Home Blog Page 65

हिंगणघाट नंदोरी रस्त्या बांधकामाचे नियोजन नसल्याने अशोक बोरकर यांच्या अपघाताने मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन ..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट – नंदोरी रोडवरिल भाकऱ्या नाल्यालगत अशोक बोरकर यांच्या अपघात होऊन जागीच मृत्यू झाला.या रस्त्याच्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व मुलगा विनोद बोरकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट- नंदोरी रोड व्यवस्थित नसल्यामुळे अशोक बोरकर यांचा अपघात झाला व यांच्या जागीच मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व त्यांच्या मुलांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार केली असून या रोड च्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. कंत्राटदाराचे नियोजन बरोबर नसल्यामुळे अशोक बोरकर यांच्या मृत्यू झाला. या आधीपन असे अनेक अपघात याच ठिकाणी झाले आहे. व त्यात त्यांच्या मृत्यू देखील झाला आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

हिंगणघाट नंदोरी रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे असून त्या कामाचे नियोजन सुद्धा बरोबर नाही. या भागातील जनतेला या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून नागरिक संतापले आहे.

Hingnghat :राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुढाकार घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. जर जनतेला त्रास होत आहे. व कामाचे नियोजन नाही आहे.म्हणून या रस्त्यांच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.

भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्षा कडुन दि.24.1.2025 पासुन आमरण उपोषन(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार तालुक्यातील भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख जावेद शेख यासीन यांचे दि.24.1.2025 पासुन सामुहिक आमरण उपोषणाचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र ग्रामीण यांना दिले

नीवेदनात मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतील एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या निष्कृष्ट कामाबाबत तक्रार अर्ज सादर करण्यात आले.एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या कामाबाबत बर्याच वेळेस तक्रारी करूनही रोडचे काम जैसेच तसे आहे.कार्यालया कडुन में नळगे इन्फ्रा प्रोजेक्ट प्राली परतुर जिल्हा जालना यांना चार ते पाच वेळेस पत्र व्यावहार सुध्दा झाले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

पण तरीही आज पर्यत या रोडची कामे पुर्ण झालेली नाही एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या निष्कृष्ट काम रोड ची साईट पट्टी कुठेच भरलेली नाही.ग्रेडेशन कोनत्याच लेयर वर झालेली नाही.त्याच बरोबर G.1,G.2,MPM.00 ते 4/400 पर्यंत झालेला नाही.डे्न नालीचे काम पुर्ण झालेले नाही.डे्न नालीचे काम पुर्ण झालेले नाही.शेत पांदी रस्त्यावर कुठेच पाईप टाकलेले नाही.

दि.2.12.2024 रोजी एम.क्यु.एम अधिकारी यांच्या कडुन 04/400 ते पहुर या रोडची चौकशी होणार अशी माहिती मिळाली त्यामुळे आरडव,दाभा,पहुर येथील गावकर्यांना विचारना केली मेन अधिकारी कुठे आहे.तर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

अश्या निष्कृष्ट रोडच्या कामामुळे शासनाच्या तिजोरीतला व जनतेचा पैसा खर्च करुनही शासनाची व जनतेची लुट केली जात आहे.

जिल्हा बाहीरील कॉलेटी कंट्रोल चौकशी अधिकारी नेमुन अमच्या समक्ष इन कॅमेरा चौकशी करण्यात यावी.एम .डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या प्रेत्यक 200 मिटर वर ट्रायलपिट घेण्यात यावी.रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.या पुर्ण रोडची चौकशी करुन एम.डी.आर 44 ते पहुर रोडचे काम पुर्ण झाले असे प्रमाणिकरण कार्यवाही करण्यात यावी.एम.डी.आर 44 ते पहुर रोडची पुर्ण चौकशी होई पर्यंत राहीलेले बिल काढण्यात येऊनये याची सर्व जबाबदिरी आपली राहील असे निष्कृट दर्जच्या काम करणार्या ठेकेदारांचे परवाना रद्द करण्यात यावा दि.15.1.2025 पर्यंत चौकशी करून आम्हाला अहवाल देन्यात यावा अन्यथा दि.24.1.2025 पासुन मी व आरडव,दाभा,पहुर गावकरी मिळुन आपल्या बुलढाणा येथील कार्यालया समोर सामुहिक आमरण उपोषणाला बसणार आहोत.याची संपुर्ण जबाबदारी अपली राहील.

