Home Blog Page 66

वझर आघाव जि.प.शाळेने रचला नवा इतिहास(buldhananews)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

buldhananews:नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत वझर आघाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अवैध रेती वाहतुकीच्या दंड पावतीवर खाडाखोड प्रकरणीप पाच जणांवर लोणार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल..(crimenews)

सर्व वरिष्ठ समित्यांनी लोणार तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी केली.त्यामध्ये वझर आघाव येथील शाळेचे या स्पर्धेसाठी आवश्यकठ निकष पूर्ण असल्याचा अहवाल सादर.

त्या अनुषंगाने आज गट शिक्षणाधिकारी माननिय श्री जंगलसिंग राठोड सर यांनी वझर आघाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर आघाव ला प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षीस जाहीर केले.

शाळा सुंदर करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शालेय शिक्षक कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विशेष म्हणजे ज्यांनी तन मन धनाने शाळेला मदत केली

buldhananews:त्यांचे या वेळी गटशिक्षणाधिकारी श्री जंगलसिंग राठोड सर यांनी अभिनंदन केले.यामुळे वझर आघाव येथील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला आहे

अवैध रेती वाहतुकीच्या दंड पावतीवर खाडाखोड प्रकरणीप पाच जणांवर लोणार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल..(crimenews)

0

 

तहसीलदार यांनी केलेल्या पडताळणी प्रकरण उघड

प्रतिनिधी सय्यद जहीर

crimenews:अवैद्य रेती वाहतूक प्रकरणातील शासकीय चलनात खाडाखोड केल्याचे निर्दशनास आल्या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या तक्रारीवरुन लोणार पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात साठवणूक केलेल्या रेतीची लोणार मार्गे अवैध वाहतूक केल्याचे मागील दिवसांमध्ये उघडकीस आले होते. याप्रकरणी अवैद्य रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दंड आकारून दंडाची रक्कम वसूल केली. एप्रिल ते ३० नोव्हेंबर याकालावधीत अवैद्यरीत्या रेती वाहतूक कारवाई प्रकरणाची तपासणी करण्यात आली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यामध्ये, अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात आकारलेल्या दंडाची रक्कम भरलेल्या शासकीय चलनात खोडाखाड झल्याचे निर्दशनास आले. निवासी नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे यांनी ११ डिसेंबर रोजी लोणार पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली.

त्यावरुन, विनोद डोईफोडे, गणेश हरिभाऊ चाटे, रामेश्वर वामन राठोड, अभिषेक जनार्धन कुंबफळे (सर्व रा. मंठा) व लोणार तालुक्यातील अरुण विष्णुपंत जायभाये यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ३ (५) नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात स.पो.उपनि. इंगळे हे करीत आहेत.

संबंधीत प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच वर्षभरात अवैद्य रेती वाहतूक कारवाई प्रकरण दंडाच्या भरणा झालेल्या चलनाची पडताळणी करणे सुरू आहे. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

भूषण पाटील, तहसिलदार, लोणार.

crimenews:या मागे कोण सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करून लेखा परीक्षण केल्यास खूप मोठे रॅकेट उघडे पडू शकते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणारे यामागे कोण सूत्रधार आहे याचा सुद्धा तपास करणे तितकेच गरजेचे आहे.

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे “तेजस” – द्विवार्षिक क्रीडा दिनाचा भव्य सोहळा संपन्न(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट, 13 डिसेंबर, 2024: स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट “तेजस” हा द्विवार्षिक क्रीडा दिन साजरा करताना ऊर्जा आणि उत्साहाने भरली होती .

