Home Blog Page 701

जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खामगाव कोविड सेंटर येथे मृत्यू

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील 55 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट 29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता व तो रुग्ण खामगाव कोविड सेंटर ला उपचार घेत होता परंतु आज सकाळी त्याचा तेथे मृत्यू झाला व जामोद येथे कोविड नियमानुसार त्याचा अंत्यविधी केल्या जाणार आहे

संग्रामपूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर राहील दोन दिवसाकरीता बंद

 

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

 

कोरोणा चा प्रादुर्भाव पाहता संग्रामपुर तालुक्यात आतापर्यंत 48 रुग्ण आढळून आले त्यामधील 44 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर येथील शेगाव रहिवासी एक कर्मचारी यांची काल तपासणी करण्यात आली रपीड टेस्टमध्ये सदर कर्मचारी पॉझिटिव निघाला,त्यामुळे आज बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर ही बंद करण्यात आली असून या शाखेमधील आठ ते नऊ कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र संग्रामपूर येथे तपासणीसाठी नेण्यात आले.बँक शाखा संपूर्णतः सॅनिटायज करण्यात आली .बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्मचारी पॉझिटिव निघाल्याने शाखेतील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ताबडतोब बँक खाली करण्यास सांगितल्यानंतर बँक खाली करून बँकेला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर बँकेच्या बाहेर एक बोर्ड पण लावण्यात आले की बँकेमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव निघाल्याने बँक बंद आहे.उर्वरित आठ ते नऊ कर्मचाऱ्याची आर्टिफिशर तपासणी करून दोन दिवसानंतर बँक पूर्ववत सुरू होईल अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर वाढे यांनी दिली

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

 

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

भूमिपुत्र च्या लढ्याला यश
अखेर झाले पंचनामे सुरू
अतिवृष्टीने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांचे उडीद मुंगांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने देण्यात आले होते याच निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री उधव ठाकरे साहेब यांनी अतिवृष्टीने खराब झालेल्या उडीद व मुंगांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत .
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंत भुतेकर साहेब यांनी दिनांक २० आगस्ट २०२० रोजी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (महाराष्ट्र राज्य ) मा. बाळासाहेब थोरात ( महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य ) मा. दादासाहेब भुसे ( कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना निवेदन दिले होते तर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी दिनांक २४ आगस्ट २०२० रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब वाशिम , मा. जिल्हा कृषिअधिकारी साहेब वाशिम यांना निवेदन दिले होते . तसेच यवतमाळ, हिंगोली , परभणी , येथे सुद्धा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदन दिले होते.
खरिपातील बोगस बियाणे उत्पादक कम्पन्यां यांच्या गोरख धंद्यांमुळे विदर्भ मराठवाद्यातील २५ % शेतकरी दुबार तिबार पेरणी करूनही उत्पादना पासून वंचित राहिला आहे कसे बसे हाता तोंडाशी आलेले उडीद व मुंगांचे पीक आगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने उध्वस्त करून टाकले याच पार्श्वभूमीवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने च नाही तर संस्थापक अध्यक्ष साहेबानी सुद्धा हवालदिल झालेल्या शेतर्यांची व्यथा शासनासमोर मांडली या सर्व निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे

८ वर्षीय नाबालिकवर अत्याचार ,नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…….

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

वर्धा,देवळी तालुक्यातील खर्डा येथे रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ८ वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली पीडित चिमुकलीचे कुटुंब रोजमजुरी करतात.
पीडित चिमुकली तिची सायकल आणण्यासाठी जात असताना आरोपी किरण शहारकर याने तिची वाट अडवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने नराधमाने तिला वीस रुपये देऊन कोणाला काही सांगायचे नाही असे म्हणून पळ काढला. चिमुकलीला वेदना असह्य होत असल्याने चिमुकली रडत रडत घरी आली. आईने विचारपूस केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ देवळी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. देवळी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आरोपीविरूद्ध पोस्को कायदयातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार नितीन लेव्हरकर,पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करीत आहे.

सूनगाव येथील बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

 

गजानन सोनटक्के

प्रतिनिधी जळगाव जा

 

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील संतोष शालीग्राम वानखडे वय 38 वर्षे तरुण 29 ऑगस्ट शनिवार रोजी 11 वाजताच्या सुमारास घरून निघून गेला घरच्यांनी व गावातील लोकांनी शोध घेतला परंतु सदर तरुण बेपत्ता आहे दि 30 ऑगस्ट ला दुपारी पोलिसस्टेशन जळगाव जामोद येथे तरुण हरवल्याची तक्रार शालीग्राम वानखडे (वडील ) यांनी दिली आहे व आज 31 ऑगस्ट 9 वाजता सूनगाव ते जळगाव रोडवरील कुलकर्णी यांच्या विहिरीत मृतदेह आढळला बातमी समजताच जळगाव जामोद पोल्सस्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर भास्कर व पो कॉ इंगळे पोलीस पाटील तडवी घटनास्थळी दाखल झाले व गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला

पति – पत्नी जागिच ठार

 

 

नाशिक येथे पति पत्नी ठार झाल्याची घटना घडली नाशिक रस्त्यावर ओझरखेड कॉलनी नजीक वळणावर चार चाकी माल वाहतुक गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील पतीपत्नी जागीच ठार झाले.

याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि.३०) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सुधाकर रामराव महाले (वणी, वय ४२) व त्यांची पत्नी संगीता सुधाकर महाले (वय. ३८) हे आपल्या दुचाकीवरुन (एम एच १५ एच ए ५८९८) दिंडोरी कडून वणीकडे जात होते. यावेळी दिंडोरीच्या दिशेने चारचाकी माल वाहतुक गाडी (एम एच १५ ईजी ६४४०) भरधाव वेगात जात होते. ओझरखेड कॉलनी नजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले व त्या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतक भीषण होता की दुचाकीवरील महाले दाम्पत्य जागीच ठार झाले. महाले दाम्पत्य हे दिडोंरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथे गेले होते. परतीचा प्रवास करीत असताना अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात चारचाकी उलटी होऊन पडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती वणी पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या दिवसीही सीबीआई कडून रियाची चौकशी सुरुच

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
सुर्या मराठी न्यूज

मुंबई | बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं काल, शनिवारी रिया चक्रवर्तीची खूप तास कसून चौकशी केली. पण सीबीआयला आणखीन काही मुद्द्यांवर माहिती घ्यायची आहे. ज्यासाठीच रियाला सगल तिसऱ्या दिवशी चोकशीसाठी बोलवण्यात येतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

दोन दिवसात 17 तास चौकशी
गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. पहिल्या दिवशी, शुक्रवारी, 28 ऑगस्टला सीबीआयकडून रियाला प्रथमच बोलावण्यात आले. यादरम्यान, सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली.
तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी रियाची 7 तास चौकशी केली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सुशांत सिंग प्रकरणी संबंधीत सर्व जण उपस्थित होते. यांमध्ये सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांची सीबीआयने चौकशी केली आहे.

ब्रेकिंग … सूनगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी जळगाव जा

 

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील 45 वर्षीय महिला कोरणा पॉझिटिव निघाल्याने सूनगाव येथे एकच खळबळ उडाली आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी स्थानिक परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे सूनगाव पेटपुरा भागातील 45 वर्षीय महिला कोरोना बाधित निघाली आहे व परिसर सील करण्याचे आदेश ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचेकडून दिले आहेत व गावातील लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये व तोंडाला मास्क रुमाल बांधूनच बाहेर पडावे असे आवाहन सूनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे

अडगाव बु. केंद्रांची online शिक्षण परिषद संपन्न

 

 

स्थानिक अडगाव बु केंद्रातंर्गत येणाऱ्या शाळांचे मु. अ. तथा शिक्षक यांची Online शिक्षण परिषद घेण्यात आली.

 

दिपक रेळे
प्रतिनिधी अडगांव बु

 

सर्वप्रथम अडगाव बु केंद्रांचे केंद्रप्रमुख
किशोर कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी ठग मॅडम तथा Diecpd चे प्राचार्य डुकरे सर गटशिक्षणाधिकारी दुतंडे सर यांनी दिलेल्या
मार्गदर्शनानुसार विद्यार्थी विकास घडविण्याच्या दृष्टीने कोण कोणते प्रयत्न करता येतील
यासाठी शिक्षकांकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती दिलीत्यानंतर तंत्र स्नेही शिक्षक वजाहत अलीम सर यांनी zoom app चा वापर आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी उपयोग या विषयी सविस्तर माहिती दिली केंद्रांतील साधना पाटील यांनी त्या त्यांचे सहकारी शिक्षक जि.प. प्राथ. शाळा सिरसोली येथे विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या of line अभ्यासाविषयी माहिती दिली प्रमोद दाते यांनी ही कृती युक्त स्वाध्याय पुस्तिका वाटप करून विदयार्थ्यांकडून अभ्यास कसा करून घ्यावा याची माहिती दिली. तसेच यावेळी सचिन नागे सर नेव्होरी यांनी गावात जुलै महिन्यापासून विदयार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाची व प्रगतीची माहिती दिली सिरसोली उर्दू चे मसुद हुसेन सर यांनी ही ते राबवित असलेल्या Online ऑडीओ उपक्रमाची माहिती दिलीकेंद्र शाळा मु.अ. नजीब सर, इसाक सर, लाटे मॅडम,यांनीही मनोगत व्यक्त करीत सर्व मिळून उपक्रम राबविण्याचा निर्धार केला शिक्षण परिपदेला प. स. तेल्हारा विषयतज्ज्ञ गुल्हाने सर आवर्जुन उपस्थित होते.
आभार अनिल काळे सर यांनी मानलेत.. ऑनलाईन मिटींग यशस्वी करण्यासाठी तंत्र स्नेही वजाहत अलिम यांनी प्रयत्न केले..

सूनगाव येथील तरुण बेपत्ता

 

गजानन सोनटक्के

तालुका प्रतिनिधी जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील संतोष शालीग्राम वानखडे वय 38 वर्षे तरुण 29 ऑगस्ट शनिवार रोजी 11 वाजताच्या सुमारास घरून निघून गेला घरच्यांनी व गावातील लोकांनी शोध घेतला परंतु सदर तरुण बेपत्ता आहे आज दि 30 ऑगस्ट ला दुपारी पोलिसस्टेशन जळगाव जामोद येथे तरुण हरवल्याची तक्रार शालीग्राम वानखडे (वडील ) यांनी दिली आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलिसस्टेशन चे सूनगाव बिट चे कोल्हे साहेब करीत आहे