Home Blog Page 80

लोणार येथे 16 सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबीच्या पवित्र प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन ( lonar )

0

 

रक्तदान हे समाजातील प्रत्येक सदस्याच्या जीवनाचे रक्षण करते मो. रिजवान जड्डा

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :लोणार येथे ईद मिलादुन्नबीच्या पवित्र प्रसंगी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, जामा मस्जिद चौक, लोणार येथे सोमवार 16 सप्टेंबर रोजी हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

जामियते उलमा ए हिंद लोणार या मुस्लिम संघटने तर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. उद्घाटक म्हणून शहराचे ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी महेमूद सेठ़, प्रमुख पाहुणे लोणार पोलीस निरीक्षक निमिश मेहत्रे,माजी सभापती आबिद खान, एलसीपीएसचे अध्यक्ष हाजी शेख मसूद सेठ़, अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष इमरान खान, सीबीएससीचे प्राचार्य डॉ. कुलकर्णी, शेख फैसल आरोग्य निरीक्षक डॉ. फिरोज शाह, फिरोज़ पठाण, डॉ.मानधने, विदर्भ पोलीस अकॅडमीचे संचालक निसार शेख,पत्रकार फिरदोस पठाण, कार्यकर्ते बब्बी भाई इत्यादींची उपस्थिती लाभली.

यामध्ये 5.30 वाजेपर्यंत 105 रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले होते. संध्याकाळ पर्यंत हा आकडा 130 पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा जमियतचे तालुकाध्यक्ष हाजी रिजवान जड्डा यांनी व्यक्त केले होते.

संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज शेख अयाज यांनी रक्तदान ही मानवतेच्या सेवा करण्याची एक महत्वपूर्ण क्रिया असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच रिज़वान खान करामत खान,वसीफ अहेमद खान, हाफिज तारीक, इज़हार खान यांनी रक्तदानाच्या महत्वाबद्दल समाजामध्ये जनजागृती केली. हाजी महेमूद सेठ़ म्हणाले की, रक्तदानामुळे आपल्याला एकमेकांच्या जीवनात थोडक्यात पण मोठा फरक घडवता येतो.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सलग 10 वर्षांपासून हा रक्तदान शिबिर आयोजित केला जातो व प्रत्येक वर्षी 100 पेक्षा जास्तच रक्तदान होतो.
रक्तदानाचे महत्व आणि मोहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्याच विचारांचे अनुसरण करून आपण समाजात एक चांगला संदेश देऊ शकतो. असे मनोगत हाफिज़ अब्दुल राजिक यांनी व्यक्त केले.

Lonar :याप्रसंगी जमियतचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम समाजातील युवा पिढी व सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह रिज़वान खान करामत खान, हाफिज़ तारीक, अल्ताफ हुसेन, वसीम खान सर, सखावत सर, हाफिज़ एतेशाम, ज़फर खान, मोहम्मद ज़की, फुरकान खान, हाफिज़ अनिस, जै़द व अनस यांनी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतल

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पंजाबचे व्ही एम सिंग 20 सप्टेंबरला संग्रामपूरात..(former )

0

 

Former :संग्रामपूर/ शेतकरी शेतमजुर व महिला बचत गटांच्या प्रश्नासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी संग्रामपूर येथे शिव जनस्वराज्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यासाठी पंजाबचे व्ही एम सिंग यांच्या सह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी केद्र सरकारला झुकवून देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्ही एम सिंग यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

सर्वाधिक आत्महत्याग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे होत असलेल्या शिव जनस्वराज्य मेळाव्यात सहभागी होऊन व्ही एम सिंग महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलनाचे कोणते शस्त्र उपसतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

राज्यातील शेतकरी शेतमजूर व महिला बचत गटांच्या प्रश्नावर राजु शेट्टी यांनी राज्यभर आवाज उठविला असल्याने संग्रामपूर मेळाव्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आक्रमकपणे लढणारी एकमेव स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याने जनमानसात संघटनेला अधिक पसंती मिळत आहे.

या मेळाव्यासाठी गावा गावात शेतकरी शेतमजूर व महिलांची जय्यत तयारी चालु असुन 20 सप्टेंबरला संग्रामपूरात लक्षणीय उपस्थिती राहणार आहे.

Former :यापुर्वीही प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात निघालेले सर्व मोर्चे 50 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संख्येने धडकले आहेत. या मेळाव्यासाठी व्ही एम सिंग उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा जिल्ह्यातील सर्वात मोठा मेळावा होणार असल्याचे बोलल्या जात आहे हे विशेष.

