येथील गेल्या एक वर्षापासून शेतामध्ये डीपी बंद अवस्थेमध्ये होती.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

म्हणून शेतकऱ्याचे खरीपचे पीक तर गेलेच पण रब्बीचे पीक सुद्धा हातामधून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता म्हणून शेतकरी पळसखेड चक्का येथील दिनांक 23 डिसेंबर रोजी आमदार श्री मनोज कायंदे यांची भेट घेतली आणि त्यांना सगळ्या समस्या समजून सांगितल्या आणि शेतकऱ्याला रब्बी पिकाला लाईट नसल्यामुळे पीक हातातून जाणार आहे.

असे सांगितल्यानंतर लगेच त्यावर त्यांनी लगेच अधिकाऱ्याला सूचना देऊन पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा चक्का येथील डीपी ताबडतोब बसवा असे आदेश दिल्यानंतर आज दिनांक 27 डिसेंबर रोजी येथील डीपी बसवण्यात आल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

manojkaynde:आता रब्बीचे पीक शेतकऱ्यांची गहू हरभरा शाळु आणि बीज उत्पादक शेतकरी शेडनेट यांना आणि या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा यावेळी उपस्थित शेतकरी शेतकरी योद्धा कृती समिती चे समन्वय श्री बालाजी सोसे, श्री अर्जुन मुंडे साहेब, श्री गणेश सोसे ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग सोसे, प्रमोद नागरे, राहुल आंधळे, धनंजय सोसे, आधी शेतकरी उपस्थित होते

श्री. साई प्रतिष्ठान येथे शिव महापुराण कथेचे आयोजन.. प्रतिनिधी सचिन वाघे ( Hingnghat)

0

 

Hingnghat:हिंगणघाट;- श्री.साई प्रतिष्ठान , नंदोरी रोड हिंगणघाट द्वारा आयोजित श्री. संत साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन व प.पु.श्री.संत लक्ष्मीमाताजी पुण्यतिथी महोत्सव निमित्य दिनांक २८ डिसेंबर पासून वेळ दुपारी ०२ ते ०६ वाजेपर्यंत शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कथा भागवताचार्य ह.भ.प श्री देवी मंजूलताजी (अयोध्या) यांच्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांना शिव महापुराण कथेचे महत्व सांगणार आहे. ३ जानेवारीला सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

Hingnghat:हिंगणघाट क्षेत्रातील सर्व भाविकांनी कथा भागवताचार्य देवी मंजूलताजी (अयोध्या) यांच्या ओजस्वी वाणीतून शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.साई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष संत योगेश्वर महाराज, सचिव अतुल वांदिले यांनी केले आहे.

शिक्षकांच्या संस्कारक्षम कार्यानेच विद्यार्थी उन्नत होतो:-आमदार डॉ मिलिंद नरोटे यांचे चामोर्शी येथील तालुकास्तरीय क्रीडा व कला संमेलनात प्रतिपादन.(Gadchirolinews)

0

 

Gadchirolinews:चामोर्शी:-पंचायत समिती मोर्शीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत जयनगर विक्रमपूर यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व धडाडीचे आमदार डॉ मिलिंद नरोटे हे होते तर अध्यक्षस्थानी पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील हे होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

विशेष अतिथी गावचे सरपंच प्रभाष सरकार,प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे,गावचे उपसरपंच प्रतिमा सरकार, विक्रमपूर गावचे सरपंच विष्णू ढाली,केंद्र प्रमुख मानिक वरपडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव मंडल,जयनगर शाळेचे अध्यक्ष समिर विश्वास, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश कोत्तावार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भांडेकर,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमु, गट साधन केंद्र केंद्राचे गटसमन्वयक चांगदेव सोरते उपस्थित होते.

Gadchirolinews:क्रीडा संमेलनात तालुक्यातील चौदा केंद्रातील सहयोगी विद्यार्थी व शिक्षक-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश साखरे व प्रदिप भुरसे यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख मानिक वरपडे यांनी व्यक्त केले.

कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त महाआरोग्य शिबिर संम्पन्न(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट :- कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विकी वाघमारे व मित्रपरिवार यांच्या वतीने दी. 24 /12/2024 मंगळवारी शिव मंदिर यशवंत नगर हिंगणघाट येथे निशुल्क महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये ४९९ तपासण्या करण्यात आल्या या मध्ये मशीनद्वारे ईसीजी तपासणी,जनरल सर्जरी विभाग,हृदयरोग तपासणी,अस्थिरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी, दंत तपासणी, श्रयरोग तपासणी, वातरोग तपासणी,रक्त तपासणी,टीबी तपासणी,एमडी मेडिसिन,जनरल फिजिशियन,जॉईंट रिप्लेसमेंट तपासणी व विविध तपासणी करण्यात आल्या व प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

सामान्य नागरिकांना निशुल्क उपचार मिळाले यासाठी विकी वाघमारे व मित्रपरिवार तर्फे दरवर्षी महाआरोग्य शिबीर शहरात राबविण्यात येते.

हिंगणघाट येथील सार्वजनिक आरोग्य विभाग,उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या या विशेष प्रयत्नाने हे महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले या शिबिराचे उद्घघाटक म्हणून हिंगणघाट येथील सुप्रसिद्ध डॉ.निर्मेश सुधीर कोठारी,तर प्रमुख अतिथी म्हणून
डॉ.विशाल भास्कर कलोडे,डॉ. सोनाली वाघमारे,डॉ. स्नेहल चौधरी,डॉ.अजय गिंदेवार,डॉ. अतुल वाघमारे,डॉ.गिरीश वरभे,डॉ.मनीषा भाईमारे,डॉ. श्रद्धा वाघमारे,डॉ.प्रियंका शेडांबे,डॉ.सोनल जुगणारी होते,पारडीचे सरपंच अलका दिनकरराव पवार व माजी नगरसेवक मनीष देवडे उपस्थित होते.

शिबिराचे उद्घघाटन कर्मयोगी गाडगेबाबा महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करीत महाआरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आले.

महाआरोग्य शिबिरामध्ये डॉक्टरांचा महाआरोग्य शिबिरामध्ये निशुल्क तपासणीचा लाभ घेणाऱ्यांच्या तपासणी केल्या.
महाआरोग्य शिबिरात विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय,व पत्रकार बंधूंनी महाआरोग्य शिबिरात व मोठ्या प्रमाणात नागरिकांनि आपली उपस्थिती देत आयोजक विकी वाघमारे व मित्र परिवारांचे शिबिराबद्दल अभिनंदन केले.

hingnghat:यावेळी रितिक मोघे,प्रज्वल धाडसे,सुरज गावंडे,अभय दारोंडे,प्रतिक शंभरकर,किट्टू नाईक,सुबोध गायमुखे,कोमल वावरे, टिंकू ढेपे, अभिजित गावंडे,प्रतीक धाडसे,मंथन इंदूरकर, अनिकेत तेंबूरणे,शुभम सोरदे,कुणाल कळसकर,हिमांशू गावंडे,उद्देश कांबळे,नितीन इंदूरकर,अनिकेत अष्टेकर,प्रेम जवादे,पराग चंदनखेडे, उद्देश कांबळे उपस्तित होते.

4थ्या राज्यस्तरीयपॅरा ऍथिलिटिक्स स्पर्धात बुलढाणा जिल्यह्याची अभिमानास्पद कामगिरी(Shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

बुलढाणा (काप्र)महाराष्ट्र राज्याची चौथी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा कोल्हापूर येथे दिनांक 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या येथे संपुर्ण राज्यातून दिव्यांग खेळाडू या सपर्धेसाठी उपस्थित होते.

लोणार ग्रामीण रूग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी लवकरच समिती नेमून खऱ्या दोषींवर कडक कार्यवाही करणार : केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव (Pratapraojadhav)

या मध्ये बुलढाणा जिल्ह्या च्या महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त २०२३ वर्ष च्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुराधा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 खेळाडू यांनी सहभाग घेतला त्यात बुलढाणा जिल्ह्याने भरघोस कामगिरी केली यात शुभम अवचार यांनी 2 सुवर्णपदक व 1 रोप्य पदक मिळवले , वैभव संबारे यांनी 2 रोप्य पदक , अलका चव्हाण यांनी 1 रोप्य व 2 कास्य पदक,किरण साळवे यांनी 2 कास्यपदक प्राप्त केले तसेच गणेश जाधव यांनी 1 कांस्य पदक मिळवले.

