Home Blog Page 68

सुमित रामकिसन खंडारे राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (Mehkar)

0

 

Mehkar:बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा आयोजित तथागत ग्रुप राज्य सामाजिक संघटना राजमाता जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट व जिजामाता हॉस्पिटल महिला आरोग्य केंद्र सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने मेहकर येथे भव्य रक्तदान शिबिर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भव्य सत्कार समारंभ व क्षत्रिय राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आहेत करण्यात आले.

होते,यावेळी सुमित रामकिसन खंडारे जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार, तथा संचालक इन्स्पायर कोचिंग क्लासेस मेहकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष संदीप गवई होते,

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

मार्गदर्शक म्हणून सुनील होणारे अकोला होते, सुमित रामकिसन खंडारे यांनी आजपर्यंत सामाजिक व पत्रकारिता मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल दखल घेत, सामाजिक कार्याची, व पत्रकारिता यासाठी केलेले कार्य त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जनप्रहार संघटनेच्या‌ माध्यमातून वेळोवेळी कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहिले,मेहकर मध्ये नोंदणीकृत कामगारांना दोन वेळेचे भोजन सुरू करण्याचे कार्य यांनी केले,

Mehkar:विविध प्रकारच्या कामगारांच्या योजनांसाठी कार्य केले, तसेच इन्स्पायर कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अल्प दरात शिकवण्याचे कार्य केले, तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता, प्रत्येक बातमी ची दखल घेत असतात, या सर्व कार्याची दखल घेत सुमित रामकिसन खंडारे यांना राज्यस्तरीय साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आज उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांनी दाखल केले नामांकन पत्र.( Vidhansabha)

0

 

[जळगाव (जामोद) येथे गर्दी होवून यात्रेचे स्वरुप.]

Vidhansabha:संग्रामपूर ः- विधानसभेच्या निवडणूक २०२४ करीता दि.२२/आॕक्टोबर पासूनउमेदवारी भरण्यास सुरवात झालेली होती, आज दि.२९ /आॕक्टोबर अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षाचे अधिकृत व अपक्ष इच्छुकांनी ,पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मतदार जळगाव (जामोद) येथे दाखल झाले .

त्यांनी प्रथम जाहीर सभा घेवून भव्य प्रचार रॕली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि.२८/पर्यंत ६७ व्यक्तींनी ११० अर्ज घेतले आहेत.त्यामध्ये काही राजकीय पक्षासह १०जणांनी उमेदवारी दाखल केली असून आज दि.२९/रोजी शेवटच्या दिवशी

आज उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांनी दाखल केले नामांकन पत्र.( Vidhansabha)

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

महाविकास आघाडी कडून काँग्रेस च्या डाॕ.स्वाती वाकेकर,वंचित कडून डाॕ.प्रविण पाटील,मनसे कडून अमित देशमुख ,तसेच इतर इच्छुकांनी अपक्ष आपली शक्ती पणाला लावून जळगाव (जा.) येथे वरवट(बकाल)-जामोद कडे

Vidhansabha:जाणाऱ्या रस्यावरील जिनींग मधील खुल्या प्रांगणात सभा घेवून वाजत गाजत पायी प्रचार रॕली काढून जळगाव (जा.) येथील विधानसभा निवडक कार्यालयात उमेदवारी नामांकन पत्र दाखल केले.ह्यासाठी जळगाव (जा.) मध्ये जिकडे तिकडे तुफान गर्दी दिसून येत आहे. जणूकाही यात्रेचे स्वरुप आले होते.

हजारो समर्थकांच्या साक्षीने डॉ. गोपाल बछिरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल(Vidhansabha)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Vidhansabha:मेहकर हजारो समर्थकांच्या साक्षीने डॉ. गोपाल बछिरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आज मेहकर येथील निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला

डॉ. बछिरे हे नाव म्हणजे एक आंदोलक एक संघर्ष करता शेतकरी, कष्टकरी, युवा बेरोजगार, महिला, दिव्यांग व अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी भांडणारे त्यांना न्याय मिळवून देणारा असा योद्धा म्हणून त्यांची ओळख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. बछीरे यांनी जेव्हा मतदार संघातून शिवसेना आपलं अस्तित्व शोधत होती.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अशा पडतिच्या काळात शिवसेनेचे संघटन पुनर्बांधणी केली, शिवसेनेला नव संजीवनी दिली आणि ऐनवेळी विधानसभेचे त्यांचे तिकीट कापण्यात आले आज त्यांनी हजारो समर्थकांची रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले व अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

Vidhansabha:त्यांची लोकप्रियता पाहून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल कसा येईल याविषयी सूत्रांच्या माहितीने कळते ही निवडणूक प्रस्थापित व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना सोपी जाणार नाही.