हा कार्यक्रम म्हणजे खिलाडूवृत्ती, सर्जनशीलता आणि सांघिक कार्याचे नेत्रदीपक प्रदर्शन होता, ज्यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक यांचा उत्साही सहभाग होता.दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एका शानदार मार्च पास्टने केली, तसेच शाळेच्या बँड पथकाने अभिमानाने त्यांच्या हाऊस चे प्रतिनिधित्व करत तालबद्ध कामगिरी केली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

आदरणीय पाहुण्यांनी मशालीच्या विधीपूर्वक प्रज्वलनाने या कार्यक्रमाची भव्यता वाढवली, त्यानंतर एका मधुर स्वागत गीताने वातावरण संगीतमय झाले.पीकॉक ड्रिल, बूम बूम ड्रिल, टॅम्बोरिन ड्रिल, मॅजिक स्टिक ड्रिल, हुला हूप्स ड्रिल, फॅन ड्रिल आणि डंबल ड्रिलसह रंगीबेरंगी आणि सिंक्रोनाइझ केलेल्या कवायतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

प्रत्येक कामगिरीने विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, शिस्त आणि समन्वय यावर प्रकाश टाकला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी खेळाच्या महत्त्वावर केलेल्या विशेष सादरीकरणाने या उत्सवाला एक वैचारिक स्पर्श निर्माण केला.

विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मनोज गभने, पोलिस इंस्पेक्टर, पुलिस स्टेशन, व अशोक मिहानी, उद्योगपति स्वाद टी कंपनी, हिंगणघाट,सोबतच मेघे ग्रुप मधील सन्माननीय सबिता मॅडम यांनी या भव्य कार्यक्रमाचे अतिशय सुंदररित्या आयोजन केल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्राचार्या शिल्पा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती अंगीकारण्यासाठी आणि व्यायामाला त्यांच्या जीवनाचा नियमित भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि चारित्र्य आणि आरोग्य घडवण्यात खेळाच्या भूमिकेवर भर दिला.

सर्व शालेय प्रशासनाच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे कार्यक्रमाचे यश शक्य झाले. प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी, शाळेच्या पर्यवेक्षिका ममता दायमा आणि शैक्षणिक समन्वयक सारिका नरड यांनी प्रोत्साहन व सहकार्याबद्दल पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Hingnghat:”तेजस” हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर उत्कटतेचा, चिकाटीचा आणि एकजुटीच्या भावनेचा उत्सव होता. अशाप्रकारे द्वैवार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . ज्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकावर अतुलनीय छाप सोडली आणि विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली.

परभणी येथे दलित वस्तीतील चालविलेलेकोबींक ऑपरेशन थांबविण्यात यावे याकरिता समतेचे निळे वादळ ह्या सामाजिक संघटनेचे बुलढाणा जिल्हा अधिकारि मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनसादर.(parbhaninews)

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनीधी

parbhaninews:मलकापूर, समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हा अधीकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शिलालेखाची समाज कंटकांने नासधूस केल्याने प्रचंड जनक्षोभ निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर उद्देशिकेची विटंबना करणाऱ्यास अटक केली असली तरी दलित वस्तीमध्ये पोलिसांचे कोबी ऑपरेशन सुरू आहे. अनेक निरपराध लोकांना अटक करणे सुरू आहे. तरी या निवेदनाद्वारे मागणी आहे की-
१)विटंबना करणाऱ्याची नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीशी असलेल्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यात यावा व त्यांना अटक करावी

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

२) सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे*
३) दलित वस्त्यांमध्ये चालविलेले कोबिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे
४) असा प्रकार करणार नाही म्हणून उदाहरणार्थ शिक्षा करण्यात यावी.

सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱीमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

parbhaninews:याप्रसंगी “समतेचे निळे वादळ” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भाईअशांत वानखेडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, प्रकाश पचेरवाल, जिल्हाध्यक्ष, अशोक दाभाडे. यांच्यासह दिलीप इंगळे, शेख इमरान,माजीद खान, दीपक मेश्राम, रविभाऊ भारसाकळे, विजय सोनवणे, राजेश रायपुरे, भूपेंद्र जाधव, श्याम पवार, श्रीकांत राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

खोटे बिल सादर केल्याची तालुका कृषि कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल.(Krushinews)