Shegaonnews :तर कृष्णा परिहार यांनी 2 कांस्यपदक मिळवले असे एकूण तेरा पदकांची कामगिरी बुलढाणा जिल्ह्याने 4 थ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी करून दाखविली आहे ही बाब बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

4थ्या राज्यस्तरीयपॅरा ऍथिलिटिक्स स्पर्धात बुलढाणा जिल्यह्याची अभिमानास्पद कामगिरी(Shegaonnews)

खेळाडूंची स्वागत पॅरा ऑलम्पिक असोसिएशन बुलढाणा तर्फे श्री गणेश जाधव सर व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अनुराधा सोळंकी यांनी केले.अशीच कामगिरी पुढील काळातही हे खेळाडू करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यातूनच लवकरच खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे

लोणार ग्रामीण रूग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी लवकरच समिती नेमून खऱ्या दोषींवर कडक कार्यवाही करणार : केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव (Pratapraojadhav)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

Pratapraojadhav:केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्रालयातून तात्काळ घेण्यात आली घटनेची दखल

दिनांक २३ डिसेंबर च्या सकाळी ३.३० वाजेदरम्यान लोणार ग्रामीण रुग्णालयाच्या वॉर्ड मध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांना धूर दिसून आला असता त्यांनी लगेच वॉर्ड बॉय यांना या बाबत माहिती दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

वॉर्ड बॉय बळीराम खरात ह्यांनी वॉर्डात जाऊन पहिले असता त्यांना आग लागल्याचे व खूप धूर असल्याचे दिसून आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने लगेच फायर सिलेंडर घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयन्त केले. आग विझवण्याचा प्रयत्न करतांना त्यांनी ६ सिलेंडर वापरले.

परंतु आग आटोक्यात येईपर्यंत वॉर्डात ऍडमिट असलेले पैठण येथील हरिभाऊ बापूजी लोकडे अंदाजे वय ६५ वर्ष यांचा जळून मृत्यू झाला होता. या आगीचे कारण अद्यापही समजले नाही.

Pratapraojadhav:या घटनेची माहिती केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना मिळताच त्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशी साठी एक समिती नेमण्यात येणार आहे. जे कोणी या घटनेसाठी जबाबदार असतील अश्या दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक राजु भोर यांनी बोलतांना दिली.

महाराष्ट्राचे कामगार मंत्री नामदार अॅड. आकाश दादा फुंडकर यांनी घेतले श्रींच्या समाधीचे आई व पत्नीसह घेतले दर्शन(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

shegaonnews:शेगाव, दि. २२ डिसेंबर : महाराष्ट्राचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश दादा फुंडकर यांनी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रथमच संत नगरी शेगावला भेट दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्यासह श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या या आगमनामुळे संत नगरीत भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

नामदार आकाश दादा फुंडकर मंदिरात पोहोचल्यावर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी मंत्रिमहोदयांचा सत्कार केला.

shegaonnews:त्यांनी मंदिराच्या पवित्र वातावरणात सपरिवार श्रींना वंदन केले आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीच्या प्रार्थना केल्या.

भाजपा नेते देवानंद सानप यांचा त्यांच्या चाहत्यांकडून गरजवंत महिलांना किराणा किट व साडी चोळी वाटुन वाढदिवस साजरा( Lonar)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

 

वाढदिवसाच्या निमित्त हृदय सत्कार व वाढदिवस साजरा

Lonar:पत्रकार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांचा आज दि २२ डिसेंबर रोजी ठिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक संघटनेच्या व पत्रकार संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा मतदार संघात दुसरबीड तढेगाव बीबी भुमराळा किनगाव जट्ट चिखला देऊळगाव कोळ झोटींगा खंडाळा लोणार मांडवा विरपांगरा सह इतर ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व मित्र मंडळींनी त्याचा शाल श्रीफळ देवून हृद्य सत्कार करण्यात आला तद् नंतर बिबी येथील गरजवंत महिलांना वाढदिवसानिमित्त किराणा किट व साडी चोळी चे वाटप देवानंद सानप यांच्या चाहत्यांकडून वाटप करण्यात आले.