Lonarnews:आज पर्यंत आपल्या कार्याल्या कडुन जोकाही में.नळगे इन्फ्रा प्रोजेक्ट प्राली परतुर जिल्हा जालना यांना पत्र व्यावहार करण्यात आले आहे.त्याच्या प्रति सोबत जोडले आहे.ग्राम विकास विभागातर्गत काम करनार्या कंत्राटदारांवर करावयाच्या कार्यवाबाबत मार्गदर्शन सुचना G.R निवेदन तक्रार करता भाजप अल्पसंख्याक लोणार तालुकाध्यक्ष शेख जावेद शेख यासीन व आरडव, दाभा, पहुर गावकरी यांनी दिले आहे.

जळगांव विमानतळ येथे प्रवाश्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने विविध विकास कामे होणे बाबत; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू यांना मागणी..(Yavalnews)

0

 

 

Yavalnews :जळगाव विमानतळावर वैयक्तिक प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि जळगाव व परिसरातील लोकांच्या वाढत्या आकांक्षा लक्षात घेता, जळगाव विमानतळावरील विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची तातडीची गरज असुन जळगांव विमानतळ येथे प्रवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी विविध विविध विकास कामांचा विस्तार करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांची नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.राम मोहन नायडू किंजरापु यांची भेट घेऊन मागणी केली.

 

यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव शहराचे व विमानतळाचे भौगोलिक महत्व अधोरेखित करून या विमानतळावरून वाढत असलेली प्रवासी संख्या लक्षात घेता वर्तमान धाव पट्टीचा (रन वे) विस्तार करण्याची प्रमुख मागणी या पत्राद्वारे केली आहे.

संविधान बचाव जागृत नागरिक मंच व सर्व राजकीय पक्षाचे उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन..(Hingnghat)

धाव पट्टीचा विस्तार केल्यामुळे बोईंग सारखी मोठी विमाने सुद्धा या विमानतळावर सेवा देण्यास सक्षम ठरतील व प्रवासी क्षमता वाढून जळगाव या शहराला अधिकाधिक अन्य शहरांशी हवाई मार्गाने जोडता येईल. दुसरी महत्वाची मागणी जी केली आहे ती म्हणजे वर्तमान विमानतळाचे टर्मिनल वाढती प्रवाशी संख्या हाताळण्यासाठी अपुरी पडत असल्याने या टर्मिनल संख्या वाढऊन लवकरात लवकर विस्तारीकरण करण्यात यावे ही आहे.

 

या दोघही सुधारणा केल्या मुळे एकूणच जळगाव विमानतळावरून सेवा देणाऱ्या विमानांची व ओघानेच प्रवासी संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढून जळगाव शहर, जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील अन्य दोन धुळे व नंदुरबार जिल्हे यांच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल.

Yavalnews :विशेषत्वाने जळगाव ते पुणे व पुणे ते जळगाव या मार्गावर नियमित वाहतूक सेवा उपलब्ध आहे. या संदर्भात माननीय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री यांचेशी झालेल्या सविस्तर चर्चे अनुसार संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई यांना दिले गेले आहे.

संविधान बचाव जागृत नागरिक मंच व सर्व राजकीय पक्षाचे उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट:- परभणी येथे संविधान शिल्प विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध.आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बँलेट पेपरवर घेण्यात यावे याकरिता सर्व पक्षीय द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

परभणी येथे भारतीय संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय सविधांचा प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही तर त्यांच्यावर प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व परभणी येथिल भीमसैनिकावर गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच संविधान शिल्प विटंबनेचा विरोधात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली व पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

अमानुष मारहाणीमुळे हि घटना घडली असून यास जबाबदार असलेल्या सबंधित कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना तात्काळ न्याय मिळून यावा.

नोव्हेंबर २०२० मध्ये दिल्ली सीमेवर सुरु झालेले शेतकर्याचे आंदोलन एक वर्ष चालले. सर्वाच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्र सरकारने शेतकर्यांचे नुकसान करणारे तीन कायदे स्थगित केले. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, म्हणून १३ फेब्रुवारी २०२४ पासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.

शेतकऱ्यांचा समस्या समजून त्यावर तोडगा काढण्याऐवजी
त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक करीत आहात.

