Home Blog Page 67

प्रशांत डिक्कर यांच्या प्रचाराला सोनाळा येथुन दणक्यात सुरुवात..लाडकी बहिणी कडुन निवडणुकीच्या खर्चासाठी १ लाख ६४ हजार रुपये प्रशांत डिक्कर यांना सुपुर्द..(Vidhansabha)

0

 

महायुतीचे उमेदवार संजय कुटे यांचा गड ढासळला..

Vidhansabha:-संग्रामपूर/ परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी संत सोनाजी महाराज सोनाळा येथे महाराजांच्या दरबारात नारळ फोडुन प्रचाराची दणक्यात सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार संजय कुटे यांची ४० वर्षाची प्रस्थापित घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आता मतदार सज्ज झाला आहे. भुमीहिन शेतमजूरांचा मुलगा प्रशांत डिक्कर यांना जणतेने लोकवर्गणीतून निवडणुकीच्या विजयाच्या रिंगणात उतरवले आहे. अनेक वर्षांपासून वनवासात जीवन जगणाऱ्या गोर गरीब जनसामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करुन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी १६ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विधानसभेत पाठवा हा एकच नारा मतदारांमधे ऐकायला मिळत आहे.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

राजकीय पक्षाचे उमेदवार अब्जाधीश असल्याने प्रशांत डिक्कर यांच्या गरिबीचा फायदा घेत विरोधकांनी बदनाम करण्याचे हत्यारे उपसले आहेत. प्रचारासाठी पैसे देऊन भाड्याने आणलेल्या माणसाकडुन हे छडयंंत्र राबवल्या जात आहे. आम मार्गाने कमावलेले करोडो रुपयांचा चुराडा करून गरिबांचे नेतृत्व उदयास येऊ नये यासाठी विरोधकांनी आटोकाट प्रयत्न चालु केले आहेत.

पंरतु मतदार संघातील मतदाराने हि निवडणुक हातात घेतली आहे. प्रस्थापित घराणेशाही विरुद्ध शेतकरी शेतमजूरांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा प्रशांत डिक्कर अशी ही निवडणुक होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मतदार संघातील मुळ प्रश्न कापूस सोयाबीन भाववाढ, शेतमजूरांसाठी स्वतंत्र मंडळ, महिला बचत गटांचे प्रश्न, आदिवासी जात प्रमाणपत्र, शेतकरी, शेतमजूर, व युवकांचे प्रश्नासह ईतर प्रश्नावर प्रशांत डिक्कर विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवणार या उदांत्त अंतःकरणाने संपूर्ण जणता प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी उभी राहली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भ्रष्टाचार मुक्त व व्यसन मुक्त मतदार संघ करुन गोर गरीब मायबाप जणता आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांनी मतदार संघावर चांगलीच पकड केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मतदारांनी सोनाळा सर्कलमधुन लाडकी बहिणी कडुन २ लाख ६४ हजार रुपये लोकवर्गणी देऊन आजच प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी विजयाचा तिलक लावला आहे. त्यामुळे विरोधक चवताळून प्रशांत डिक्कर यांच्या बदनामीसाठी पाठीमागे आहेत.

Vidhansabha :-प्रशांत डिक्कर यांचे जणमाणसात खच्चीकरण व्हावे. यासाठी भाड्याने लावलेले माणसं गावा गावात जातीचे समिकरणे सांगत आहेत, धर्माचं तत्वज्ञान पाजत आहेत, मोठ मोठे खोटे लेख छापुन आणत आहेत, नको नको ते आरोप करित आहेत. पंरतु प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारात सर्वच समाज घटकातील मतदारांनी संख्येने सहभागी होऊन दणक्यात प्रचाराला सुरुवात केली असल्याने आजच संजय कुटे यांचा गड ढासळला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप खिल्लारे यांना मिळत आहे लहान मोठ्यांचा आशीर्वाद !(Lonar )

0

 

ना .. राज गट आझाद समाज पार्टीकडे वळवण्यात खिल्लारे यांना यश ?