वयाच्या १५ वर्षापासून सामाजिक कार्यातून राजकारणात आले आणि राजकारणात आल्यानंतर सर्वसामान्यांय विषयी असलेली तळमळ या कार्यातून लोकप्रियता वाढत गेली आणि अंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्ते व मित्र परिवार वाढतच गेला यातून शेतकरी कष्टकरी मजूर अनाथ अपंगांच्या समस्या निवारण्याचे काम करून शासन दरबारी न्याय मिळवून दिला आजही ते कार्य चालू असून भविष्यात गोरगरिबांवरील अन्याय अत्याचाराच्या लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य चालूच ठेवणार असे देवानंद सानप यांनी सांगितले.

लोणारमधून विकल्या जात होती कामवासना वाढवणारी औषधी; बिनधास्त विकायचा गर्भपाताची औषधे ; अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत २५ लाखांचा माल जप्त…(brekingnews)

यावेळी पत्रकार भगवान नागरे काशिनाथ राऊत,दिनकर काकड, अशोक मुंडे,मधुकर मोहीते, रमेश खंडागळे ,भागवत आटोळे, रामप्रसाद जाधव ,रोशन चव्हाण, ऋषी दंदाले , कृष्णा पंधे,जहीर भाई,भाजपा युवा ता अध्यक्ष राम डुकरे, ता.सचिव प्रविण धाईत, व्यापारी आघाडी जि. उपाध्यक्ष गोपाल काबरा, वंचित ता. अध्यक्ष दिलीप राठोड,धनंजय कायंदे,सागर मुर्तडकर ,रंजीत सानप , आशिष अग्रवाल ,भागवत मुळे, विशाल मुर्तडकर ,

ऋषिकेश धाईत, मंगेश बोबडे , बाबू सिंग जोरावर सरपंच गणेश काकड ,शाम इंदोरिया, सुनिल मुंढे, गजानन मुर्तडकर , अमोल गावडे , राहुल वानखेडे, कैलास तांदुळे, प्रसाद कुलकर्णी, रामेश्वर काळुसे, विलास दराडे, गणेश डुकरे, गजानन गायकवाड,
असंख्य चाहते व मित्र मंडळी हजर होती.
———————————–
Lonar :आमदार मनोज कायंदे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार तोताराम कायदे,भाजपा नेते प्रभाकर ताठे,सह अनेक पक्षातील नेत्यांनी व सामाजिक संघनटनेतील कार्यकर्त्यांनी सानप यांना शुभेच्छा दिल्या

लोणारमधून विकल्या जात होती कामवासना वाढवणारी औषधी; बिनधास्त विकायचा गर्भपाताची औषधे ; अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत २५ लाखांचा माल जप्त…(brekingnews)

0

 

अनेक वर्षा पासुन विकण्याचा अंदाज

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:राज्यातील शासकीय रुग्णालयाना झालेल्या औषध पुरवठा वरून खळबळ उडाली असतानाच बुलढाणा जिल्ह्यात अवैध औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य आणि अन्न औषध विभाग सतर्क झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव जगप्रसिध्द लोणार या खाऱ्या पाण्याच्या सरोवर मुळे प्रसिद्ध आहे.मात्र याच जगप्रसिद्ध सरोवर नगरीत अवैध औषधाचा मोठा साठा आढळून आला आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या कारवाई बाबत काटेकोर गुप्तता बाळगण्यात आली. त्यामुळे कारवाईचा विस्तृत तपशील कळू शकला नाही.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार सुमारे पंचवीस लाख रुपयांचा हा औषधी साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य साशनाच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा आणि वाशीम जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे त्यांनी वाशीम जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक एम.व्ही. गोतमारे यांच्या समवेत लोणार येथील चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक १, बस स्थानक जवळ, लोणार येथे छापा घालून चौकशी केली.

यावेळी करण्यात आलेल्या तपासणी व कारवाईत सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले. मेडिकल वर उपस्थित व्यक्ती सुशिल पुनमचंद दरोगा यांच्या कडून नमूना सोळा व पंचनामा अंतर्गत एकूण चोवीस लाख तेहतीस हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठयातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आला. या उत्तेजक औषधींचा साठा नमूना 15 प्रतिबंधीत करण्यात आला आहे.

brekingnews:झोपेच्या गोळया, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येनार आहे. जिल्हयातील सर्व मेडीकलधारकांना सहायक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांनी हा इशारा दिला आहे.

समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करनारे टोळीला बिबी पोलीसांनी ठोकल्या बेडया. -04 आरोपींसह स्कॉर्पीओ, स्विप्ट डिझायर कार जप्त.(Brekingnews)

0

 

Brekingnews:दिनांक 13/11/2024 रोजी फिर्यादी नामेकिरणकुमार लिंगया कनुकुंटला वय ३८ वर्ष रा.कल्यानी टावर जवळ चद्रपुर ता.जि.चद्रपुर यांनी पो स्टे बिबी येथे रिपोर्ट दिला समृध्दी महामार्गाने मुंबई ते नागपुर रोडने ट्रक घेवुन नागपुर कडे जात असतांना दुसरबिड टोलनाका जवळ रस्त्यावर वाहन थांबवुन आराम करत असतांना दिनांक १३/११/२०२४ रोजी रात्रीचे ०३/०० वा चे सुमारास ट्रकच्या डिझेल टाकीतील अंदाजे ८० लिटर डिझेल कि. ७०००/- रुपयेचे चोरुन नेले व ट्रकचे काचाला दगड मारुन समोरील काच फोडुन अंदाजे ५०००/- रुपयाचे नुकसान केले होते.

पो स्टे बिबी अप नं.२४४/२०२४ कलम ३०३(२), ३२४ (४) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासत गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या खबर प्रमाणे तसेच तांत्रीक सांधनांचा वापर करुन कसोशीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन दिनांक 20/12/2024 रोत्री पो स्टे बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील सह सफौ परमेश्वर शिंदे, नापाकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे यांनी पो स्टे चिखली हददीत गजानन नगर चौफुलीवर गोपनिय बातमीच्या आधारे छापा टाकुन आरोपी नामे १. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय २७ वर्ष, रा.खंडाळा मकरध्वज ता. चिखली २. निलेश संतोष भारुडकर वय ३२ वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली ३. देविदास प्रकाश दसरे वय २८ वर्ष, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा यांना पकडले त्यांचे कब्जातुन 1. स्कॉर्पीओ वाहन क्रमांक एम एच 28 व्हि 8409 किंमती 350000/रुपये 2. एक स्विप्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 एच झेड 5575 किंमती अंदाजे 3,00,000/रुपयेचे वाहन तसेच त्यातील 35 लिटर क्षमतेच्या रिकाम्या 4 कॅन असे साहीत्य जप्त करण्यात आले तसेच नमुद आरोपीतांनी गुन्हयातील डिझेल सचिन परसराम घुबे रा देऊळगाव घुबे याला विक्री केले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

वरुन त्याला ताब्यात घेवुन विचारपसु केली असता त्याने डिझेल विकत घेतल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी नामे १. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय २७ वर्ष, रा. खंडाळा मकरध्वज ता.चिखली २. निलेश संतोष भारुडकर वय ३२ वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली ३. देविदास प्रकाश दसरे वय २८ वर्ष, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा 4. सचिन परसराम घुबे वय 27 वर्ष रा देऊळगाव घुबे ता चिखली यांना दिनांक 21/12/2024 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि 23/12/2024 पावेतो पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास ठाणेदार संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोहीते, जैवळ हे करीत आहे.

पो.स्टे बिबी कडील स्टाफ नमुद सदर कारवाई करुन येत असतांना एक संशयीत स्कॉर्पीओ वाहन दिसुन आल्याने सदर वाहन थांबविले असता त्यातील इसम पळुन गेले वाहनाची तपासणी केली असता त्यात डिझेल चोरीकरीता 18 प्लास्टीक खाली कॅन ठेवल्याचे दिसुन आले त्यावरुन सदर संशयीत वाहन आणण्यात देखील डिटेन करण्यात आले आहे.

पो. स्टे बिबी कडील पोलीस पथकाने समृध्दी महामार्गावर घडलेल्या डिझेल चोरीच्या गुन्हयाचा छडा लावुन आरोपी व वाहने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

Brekingnews :सदर कामगीरी मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. विश्व पानसरे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. बि. बी. महामुणी साहेब, अपर पोलीस अधिक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर श्री प्रदिप पाटील, पोनि स्थागुशा श्री अशोक लांडे साहेबयांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील, सफौ परमेश्वर शिंदे, नापोकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे, यांनी केली.