प्रचंड शक्ती प्रदर्शन” करत नागवंशी संघपाल पनाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल( Vidhansabha)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Vidhansabha:सर्वप्रथम संत गजानन महाराज, पंचपिर दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्थळांना वंदन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात करण्यात आली.

मेहकर लोणार मतदार संघातून प्रचंड मायबाप जनता उपस्थित झाली होती.यावेळी सर्व समजाचे, धर्माचे, पंथाचे, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकच जयघोष करत गर्जना केली एकच वादा नागवंशी संघपाल दादा संघपाल दादा म्हणजेच मेहकर मतदार संघाचा विकास अशा घोषणेने संपूर्ण मेहकर शहर दणाणून सोडले,यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपले मत मांडले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्यामध्ये युवा नेते अनित्य घेवंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नागवंशी संघपाल पनाड यांना घराघरात पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे.

आपणच आपला विकास करण्यासाठी या उमेदवारांना उभे केले आहे त्यासाठी सर्वांना आपल्या उमेदवाराचे नाव चिन्ह आणि पक्ष हे कसे घराघरात पोहोचेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, येणारा काळ हा आपलाच आहे परंतु आपल्यावर आरोप प्रत्यारोप आरोप होतील, त्याला कुठेही बळी न पडता सर्वांनी नागवंशी संघपाल पनाड यांना ना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

उपस्थितामध्ये तोफीक अली, अख्तर भाई, शाकीर भाई पठाण, बळीभाऊ मोरे,फेरोज गवळी,संतोष भाऊ शिंदे संतोष,सद्दाम भाई,पाटील, गणेश भानापुरे शाकीरभाई पठाण दीपक भाऊ आंभोरे ,महेंद्र मोरे, नागसेन पनाड, महेंद्र पनाड, निळकंठ गवई, रमेश पवार,प्रदिप सानप, अनिल पवार,अनिल आनंदराव,शुध्दोधन सरदार, बिंबीसार पनाड, प्रसेंजीत पनाड,संजय शेजुळ,महेश मोरे, सागर पनाड, विशाल

पनाड,राजहंस जावळे, संदेश पनाड, दादाराव पनाड ,राहुल साळवे,रंजीत मोरे विलास खरात, बाळु मोरे, तुळशीराम पनाड, वंशीळाबाई पनाड, सुमनबाई पनाड,सिंधुबाबाई पनाड,हरनाबाई चव्हाण,पाडमुख बाई,नंदाबाई पनाड, कमलबाई पनाड,विजय माला गवई, रूक्मिणीबाई पनाड,केसरबाई गवई,सर्व मायबाप जनतेचे आभार मानले,की माझ्या एकावर हाकेवर आपण या ठिकाणी उपस्थित झालात.

Vidhansabha:त्याबद्दल मी मनाच्या गाभाऱ्यातून सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा न जाऊ देता, मी मतदार संघाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय मी थांबणार नाही अशी भावना व्यक्त केली.यावेळी महिला पुरुष कार्यकर्ते सर्व समाजाचे नेतेमंडळी उपस्थित होते.

बैलगाडीत उभे राहून भव्य रॅली काढून प्रशांत डिक्कर यांनी भरला उमेदवारी अर्ज.(Vidhansabha)

0

 

Vidhansabha:-संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- निवडणूक उमेदवारी दाखल करण्याची धूम आणि दिवाळीची लगबग व धामधूम अश्या या धामधुमीत शेतकरी शेतमजुरांसाठी संघर्ष करणारा रांगडा गडी म्हणजे स्वाभिमानी चे (राजीव शेट्टी समर्थित) युवा नेता प्रशांत डिक्कर यांनी सजवलेल्या बैलांसह बैलगाडीत उभे राहून भव्य प्रचार रॅली काढून आज दि .२८/ ऑक्टोबर रोजी जळगाव (जामोद) विधानसभे करीता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शेतकरी शेतमजुरांचा धगधगता निखारा म्हणून गेल्या १६ वर्षापासून रस्त्यावर संघर्ष करणारा एका खेड्यातील शेतमजुराचा पोरगं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुढे आलं अन् युवा नेता बनलं. गावगाडा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, दडपशाही विरुद्ध लोकशाही, कष्टकऱ्यांचा आवाज उठवणाऱ्या व गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचा न्याय मिळावा.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

ह्या उद्देशाने काम करणारा व यापुढेही त्यांना न्याय मिळावा. ह्याकरीता लोक वर्गणीतून पुन्हा यावर्षीच्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरला आहे.