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonar:मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामध्ये प्रमुख पक्ष हा प्रमुख घटक पक्ष असून पक्षाने दिलेली उमेदवारी व अपक्ष उमेदवारी यामध्ये बरेच अंतर असणार आहे.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

गेल्या चार महिन्यापासून मेहकर मतदार संघामध्ये पाय रोवून असलेले आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप खिल्लारे यांनी चांगलेच कंबर कसली असून मेहकर मतदार संघामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता गाठीभेटी त्यांच्या सुरूच आहे संपर्क सुरूच आहे तरुणापासून तर ज्येष्ठापर्यंत आशीर्वाद त्यांना मिळत आहे लोकांचा प्रतिसाद सुद्धा त्यांना मिळत आहे ,विशेष म्हणजे बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त ओबीसी माळी त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजामधून सुद्धा मोठे बळ खिल्लारे यांना मिळत आहे

,खिल्लार हे मेहकर मतदार संघात जॉईंट किलर म्हणून नक्कीच भूमिका बजावणार आहे
कासव आणि ससा ची गोष्ट सर्वांनाच माहित आहे त्यामुळे सध्या संदीप खिल्लारे मोठा गाजावाजा न करता कासवाची चाल खेळताना दिसत आहे ,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मोठा अल्पसंख्याक समुदाय त्यांनी त्यांच्याकडे ओढला आहे त्याचबरोबर नाराज अनेक जण असलेले नेतेमंडळी मग ते इतर पक्षात असो त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मनधरणी करून वळवली आहे

Lonar :-,त्यामुळे सध्या मेहकर मतदार संघामध्ये आझाद समाज पार्टीचे पारडे नक्कीच जड भरत आहे इतर पक्ष त्यांना कमी लेखत असली तरी मतदान मात्र आजाद समाज पार्टीचे भर भक्कम असणार आहे यात शंका नाही .खासदार चंद्रशेखर आझाद यांची छबी अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य करत असून मेहकर येथे त्यांचे लागणारे सभा हे निकालाचे चित्र स्पष्ट करणारे असणार हे मात्र नक्की .

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

0

 

Buldhanaurbanbank:वाशिम :- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाशिम च्या मानोरा तालुक्यातील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊस विठोली शाखेत शेतकरी आणि व्यापारी आकाश देशमुख या शेतकऱ्याने १६२ क्विंटल टूर आणि ९६ क्विंटल सोयाबीन असा अंदाजे ३० लाख रुपयांचा शेतमाल कारण करून ठेवलेला होता. मात्र शेतकऱ्यांनी ठेवलेला शेतमाल बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी कटकारास्थान रचून बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष आणि दोन्ही विभागातील विभागीय अध्यक्षांच्या सांगण्यावरून गोदाम व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

गोदामतील शेतकऱ्याचा शेत माल परस्पर विक्री करून मालाचे पैसे हडप केले असल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय.

या बद्दल बँकेच्या कर्मचाऱ्या विरुद्ध ३० लाख रुपये रकमेचा शेतमाल परस्पर विकून शेतकऱ्याची आर्थिक हानी करून फसवणूक केली आहे. सदर प्रकार डिसेंबर २०२२ मध्ये घडले होते. मात्र, आर्थिक देवाण-घेवांमुळे गुन्हा दाखल होत असल्याने शेवटी तक्रार कर्त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि यावर न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्यास न्याय देत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक सह इतर ५ जणांवर फसवणूकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.यात सुकेश ब्रिज मोहन झवर, अमोल प्रल्हाद शिंदे विभागीय व्यवस्थापक वाशिम विठ्ठल तोताराम दवळी बुलढाणा अर्बन विभागीय व्यवस्थापक अकोला श्रीकांत भालचंद्र डांगे शाखा व्यवस्थापक मानोरा, अनिल श्रीराम राठोड गोदाम व्यवस्थापक, विठोली तालुका मानोरा आणि इतर संबंधित सर्व कर्मचारी यांनी संगमत करून बुलढाणा वेअर हाऊस मध्ये तारण ठेवलेला क्विंटल शेतमाल परस्पर विक्री केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम च्या मानोरा पोलीस स्टेशनला भादवि कलम ३७९, ४०६, ४२०, ०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhanaurbanbank:-विशेष म्हणजे याच बुलढाणा अर्बन बँकेच्या इतर शाखेतही काही महिन्यांपूर्वी हरीश चांडक नामक पदाधिकाऱ्याने पन्नास लक्ष रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचेही समोर येत आहे.