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

Krushinews:बुलढाणा:-शेती हा मानवी जीवनाचा व जगण्याचा मुख्य भाग आहे.परंतू यामध्ये सुद्धा खोटे बिलच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची लेखी तक्रार तालुका कृषी कार्यालयाकडे तकारकर्ते विदया सुरेश चोपडे व सुरेश दामोधर चोपडे रा. अकोली बु. ता. संग्रामपूर जि. बुलडाणा यांनी गैरतकारकर्ते:-श्रीकृपा कृषि केंद्र प्रो.प्रा. गणेश गाळकर रा. चांगेफळ ता. संग्रामपूर जि. बुलडाणा व निर्मल सिड्स, प्रा.लि. पाचोरा, जळगाव ता. पाचोरा. जि. जळगाव यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी केली आहे.

गैरतकारकर्ते यांनी तकारकर्ते यांना बोगस बियाने विकी करुन त्या संदर्भात खोटे बील दिल्यामुळे दंडात्मक कार्यवाही करण्याचे म्हटले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

तक्रारकर्ते हे वरील ठिकाणचे रहीवाशी असुन तकारकर्ती कं. 1 यांच्या नावे मौजे अकोली खु. ता. संग्रामपुर जि. बुलडाणा येथे गट कं. 15, एकुन क्षेत्रफळ 10 हे. 18 आर. एवढे असुन तकारकर्ती हीच्या नावे 0.50 हे.आर. व 1.29 हे. आर. असे एकुन 01 हे. 79 आर. एवढे क्षेत्रफळ मालकी हक्काचे व वहीतीत आहे.

तकारकर्ता कं. 2 हे तकारकर्ती कं. 1 चे पती असल्या कारणाने सदर शेतीची वहिवाट करतात.
त्यामुळे त्यासाठी लागणारे वि बीयाने खते,औषधे सारेदी करीत असतात. सन 2024-25 खरीप हंगामाकरीता त.क.र्क. 2 यांनी वरील क्षेत्रफळा गध्ये सुर या पिकाची लागवड करण्याकरीता गैरतकारकर्ता यांच्याकडे दि. 13/06/2024 रोजी बीयाने खरेदी केलेले आहे.त्याचा इनव्हाईस नं. एस 200 हा आहे.

सदर बियाने नेउन त.क.यांनी वरील क्षेत्रफळामध्ये इतर शेतक-यां बरोबरच पेरा केलेला आहे.सदर पिक आज रोजी पाच ते सहा महिन्याचे झाले असुन आजरोजी सदर पिकाला फुलोरा व पुर्ण शेंग चरण्याच्या अवस्थेमध्ये असणे गरजेचे होते.तसेच इतर शेतक-यांच्या तुरीचे पिक बहरलेले आहे.परंतु त.क. यांची तुर पिक हे आज रोजी फक्त हीरखे असुन त्याला कुठेही फुल व फळ चारणा झालेली नाही.ते फक्त शेवरे या शहासारखे उभे असुन उत्पन्न देणारे दिसत नाही.

वास्तविक पाहता सर्व पोषक वातावरण हे इतर शेतक-यांबरोबरच त.क.यांच्या पिकाला मिळालेले आहे. त.क.यांनी सुरवातीपासुनच तुर या पिकाची प्रचंड गेहनच घेतली असुन त्याला वेळोवेळी फवारे, निंदणे, खुरपणे इत्यादी सर्व वेळोवळी दिलेले आहे.तुरीला बालपनापासुन ते आतापर्यंत जवळपास वरील क्षेत्रफळा करीता दिड लाख रु. खर्च त.क. यांनी केलेला आहे. तसेच या वर्षीचे तुरीचे पिक पाहता त.क. यांना वरील दक्षेत्रफला मध्ये 50 क्वीटर तुर पिक होण्याचा अंदाज होता,

Krushinews :परंतु गैस्तकारकर्ता यांनी बोगस बियाने दिल्यामुळे अंदाजे पाच लाख रु. नुकसान झाले आहे त्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील घटनेचा निषेध(Hingnghat)

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेले भारतीय संविधानाला काढून त्याला दगडाने फोडण्यात आले आहे.