आणि आज दि.२८/ आॕक्टोबर रोजी जळगाव (जामोद) शहरात सजवलेल्या बैलगाडीत उभे राहून हजारांच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकरी, शेतमजुरांसह भव्य रॅली काढून विधानसभेसाठी जळगाव (जामोद) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Vidhansabha:-त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि हा जड जाणार असे धनशक्ती असणाऱ्यांना वाटत आसल्याची चर्चा सुरु आहे,

महाविकास आघाडीची हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची उमेदवारी अतुलभाऊ वांदिले यांना जाहीर(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा उमेदवारी करिता आपल्यालाच मिळावी या करिता कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातिल नेते यांची मागणी होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची पकड अधिक मजबूत असल्यामुळे या ठिकाणी उमेदवारी आपल्याला मिळावी.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

या करिता अतुल वांदिले, सुधीर कोठारी, राजु तिमांडे यांनी शरतीचे प्रयत्न केले. इतकेच नाहीतर या ठिकाणी अतुल वांदिले गट, राजू तीमांडे + सुधीर कोठारी गट यांनी कार्यकर्त्याचे वेगवेगळे ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेतला उमेवारी आपल्याला मिळेल त्यामुळे .

त्यामुळे या ठिकाणी सीट कोणाला मिळेल ? याची चर्चा होती. अतुल वांदिले यांनी ग्रामीण तसेच शहरी भागात परिवर्तन यात्रा काडुन तसेच मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला पक्षाशी जोडून पक्ष वाडविला त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्व यांनी अतुल वांदिले यांना हिंगणघाट विधानसभेतून महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज दि. 27 ऑक्टोंबर ला उमेदवारी घोषित केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:उमेदवारी घोषित होताच पक्ष कार्यालयात फटाके फोडून जल्लोष केला. पुढे राजु तिमांडे + सुधीर कोठारी काय निर्णय घेतात या कडे लक्ष लागले.

एल्गार बैठकीला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा. मेहकर-लोणार(Lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड
शिव, फुले, शाहू ,आंबेडकर, मौलाना आझाद, चळवळीच्या तमाम माझ्या बंधू-भगिनींना तथा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्रातील, माझ्यावर प्रेम करणाऱ्या व शुभचिंतकांना आवाहन करण्यात येते की.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करून मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला “एल्गार “पुकारायचा आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

तरी तमाम जनतेने हजारोंच्या संख्येने सुलतानपूर येथे दि.२७/१०/२०२४ ठिक दुपारी १२: वाजता उपस्थित राहावे ही विनंती.

Lonar :आपला हक्काचा माणूस, आंदोलन सम्राट, नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा नेते.

बिबी पोलिसांनी जनावरे चोरणाऱ्या आरोपीला केले जेरबंद(policenews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

policenews:सविस्तर वृत्त असे की दिनांक 21- 10 -2024 रोजी 2/45 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन बीबी हद्दीत एक बोलेरो पिक अप वाहन संशयित रित्या आढळून आल्याने सदर वाहनाचा पाठलाग बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील परमेश्वर शिंदे ना पोको अरुण सानप भारत ढाकणे यांनी पाठलाग केला.

असता सदर वाहन हे दुसर बीड येथील समृद्धी महामार्गावर गेल्याने सदर वाहनाचा पाठलाग छत्रपती संभाजी नगर पर्यंत केला छत्रपती संभाजीनगर येथे सावंगी नाका भागात पिकप वाहन हे पोलिसांची नजर चुकवून पसार झाले त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे स्थानिक पोलिसांना माहिती देऊन पोलीस स्टेशन बिबी च्या पथकाने कसुन तपास करून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल सावंगी नाका गणोरी भागात बोलोरो पिकप वाहन व आरोपी चोरून नेलेली जनावरे यांचा शोध घेत असताना जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मोरक्या पोलिसांना मिळून आला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून पोलीस स्टेशन बिबी हद्दीतील किनगाव जट्टू येथील चोरून नेलेली 5 जनावरे हरसुल भागातून आरोपीच्या कब्जातून पंचा समक्ष जप्त करून मालकांच्या ताब्यात देण्यात आली

मुख्य आरोपी शेख रहीम शेख समृद्धीन वय वर्ष 32 रा हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी यास अटक केली नमूद आरोपी यास पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्या संबंधाने विचारपूस करून दिनांक23-10-2024 रोजी येथून जनावरे चोरी करणारे आरोपी चोरी करण्यासाठी वापरत असलेले बोलेरो पिकअप वाहन सेंट्रल नाका हद्दीतून जप्त करण्यात आले आहे.