ऐन दिवाळीत शेतकर्याची गळफास घेऊण आत्म हत्या (suicide)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

suicide:-किनगाव जटुटु येथील शेतकर्याने ऐन दिवाळीत गळ फास लाऊन आत्म हत्या केल्याची घटना घडली आहे.

किनगाव जटुटु येथेल शेतकरी लक्ष्मण दादाराव सोरमारे वय वर्ष 37 या शेतकरी ने आपल्या राहत्या घरी ऐन दिवाळीच्या एक दीवस अगोदर गुवार दि.31.10.2024 ला गळफाल लाऊन आत्म हत्या केली आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सविस्तर असेकी गुरुवार सकाळी घरचे सर्व जन शेतात गेलेले असत्तांना लक्ष्मण दादाराव सोरमारे यांनी आपल्या राहते घरी दुपारी 12.20 च्या सुमारास घरातील लोखंडी ऐंगलला रूमालाचे सहायाने गळफास लाऊन आत्म हत्या केली.

suicide:त्यांच्या पच्यात पत्नी रूख्मिणा लक्ष्मण सोरमारे,दोन मुले शंकर लक्ष्मण सोरमारे, विठ्ठल लक्ष्मण सोरमारे,व एक मुलगी असा परिवार आहे.

अतुल वांदिले यांची निवडणूक प्रचारसभेने वेधले लक्ष!(Vidhansabha)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Vidhansabha :हिंगणघाट :- कोरा या गावात दिवाळीच्या तोंडावर दी. 31 आक्टोम्बरला रात्री असलेली निवडणूक प्रचारार्थ सभा व त्यामध्ये उपस्थित असलेला कोरा सर्कल मधील जनसमुदाय पाहता. सत्ताधारी विरोधात असलेला आक्रोश या निमित्य दिसत आहे. अशी जण भावना निर्माण झाली का ?

यामुळे हिंगणघाट विधानसभेत समीर कुणावार विरुद्ध अतुल वांदिले यांची लढत होणार सुरुवातीला एकतर्फी विजय होणार असे म्हणणारे यांनी आजची सभा पाहून अतुल वांदिले हे सुद्धा बाजी मारू शकते !

श्री संत सखु माऊली यांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव(Hingnghat)

Vidhansabha :त्यामुळे हिंगणघाट विधानसभेत कोण बाजी मारेल? हे चित्र सध्या तरी दिसत नाही. हिंगणघाट विधानसभेत कोण जिंकेल व कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही हेच झालेल्या प्रचार सभेतून जनतेच्या चर्चा परामर्श मधून पुढे आले. शेवटी जो जीता वो सिकंदर !

श्री संत सखु माऊली यांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव(Hingnghat)

0

 

 

प्रतिनिधि। गुड्डू कुरैशी

सप्ताभर वारकरी भजन आणि किर्तनाची मेजवानी

Hingnghat:-सिंदी रेल्वे ता.१: महाराष्ट्रातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र विदेही श्री संत सखुआईचा अखंड हरीनाम पुण्यतिथी महोत्सव सोहळा दिनांक ३१/१०/२४ ते ०७/११/२४ पर्यंत पळसगाव बाई येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री संत सखुआई देवस्थान पंच कमेटी व श्री चे भक्तगण वतीने पुण्यतिथी महोत्सव साजरी करण्यात येते.

प्रसंगी दिनांक ३१तारखेला गुरुवारी अखंड विना प्रारंभ होऊन सप्ताहभर वेगवेगळे उत्सानिमित्त कार्यक्रम भजन व कीर्तन होत असतात,

शुक्रवारी (ता.१) रात्री ८ ते १० पर्यंत वारकरी भजन मंडळ पळसगाव बाई यांचे भजन दिनांक २ ला शनिवार रात्री ८ ते १० पर्यंत श्री संत सखु आई महिला भजन मंडळ पळसगाव दी ३ रो रविवारला रात्री ८ ते १० अमरसती महिला भजन मंडळ पळसगाव सोमवार श्री संत सखु आई महिला भजन मंडळ पळसगाव मंगळवार रात्री ८ ते १० श्री समर्थ गुरुदेव