देशातील बहुसंख्य मतदारांनी ज्या पक्षाला मते दिली, तो पक्ष सरकार स्थापन करतो. यात निवडणूक आयोग आयुक्त कार्यालयाचा धोरणात्मक निर्णयाचा मुख्य आधार आहे. २०१९ च्या सार्वत्रीत निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनबाबत मोठ्या प्रमाणात संशय यायला लागला. तेव्हापासून “माझे मत कुठे गेले ?” हा प्रश्न मतदारांना भेडसावीत आहे.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आश्चर्याचा धक्का सहन करावा लागला. या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून काही गावामध्ये मतदारांनी मशीनने दाखविलेले मतदान योग्य असल्याची खात्री करण्याकरिता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा संकल्प जिल्हाधिकारी व सबंधित यंत्रणेस कळवीला. त्याचा परिणाम असा झाला कि, याकरिता गावातील मतदारांना मतदान करण्यापासून सक्त मनाई करण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पाडता येऊ नये यासाठी पोलिसांना पाठववून जमावबंदी आदेश लागू करून गावातील नागरिकांना मतदान करू दिले नाही. अशा प्रकारे मतदारांनी दिलेले मत कोणत्या उमेदवाराला गेले, याची खात्री करण्याचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला. त्यामुळेच मतदारांचा ईव्हीएम मशीनवर असलेला संशय खरा ठरतो.

बहुतांश जनतेला ईव्हीएम वर शंका असेल व ‘माझे मत कुठे गेले’ ? हे समजण्यास जर वाव नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जनतेचा गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आगामी होण्यार्या सर्वच निवडणूका बॅलेट पेपरवर घ्यावे असे निवेदन सर्व पक्षीय समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे, नवीन इंदुरकर, शिवसेनेचे सतीश धोबे, मनीष देवढे, समाजसेवक सुनील डोंगरे, डॉ. उमेश वावरे, बालु वानखेडे, विजय तामगाडगे,शंकर मुंजेवार,संजय धबर्डे, राजेश धोटे, बाळा मानकर, सुरेश मुंजेवार, अनिल मुन, दशरथ ठाकरे, ज्वलंत मुन, सिद्धार्थ मस्के, गोकुल पाटील, अमोल बोरकर, मनीष कांबळे, सुरेश गायकवाड,अतुल नंदागवळी यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

खोट्या घरफोडी प्रकरणात अडकविल्याने बदनामीपोटी केली आत्महत्या(brekingnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

brekingnews:हिंगणघाट दि.१९ डिसेंबर:- बुरकोनी येथील एका अविवाहित युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी मौजा लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.१९ जवळ घडली.

विशाल रमेश चाफले(२६) अशी या युवकाची ओळख असून हिंगणघाट पोलिसांत मृतकावर घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा मनस्ताप झाल्याने निराशेपोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याचे कुटुंबियांनी केला आहे.
काल पोलिस पंचनाम्यानंतर विशाल याचा मृतदेह शव विच्छेदनाकरीता स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणला.
आज गुरुवारी शव विच्छेदन झाल्यानंतर मृतकाचे कुटुंबियांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

काल पासूनच मृतकाचे कुटुंबियांसह बुरकोनी येथील नागरिकांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात ठाण मांडले असून दोन इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दि.१३ रोजी पोलिसांनी विशाल रमेश चाफले याचेवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात वर्धा येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मृतकास ताब्यात घेतले होते. गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप मृतकाचे कुटुंबीयांनी केला आहे.

मृतकाने आत्महत्या केली त्यापूर्वी त्याला हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात चौकशी करिता बोलविण्यात आले होते. अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे,यानंतर त्याने घरी जाऊन शेतावर जातो असे घरच्यांना सांगितले, परंतु शेतात न जाता त्याने निराशेपोटी लाडकी शिवारातील रेल्वेलाईन वरती येणाऱ्या ट्रेनपुढे उडी घेऊन आत्महत्या केली.मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार.
सरकारी दवाखाना येथे

brekingnews:शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले, संबंधीत प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी केली.

पत्रकार संघाच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधान प्रस्तावनेच्या विटंबनेचा निषेध….(lonarnews 

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

 

lonarnews:दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रस्तावनेची एका माथेफिरू इसमाने फाडतोड करून विटंबना केल्यामुळे परभणी येथील आंबेडकर वाद्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले त्यामुळे परभणी येथील पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून त्या ठिकाणी होत.

असलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला संचारबंदी लागू करून बौद्ध वस्तीमध्ये कोंबींग ऑपरेशन केले आणि अनेक कार्यकर्त्यांनवर लाठी चार्ज करून महिला पुरुषांना सुद्धा बेदम मारहाण केली अनेक ठिकाणी वाहनांची सुद्धा तोडफोड केली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

त्याच आंदोलनामध्ये सोमनाथ चव्हाण या युवकाला बेदम मारहाण करून पोलिसांनी पोलीस कोठडी मध्ये ठेवून ‌मारहानकेलयामुळे सोमनाथ चव्हाण यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे.