त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

1)परभणी येथील घडलेल्याअसामाजिक तत्त्वाकडून भारतीय संविधानाला दगडाने फोडून संविधानाचा अपमान करण्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा सखोल तपास त्वरित करण्यात यावा (2) परभणी येथील भारतीय संविधानाला काढून दगडाने फोडण्यात आले.

त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत होते परंतु प्रशासनाने आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे व त्यांना मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना अनिल मून विक्रांत भगत विपुल थूल मनोज वासेकर अक्षय ब्राह्मणे सुरेश गायकवाड श्याम कांबळे निलेश गायकवाड अंकुर शेंडे स्नेहल जंगले निखिल जवादे सतीश कांबळे सोनू नंदागवळी प्रवीण जनबंधू नंदू बनसोड मिथुन धाबर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते

शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूचा सत्कार सोहळा.(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू अशा ८४ कलावंताचा सत्कार सोहळा स्थानीक साई मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सहकार नेते वासुदेव गौळकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर उपस्थित होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८४ वाढदिवसानिमित्त हिंगणघाट शहारातील ८४ युवक नागरिकांच्या सत्कार सोहळा चे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट शहर च्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी क्रीडा प्रशिक्षक शबाना कुरेशी, मुस्तफा बख्श, वैशाली वाठनकर, प्रशांत लेदाडे,अतुल झाडे, ज्येष्ठ नागरीक वासुदेव गौळकार,अशोक सोरटे, रुपेश लाजुरकर, विनोद भुते, प्रभाकरराव खोडे, डॉ.श्रिधरराव रेवतकर, कैलास आत्राम, विष्णूंनी इटनकर, शामरावजी खुडसंगे, आनंदराव धोटे अशा ८४ नागरीकांना सन्मानपत्र, शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

sharadpawar:कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोरकर तर आभार प्रदर्शन बालु वानखेडे यांनी मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अमोल बोरकर, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारुती महाकाळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, साहेबराव येडे, सुनील भुते, उमेश नेवारे,महिला शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष मीना सोनटक्के, विद्या गिरी, आशाताई कोसुरकर, आचल वकील, हेमंत घोडे, जितु रघाटाटे,गजानन महाकाळकर, सुनिल घोडखांदे,संजय गांभुळे, नदीमभाई शेख,राहुल जाधव, राजू मुडे, शाहिद शेख, रोशन दांडेकर,आकाश हूरर्ले, सुनील ठाकरे, चेतन काळे, अमर धनविज, दिनेश नगराळे, वैभव भुते,आदि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त खळेगाव येथे स्मारकाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार देवानंद सानप यांच्या हस्ते झाले उद्घाटन(Lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonar:लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला लोणार तालुक्यातील खळेगाव येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या नियोजित स्मारकाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार देवानंद सानप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यामध्ये अनिल नागरे अकोला पोलीस निवड, मंगेश नागरे धाराशिव येथे तलाठी , सतीश नागरे नागपूर पोलीस , श्रीकांत नागरे न्यायालय लिपिक अमरावती ,मनीषा सरदार न्यायालय लिपिक परभणी, कल्याणी नागरे डी फार्म मध्ये उच्च श्रेणी प्राप्त, प्रवीण वायाळ एमबीबीएस साठी निवड,

प्रतीक सानप आयआयटी मार्फत बेंगळूर येथे नामांकित कंपनीत निवड, राधेश्याम नागरे तलाठी रायगड, गणेश नागरे संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी पदी निवड, ओम प्रकाश सरोदे एमबीबीएस साठी निवड तसेच इतरही गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे शाखा व्यवस्थापक स्वप्निलजी तायडे, क्षीरसागर ग्रामसेवक, गणेश सानप मुख्याध्यापक, शेजुळसर मुख्याध्यापक, मापारी सर मुख्याध्यापक, अशोक मुंडे पत्रकार तथा गावातील शेकडो नागरीक उपस्थित होते.