सेवा मंडळ दहेगाव गो संयोजक ह भ प राजाभाऊ सावरकर दी ६ रो बुधवार ला ८ ते१० पर्यंत राष्ट्रीय कीर्तनकार व खंजेरी वादक कुमारी क्रांती काळे सत्यपाल महाराज यांची शिष्य राहणार साखरी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांचे कीर्तन दिनांक ७ ला गुरुवार पहाटे ३ ते ६ शोभायात्रा सकाळी १०ते १ गोपाल काल्याचे किर्तन ह भ प श्री गजानन महाराज कपिले व संच हिंगणघाट व सात संगत वारकरी

भजन मंडळी पळसगाव व भोसा दुपारी १ ते ४ शोभायात्रा ४ वाजता दहीहंडी व महाप्रसाद चे आयोजन केलेले असते, श्री संत सुख आईचे हजारो भाविक या निमित्ताने गावाला भेट देत असून श्रीचे सरणी नतमस्तक होऊन उत्सव साजरा होत असतो,

दिवाळीच्या कार्यकाळात यात्रा असल्याने दरवर्षी सुट्ट्या असल्यामुळे दुरून दुरून भाविक येत असतात, भाविकांना सर्व सुविधा देवस्थानच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात.

Hingnghat:देवस्थान अध्यक्ष श्री सुरेश लेंडे यांनी पुण्यतिथी महोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

80 हजाराचा मोबाईल चोरणारा 12 तासात रंजन तेलंग यांनी केला गजाआड(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख सहअमिन शेख

shegaonnews:-सविस्तर वृत्त असे की दिनांक 30 ऑक्टोबर रोजी शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग हॉल मधून झोपेत असलेले यात्री गौरव शेंडे यांचा 80000 रु किमतीचा आयफोन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला याची माहिती रंजन तेलंग यांना मिळाली तेलंग यांनी लगेच स्टेशनवर जाऊन cctv चेक केले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

तोपर्यंत मोबाईल चोरटा तेथून पसार झाला पण तेलंग यांनी त्यांच्या सर्व गुप्तहेर यांना सांगून ठेवल्याने चोरटा रेल्वे स्टेशन परिसरात असताना गुप्त माहिती वरून तेलंग यांनी 12 तासाच्या आत त्याला पकडले.

shegaonnews:-व याची माहिती जीआरपी शेगाव चे हेड कॉन्स्टेबल पंचकृष्ण खिराडे यांना दिली व आरोपी प्रमोद सोनोने याला पडकून जीआरपी शेगाव यांच्या ताब्यात दिले, रंजन तेलंग यांनी 80000रु च्या मोबाईल चोरीचा 12 तासात छडा लावल्याने पुन्हा त्यांच्या दमदार कार्यवाही ने आरपीएफ विभागाचे नावलौकिक प्रकाश झोतात आले

सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ संकल्पनेतून सुगंधी उठणे वाटप ; जनआधार फाऊंडेशनचा उपक्रम !(diwali)

0

 

diwali:-सोलापूर : ‘सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ या उपक्रमाच्या माध्यमातून, दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने जनआधार फाऊंडेशनकडून संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन सुगंधी उठणे वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

‘सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ या उपक्रमातंर्गत गेल्या ५-६ वर्षांपासून परिसरामध्ये जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जातो. रविवारी, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी जवळपास २ हजारांहून अधिक कुटुंबियांना घरोघरी जाऊन नागरिकांना सुगंधी उठणे वाटप करण्यात आले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सुगंधी उठणे हा अगदी अगरू उद, चंदन, कस्तुरी, केशर ईत्यादी सुगंधी पदार्थापासू केलेल मिश्रण असते. हा अंगास लावुन शरीर/चेहरा स्वच्छ होऊन कांती उजळते. नागरीकांना उठणे वापरण्याची माहिती देऊन शुभेच्छा संदेश देण्यात आले. नागरिकांनी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनाही दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

diwali:-यावेळी जनआधार फाऊंडेशनकडुन महेश दासी, शाम कोटा, ऋषीकेश चिलवेरी, दिनेश सुरा, दिनेश श्रीकोंडा, शंकर म्हंता, हर्षित गोसकी यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना कोणतेही समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधण्याचं आवाहन आनंद गोसकी मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय.