ज्या संविधानावर अख्खा देश चालतो आणि आम्ही त्याचा आदर सन्मान करतो अशा संविधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंठकावर आणि ज्यांच्या खांद्यावर देशाच्या संरक्षणाची तसेच कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्याची जबाबदारी सरकारने दिलेली आहे.

अशा पोलीस प्रशासनाकडून कायद्याचा अभ्यास करीत असलेल्या एलएलबी च्या तिसऱ्या वर्षांमध्ये असलेल्या सोमनाथ चव्हाण या युवकाला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी व संबंधितशासकीय अधिकारी दोषी असलेल्या वर कठोर कारवाई करून निष्पक्ष तपासणी करून दोषी असलेल्यांना न्यायालयीन कक्षेत आणावे संविधानाच्या आदर्शाच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी या घटनेमुळे आंबेडकरी प्रेमी लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्यासाठी त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी.

lonarnews:भारतीय संविधान प्रस्तावनेची विटंबना आणि सोमनाथ चव्हाण यांची पोलीस कोठडी मध्ये हत्या केल्यामुळे या घटनेचा सुलतानपूर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आलेला आहे अशा आशयाचे निवेदन लोणार तहसीलदार भूषण पाटील यांना सादर केलेले आहे या निवेदनावर भाई सुरेश मोरे शेख निसारभाई संतोष पाटील शेख वसीम भाई विनोद अंभोरे स्वप्निल अवचार राजेश अवचार अमोल अवचारआशा अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत

परभणी घटनेतील दोषींवर  कारवाईसाठी ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा डॉ. गोपाल बछिरे,(lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonar:परभणी येथील संविधानाच्या अवमान बद्दल दोषीवर कठोर शासन होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गुढ मृत्यूची एसआयटी चौकशी करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या वतीने राज्यपालांना देण्यात आला

बुलढाणा शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते यांचा कोल्हापूर, सांगली,जिल्ह्याचा दवरा सम्पंन्न(Ravikanttupkar)

१० डिसेंबर  रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे अवमान करण्यात आले त्याबद्दल दोशींवर कडक कार्यवाही व्हावी याकरिता आंदोलक सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी यांनी आंदोलन केले त्या आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.

न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडीत असताना दिनांक १५ डिसेंबर रोजी कोठडीतच त्याचा गुढ मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू की हत्या हे तपासण्यासाठी महामहीम राजपाल यांनी एसआयटी समितीचे गठन करून तपास करण्यात यावा व दोषींवर कठोर कार्यवाही करावी.

अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मा. तहसीलदार लोणार यांच्यामार्फत महामहीन राज्यपालांना देण्यात आला.

lonar:याप्रसंगी जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, यांच्यासह तालुका संघटक कैलाश अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे शहर प्रमुख इकबाल कुरेशी, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ, तालुकाप्रमुख तारामती जायभाये, शहर प्रमुख पार्वतीताई सुटे, नगरसेविका सिंधुताई जाधव, सौ रंजना बछीरे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, समरजीत बछीरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे आदी उपस्थित होते

बुलढाणा शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते यांचा कोल्हापूर, सांगली,जिल्ह्याचा दवरा सम्पंन्न(Ravikanttupkar)

0

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनीघी

Ravikanttupkar:कोल्हापूर, 15\12\2024 रोजी रविकांत तुपकर शेतकरी संघटने चे दबंग नेते कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) येथे चळवळीतील जेष्ठ सहकारी श्री. सावकारअण्णा मादनाईक यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी सदिच्छा भेट दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यावेळी शिरोळ तालुक्यातील चळवळीतील लढवय्या शिलेदारांशी मनमोकळा संवाद झाला. आगामी काळात एकत्रित येवून चळवळीचा झेंडा कसा पुढे नेता येईल.

व चळवळीची आगामी दिशा कशी असावी, यासंदर्भात विचार-विनिमय करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या सर्व सहकाऱ्यांना भेटून खूप आनंद झाला.