Lonar:या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेता प्रतिष्ठान खळेगाव तसेच समस्त गावकरी मंडळी खळेगाव यांनी केले होते

आंबेडकर चौक ते विठोबा चौक मध्ये असणा-या (जुन्या श्रीराम टाॅकीज) जवळील चौकाला संत शिरोमणी रविदास महाराज नांव देण्यात यावे(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते विठोबा चौक मध्ये असणा-या (जुनी श्रीराम टाॅकीज) रायसोनी कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या चौकाचे नामकरण संत शिरोमणी रोहिदास महाराज असे करण्यात यावे.

एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणारा ही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल असे
समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद ह्या ओळीतूनही दिसून येतो.

हिंगणघाट शहर हे श्रमिकांचे शहर म्हणून ओळखले जाते, शहराच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोणताही श्रमिक स्व:हीत न बाळगता आपला वडीलोपार्जीत असलेला व्यवसाय समोर कसा नेता येईल यावर काम करत गेले,
पण आधुनिकतेच्या जगात नव-नवीन क्रांती घडत गेली आणी त्या स्पर्धेत कुठेतरी परिस्थितीमुळे तो व्यवसाय कमी होत गेला, एकेकाळी चर्मकार बांधवांची मोठी बाजारपेठ त्याच चौकात होती, शहराच्या बाजारपेठेत त्यांच योगदान विसरता येणार नाही, आज त्याच चौकाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे.

ते आपण त्वरित काढून त्या चौकाला एक जीवनदान देवुन *संत शिरोमणी रोहिदास महाराज असं नामकरण करण्यात यावे*, येथुनच हाकेच्या अंतरावर आठवडी बाजारात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मंदिर सुद्धा आहे,

तेव्हा त्यांची जयंती, पुण्यतिथि तथा अन्य धार्मिक कार्यक्रम करतांना अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागतों याकरीता रस्त्यांवरील अतिक्रमण काढून कारंजा चौंक ते सुभाष पुतळा जसा सौंदर्यकरण केला त्याप्रमाणे श्रीसंत शिरोमणी रविदास महाराजांचे चौंका ला नामकरण करुन मुख्य हनुमान मंदिर वार्ड पर्यन्त सौंदर्यकरण करावे अशी मागणी संत रविदास महाराज भक्तमंडळीने हिंगणघाट नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांचा एका निवेदना द्वारे करण्यात आली.

Hingnghat :अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा सुरेश गायकवाड मित्रपरिवार व समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला कैलास सुर्यवंशी, शंकर चांदेकर, निखिल हांडे, आदर्श चव्हाण, राहुल भारती, गणेश अखतकर, प्रवीण चांदेकर, आशू सोणकुवर, चरणदास हांडे,विनोद हांडे,जैश मिसारकर, संजय चांदेकर, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बांग्लादेशातील अल्पसंख्य हिंदु बांधवांवर अत्याचारांविरुद्ध बुढालणा जिल्हा भाजपाच्या वतिने निषेध आंदोलन करण्यात आले(buldhana )

0

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधि

बुलढाणा, 10,12,2024 रोजी बुलढाणा जिल्हा भाजपा च्या वतीने संताप निषेध आंदोलन करण्यात आले ,वेळ आहे

एकजूट होण्याची! बांगला देशातील अल्पसंख्य हिंदू बांधव आणि साधू-संतांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बुलढाणा जिल्हा भाजपाच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासह ठिकठिकाणी संतप्त निषेध आंदोलने करून जनजागृती करण्यात आली. यात चिखली मतदारसंघातील हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

Buldhana :बांगला देशातील सरकार पाकिस्तानच्या हातातील बाहुले झाले असून तेथे हिंदूंचा अतोनात छळ होत आहे. बुलढाणा जिल्हा भाजपाच्या वतीने अहवान करण्यात आले की याविरुद्ध जगभरातील हिंदू समाजाने एकजूट होण्याची हीच वेळ आहे.

बुलढाणा जिल्हा च्या भाजपा च्या वतीने कालच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनःपूर्वक आभार