यावल येथे,मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या पथनाटय जनजागृतीस चांगला प्रतिसाद(Yavalnews)

0

 

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yavalnews:-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येत असून या मतदान जनजागृती कार्यक्रमास सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावल-रावेर विधानसभा मतदारसंघांमध्ये तालुक्यात पंचायत समिती,महसूल विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” या पथनाट्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने प्रबोधनात्मक सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,पंचायत समिती बीडिओ डॉ.मंजुश्री गायकवाड,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके,केंद्रप्रमुख शाकीर सर कविता गोहिल,मुख्याध्यापकजी.डी.कुलकर्णी,ए.एम.गर्गेजी.एन.खान व यावल तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

येथील बस स्थानकात सरस्वती विद्यामंदिरचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले लिखित” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो “या पथनाट्याचे मतदान जनजागृती पर सादरीकरण करण्यात आले.यामध्ये मतदारांना मतदार नोंदणी पासून ते मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन करून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त मतदान करून वाढवावी यासाठी प्रबोधन करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पथनाट्यमध्ये सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी संचित कोळी महाराज,यश वारके,विनायक बारी व उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी विविध भूमिका साकारत पथनाट्याचे सादरीकरण केले.या पथनाट्यासाठी आगार प्रमुख दिलीप महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले.

Yavalnews:-गट विकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी सुद्धा मतदान जनजागृती साठी नागरिकांना आवाहन केले.आभार डॉ.नरेंद्र महाले यांनी मांडले.कार्यक्रमाच्या प्रसंगी तालुक्यातील सर्व प्रसार माध्यमांच्या पत्रकार बंधूंनी हजेरी लावून या मतदान जनजागृती प्रबोधनामध्ये मोलाचे सहकार्य केले.तर येथील सरस्वती विद्यामंदिर,डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल,इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल,बाल संस्कार विद्या मंदिर या शाळांचे विशेष सहकार्य लाभले.

आझाद समाज पार्टीच्या वतीने मेहकर मतदार संघात संदीप भाऊ खिल्लारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल(Vidhansabha)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

संदीपभाऊ खिल्लारे यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना तगडे आव्हान

बुलढाणा

Vidhansabha:मेहकर मतदार संघामध्ये अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही पक्षातील उमेदवारांनी तर काही अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे .

मेहकर मतदार संघामध्ये गेल्या दोन महिन्यापासून लोकांच्या भेटी घेत असलेले आझाद समाज पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार युवकाचे मजबूत संघटन असलेले संदीप भाऊ खिल्लारे यांनी आपला उमेदवारी अर्ज 29 ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे ‘

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

आपल्या समर्थकासह फटाक्याच्या आतिषबाजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ‘ सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘महात्मा ज्योतिबा फुले ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ‘ त्याचबरोबर पीरबाबा दर्ग्यावर चादर चढून आशीर्वाद घेऊन सदर उमेदवारी अर्ज दाखल केला

यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण गवई जिल्हा संपर्कप्रमुख आझाद समाज पार्टी ,संदीप इंगळे महासचिव आझाद समाज पार्टी बुलढाणा , मेहकर तालुकाध्यक्ष राहुल मोरे ‘ तालुका उपाध्यक्ष अमोल गवई ,सचिन खंडारे ,बबन सरकटे , सावन सरकटे ,माधवराव सरकटे किरण इंगळे ,ठोके ‘ मिलिंद खडसे ,गणेश चव्हाण ,विजय नरवाडे , अडागळे ,,पंजाब कंकाळ , गुलाब कंकाळ , शेख ,संतोष जैस्वाल , अस्लम मंजूम ,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रतिक्रिया

आझाद समाज पार्टी यांच्यावतीने
मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खासदार चंद्रशेखर आझाद यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी मला उमेदवारी दिली . मेहकर मतदार संघात विकास करण्यासाठी त्याचबरोबर राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी मी लढा उभारत आहे.

Vidhansabha :-अनेक लोकांचे समर्थन मला असून अनेक पक्षांचा सुद्धा पाठिंबा आहे त्यामुळे मेहकर मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी मी निवडणुकीत उभा असून लवकरच मेहकर येथे परिवर्तन सभा आयोजित केली जाणार आहे .
संदीप खिल्लारे
अधिकृत उमेदवार आझाद समाज पार्टी मेहकर