सदर बाबतीत पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल अपराध नंबर 216/2024 कलम 303 (2)BNS चे गुन्ह्यातील चोरी केलेली चार जनावरे किमत एक लाख 25 हजार रुपये व एक बोलेरो पिकप वाहन किंमत 4 लाख रुपये असा एकूण पाच लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पोलीस स्टेशन बिबी येथे पोलीस कोठडीमध्ये असलेला आरोपी नामे शेख रहीम शेख खमरुद्दीन वय वर्षे 32 रा हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी छत्रपती संभाजी नगर याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल जनावर चोरीचे एकूण पाच गुन्हे दिनांक 28- 7 -2024 दाखल असलेले अप नंबर 296/2024 पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे दाखल अप नंबर 145/2024 पोलीस अप नंबर 164/2024 पोलीस स्टेशन नंबर 482/2024 दाखल अप नंबर 210/2024 पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार यांनी उकल करून गुन्हे उघड केले आहे सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करण्यात आले.

policenews:असून त्या संबंधाने तपास सुरू आहे सदर कार्यवाही माननीय अधीक्षक विश्व पानसरे बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बि बी महामुनी -अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ रामेश्वर शिंदे -पोलीस हेड कॉन्स्टेबल- गजानन चतुर – ना पो का अरुण सानप- पोलीस कॉ भारत ढाकणे -पोलीस कॉ रवींद्र बोरे- पोलीस कॉ यशवंत जवळ -(सायबर सेल) ऋषिकेश खंडेराव यांनी ही कारवाई केली आहे

न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonar:दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीचा प्रस्ताव आयुक्तानी एक महिन्यात वेतनत्रुटी समितीस सादर करावा व समितीने प्रस्ताव पाच आठवड्यात निकाली काढावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

या आदेशामुळे दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीची मागणी लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने दिव्यांग शाळेतील वसतिगृह अधिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

राज्यात दिव्यांग शाळेतील वसतिगृह अधिक्षकांच्यी संख्या जवळपास ३६० आहे . संहितेनुसार ६ व्या वेतन आयोगात वसतिगृह अधीक्षकांना ५२००-२०२०० ग्रेड पे २८०० मिळणे अपेक्षित असतांना ५२००-२०२०० ग्रेड पे १९०० वेतनश्रेणी देण्यात आली.

या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा संलग्न वसतिगृह अधीक्षक-गृहपाल महासंघाने शासनाकडे वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ७ व्या वेतन आयोगात $10 अपेक्षित आहे. वसतिगृह अधिक्षकावर वेतनश्रेणी बाबत होत असलेला अन्याय वसतिगृह अधीक्षक संघटनेने शासना समोर ही मांडला आहे.

शासनाने सातव्या आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करीत दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना दिले होते मात्र अद्याप या बाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. राज्यातील शासकीय वसतिगृहातील

अधीक्षक असो की दिव्यांग निवासी शाळेचा

वसतिगृह अधीक्षक दोघांनाही समान काम असताना वेतनश्रेणी वेगळी हा दिव्यांग निवासी शाळेच्या वसतिगृह अधीक्षकांवर हा अन्याय असल्याने समान काम समान वेतन या शासनाच्या धोरणानुसार शासकीय वसतिगृह अधीक्षकांप्रमाणे वेतन देण्यासाठी दिव्यांग निवासी शाळेच्या वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी यासाठी दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दोन्ही बाजूच्या युक्तिवादा नंतर न्यायालयाने दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीचा

Lonar :प्रस्ताव आयुक्तानी एक महिन्यात वेतनत्रुटी समितीस सादर करावा व समितीने प्रस्ताव पाच आठवड्यात निकाली काढावा असे आदेश दिले आहेत. आता तरी वेतनदुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा वसतिगृह अधीक्षक संघटनेचे प्रविण अवसरमोल यांनी व्यक्त केली आहे.

सैलानी येथे भर रस्त्यावर वेंकीज ग्रुप म्हणून नावाजेल असलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांची मनमानी(buldhana)

0

 

जावेद शाहा बुलढाणा

buldhana:सैलानी दर्गा येथे दररोज राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते परंतु वाहन चालक हे त्यांचे वाहन पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर मधोमध उभे करताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

तसेच सदर रस्त्याला गतिरोधक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व अपघात घडून जीवित हानी होण्याची शक्यता

 

सैलानी येथे भर रस्त्यावर वेंकीज ग्रुप म्हणून नावाजेल असलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांची मनमानी(buldhana)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सुद्धा नाकारता येत नाही तरी बंधितांनी वाहतूक शाखेतील लोकांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Buldhana :तसेच द्याच्या दृष्टिकोनातून वाहतुकीस शिस्त लावण्याची गरज आहे तरी पोलीस स्टेशन रायपुर येथील वाहतूक अंमलदार यांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याबाबत नागरीकांना मधूण मागणी होत आहे