Ravikanttupkar:यावेळी श्री. मिलिंदभाऊ साखरपे, श्री.शैलेशजी आडके, श्री.सागर मादनाईक, श्री.सतीश हेग्गान्ना, शिलकुमार चौगुले, पंकज मगदुम, ऋतुराज सावंत-देसाई, संदीपकुमार बेडगे, सुनील कामान्ना, बंडेश साखळे, प्रदीप पाटील, श्रुतिक पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शालेय पोषण आहारात विद्यार्थाना विषबाधा प्रकरणात मनसे आक्रमक(hingnghatnews)

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

hingnghatnews:हिंगणघाट :- गेल्या काही दिवसात वाघोलीला घडलेल्या 57 निष्पाप विद्यार्थाना विषबाधा झाली प्रकरणात मनसेने घेतली दखल व गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना हिंगणघाट शहर अध्यक्ष याच्या नेतृत्वात दिले निवेदन व निवेदनातून कळविण्यात आले कि ज्या अधिकाऱ्यांचं निष्काळजी पणे मुळे ही धक्कादायक घटना घडली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

त्या संपूर्ण अधिकार्यावर कारवाही करून तात्काळ निलंबित करा व विषबाधित मुलांना आर्थिक साहाय्य गोषित करा अश्या मगण्या करण्यात आल्या मनसेची टीम वाघोली जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यास तिथल्या इन्चार्ज कडून माहिती मिळाली कि शालेय पोषण अधिकाऱ्याचा गेल्या चार वर्षातून एकही राउंड झालेला नाही.

व गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सुद्धा राउंड झालेला नाही त्यामुळे समोर मोठा प्रश्न उभा होतो कि शालेय पोषण अधिकाऱ्यां शिवाय आहाराला संमती कशी मिळाली
फक्त मुख्याध्यापकच नाही तर शालेय पोषण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ज्याला आहाराच टेंडर देण्यात आले या सर्व अधिकाऱ्यावर चौकशी करून गुन्हास्पद आढलल्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे असा इशारा मनसेनी दिला.

आणि गट विकास अधिकाऱ्याला निवेदनातून सांगण्यात आले कि हे फक्त शांती निवेदन आहे पण याला फक्त निवेदन समजून फाईल मध्ये ठेऊ नये तर 15 दिवसात तात्काळ करवाही करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीच अंदोलन कराला भाग पाडू नका याची दखल आपण गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणून घ्यावी समोरील आक्रमक आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना किव्हा पदधिकारी जवाबदार राहणार नाही.

hingnghatnews:याची दक्षता घ्यावी हा संपूर्ण हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे याच्या आदेशानुसार तसेच जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर व तालुका अध्यक्ष पवन तडस याच्या मार्गदर्शनातं व हिंगणघाट शहर अध्यक्ष केतन तायवाडे याच्या नेतृत्वात घेण्यात आला यावेळेस उपस्तिथ शहर उपाध्यक्ष रमेश राऊत,कामेश बावणे, तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले,तालुका संघटक देवा काटकर, शहर सचिव योगेश नासरे, शहर संघटक स्वप्नील दाते, अजय खंदार, गोलू नरवडे,राम कांबळे,अनिकेत वानखेडे, अभिजित तायवाडे,राज भस्मे,लकी कासारे, मंगेश ससाणे आकाश पोटफोडे,सर्कल अध्यक्ष सागर घवघवे, सुरज तिमांडे, अक्षय थुल,अविनाश थुल, दिक्षु थुल इत्यादीची उपस्तीथी होती

हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महामहीम राज्यपाल साहेब यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत बसपा नेता प्रलय तेलंग व नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदना नुसार परभणी शहरा मध्ये BJP ची रैली सुरू असताना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसमोरील संविधान कृतीला तोडून संविधानाचा अपमान करण्यात आला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

तसेच बौध्द समाजानी काढलेल्या निषेधार्थ मोर्चाला उपस्थित आंबेडकरी समाजातील युवकांची पोलीस प्रशासन द्वारे जबरण कोंबिंग करण्यात आली. त्या दरम्यान पोलीस कोठडी मधील मारहाणी मुळे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कस्टडी मध्ये दुर्दैवी मृत्यु झाला.

हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)

Hingnghat:निवेदनात दोषी विरुद्ध गुन्हा दाखल करून दमनकारी असंविधनिक सरकार बरखास्त कररुन तसेच संपूर्ण बौद्ध समाजाला संरक्षण देऊन कोंबींग ऑपरेशन त्वरित थांबवावे अन्यथा बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल. सदर निवेदनात सुदेश जवादे, मोरेश्वर जवादे, रवी भगत, राजकुमार गाठले, सुनील कांबळे संजय भगत, विजय वाघमारे, अशोक मुन, हरीश नाईक, प्रदीप हाडके, अनिल नगराळे.