पंचायत समिति कार्लयाय नविन जागेत स्थलांतरीत व्हावे(lonarnews)

0

 

सय्यद जहीर लोणार तालुका प्रतिनिधि

lonarnews:पंचायत समीती कार्यालय हे पुरातत्विभागाच्या अगदी जवळ म्हणजे लोणार धार तिर्थ लागुनच आहे. आजपर्यंत सर्व शासकिय कार्यालय, सरोवराच्या 100 मीटरच्या हद्दीतील कार्यालय नविन ठिकाणी स्थलांतर झालेले आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

परंतु लोणार पंचायत समिती ही मोडकळीस आली असून 1960 पासून बांधकाम झाले असून पुर्ण जिर्ण झाले आहे. पंचायत समितीची आजरोजी आधीं बिल्डींग रिकामी असून कधिही बिल्डींग कोसळू शकते असे झाल्यास याला जिम्मेदार कोण असेल.

पंचायत समिती ही नविन जागेत स्थलांतरीत झाल्यास पं.स.ची जागा ही पुरातत्व विभागाला देऊन धार तिर्थ येथे येणाऱ्या पर्यटक यांच्या साठी 4 चाकी, 2 चाकी पार्कींगची व्यवस्था होईल. व तेथे छोटे छोटे, गार्डन, सर्वांसाठी सुखसुविधा होईल. व लोणारचा विकास होईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पुरातत्व विभागाने बऱ्याच वेळेस मोजणी केली असून नविन जागेमध्ये सर्व सुविधासह नविन पंचायत समिती कार्यालय व्हावे या आगोदर ही दि.28.8.2024 ला निवेदन देऊनही त्यावर काहीही कारवही करण्या आलेली नाही.

lonarnews:त्यामुळे आता परत आज स्मरणपत्र दिले व यावर का ही कारवाई नकेल्यास आंदोलन करन्यात येईल असे वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा नेते नागवंशी, संघपाल पनाड व लोणार शहर उपाध्यक्ष दीपक अंभोरे यांनी लोणार तहसीदार साहेबांना दीले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने अटाळी उमरा रस्त्यावर इसमाच्या ताब्यातून 94 हजार 340 रुपयाचा देशी-विदेशी दारू व इतर साहित्य केले जप्त..आरोपीला अटक (police)

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

police:खामगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अटाळी उमरा रस्त्यावर संशयास्पदरीत्या जाणाऱ्या इसमाच्या ताब्यातून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने 94340 रुपयाचा देशी विदेशी दारू शिशा व इतर साहित्य मुद्देमाल जप्त केले.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला खात्रीशीर व गुप्त माहिती मिळाली की अटाळी उमरा रस्त्यावर देशी विदेशी दारू विनापरवाना एक इसम घेऊन जात आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अटाळी उमरा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत दिसणाऱ्या आरोपीची जळती घेतली असता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आरोपीच्या ताब्यातुन देशी दारुच्या 90 मिलीच्या 2560 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. 88,600/- रुपये, 2) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या कंपनी सिलबंद
काचेच्या 35 नग शिशा कि. 5,600/- रुपये, 3) 06 नग हिरव्या रंगाच्या कापडी थैल्या कि. 120/- रुपये, 4) 04 नग पांढ-या रंगाच्या पोतड्या कि. 20/- रुपये असा एकुण कि. 94,340/- रुपये चा प्रोव्ही मुददेमाल मिळुन आला.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे साहेब खामगांव यांचे आदेशाने Psi. मनोज वासाडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, योगेश कुंवारे, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.हे.कॉ. सिमा खिल्लारे, चालक पो.ना. पवन मोरे यांनी केली.

police:याप्रकरणी खामगाव ग्रामीणमध्ये पो.हे.कॉ. सुधाकर प्रभाकर थोरात बनं 1413 उप.वि.पो.अ.कार्यालय, खामगांव जि.बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद इफ्रेश जहीरोद्दीन देशमुख वय 32 वर्षे रा. अटाळी ता. खामगांव विरुद्ध कायमी अप क्र. 363/2024 कलम 65 ई मदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे

१ नोव्हेंबरपासून रेशनच्या दुकानात ‘या’ लोकांना धान्य मिळणार नाही? (ration)

0

 

ration:राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती.

मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन (Ration Card) १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसीसाठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणजेच, जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही.

ration:अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. ई-केवायसी नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही.

कापुस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल.( prashantdikkar)

0

 

संग्रामपूरात होणारा महामेळावा राज्यसरकारला महागात पडणार.प्रशांत डिक्कर.

prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागझरी येथुन काढलेली शिव जनस्वराज्य यात्रा २० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूरात पोहचणार असुन शेतकरी, शेतमजुर,व महिलांच्या प्रश्नावर तहसिल मैदानावर विराट सभा होणार आहे.

शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा..(Teacher)

कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा, व महिला बचत गटाच्या प्रश्नासह विविध मागण्यांबाबत राज्यभरातील संघटना आक्रमक झाल्या आहेत.

त्यामुळे अनेक संघटनांचे पक्षप्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या सरकार विरोधात मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा या मेळाव्यात होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार. विमा कंपन्यांचे व सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे असल्याने शेतकरी पिक विमा पासुन वंचित राहत आहेत. महिला बचत गटाचे करोडो रुपये सरकारने रोखुन धरल्याने राज्यभरातील बचत गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.

prashantdikkar:अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राज्यातील अनेक संघटना एकत्रीतपणे लढा देणार आहेत. या मेळाव्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून संग्रामपूरात होणारा शेतकऱ्यांचा महामेळावा सरकारला चांगलाच महागात पडणार असल्याचे स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी खेर्डा बु. येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक होणार. हे विशेष.

ईद-ए-मिलाद म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व..( eid )

0

 

Eid:ईद मिलाद-उन-नबीला ईद-ए-मिलाद असेही म्हणतात. इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद मिलाद-उन-नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना, रबी अल-अव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे.

या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण करतात.

15 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून 16 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलाद-उन-नबी साजरी केली जाईल.

ईद मिलाद-उन-नबीचे महत्त्व –

इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबीचे महत्त्व खूप जास्त आहे. इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो. तसेच, हा सण इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातात. घरे आणि मशिदींमध्ये कुराण वाचले जाते. या दिवशी गरिबांना दानही केले जाते. ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी दान आणि जकात केल्याने अल्लाह प्रसन्न होतो, असे मानले जाते.

ईद मिलाद-उन-नबीचा इतिहास –

ईद मिलाद-उन-नबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्माशी जोडलेला आहे. हजरत मुहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे 570 मध्ये झाला. सुन्नी लोक 12 तारखेला रबी अल-अव्वाल रोजी प्रेषित मुहम्मद यांचा जन्म साजरा करतात, तर शिया लोक 17 तारखेला हा सण साजरा करतात. हा दिवस केवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणात ठेवला जातो.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ते 6 वर्षांचे असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर, पैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबा अबू मुत्तलिब यांच्यासोबत राहू लागले.

Eid :त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव बीबी अमीना होते. अल्लाहने सर्वप्रथम प्रेषित हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिले. यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, असे मानले जाते.

शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा..(Teacher)

0

 

Teacher:पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

खोटी माहिती भरल्यास कारवाई

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

टीईटी २०१८ आणि २०१९मधील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही, याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी.

भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. २०१८, २०१९च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

वेळापत्रक असे…

Teacher :अर्ज भरण्याचा कालावधी : ९ ते ३० सप्टेंबर
प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी : २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर परीक्षेची तारीख : १० नोव्हेंबर
वेळ : पहिला पेपर – सकाळी १०:३० ते १:०० दुसरा पेपर : दुपारी २:०० ते ४:३० असा राहील.

ज्याची भीती होती तेच झालं ; भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला..(Monkeypox)

0

 

Monkeypox:परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

कोविड-19 महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायररसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागाने (Health Ministry) म्हटलं आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

या व्हायरसविरोधात लोकानी जागरुक राहाण्याचं आव्हानही आरोग्य विभागाने केलं आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणं (symptoms of monkeypox) आढळल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Monkeypox:सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं आरोग्यविभागाकडू

जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर महारक्तदानसाठी हजारोच्यां संख्येने सहभागी व्हावा:रिजवान जड्डा (lonar )

0

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

lonar:16 सप्टेंबर रोजी लोणार इंदिरा गांधी उर्दू हाय स्कुल, जामा मस्जिद चोक, लोणार येथे होणार महारक्तदान शिबिर
लोणार येथे जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर मागील अकरा वर्षापासून सुरू असलेल्या सर्व धर्म समभाव चा

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

प्रतीक असलेले इस्लाम धर्माचे धरम गुरू हजरत मोहम्मद सल्ला अलेसल्मयांचया जयती निमीत्त रक्तदान शिबिर यावर्षीही जमियत ए उलमाए हिंदचा वतीने जगप्रसिध्द लोणार शहरात 16 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 ते 4 वाजे दरम्यान महरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जमियत ए उलमाए हिंद वतीने सलग अकरा वर्षापासून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाजातील युवकांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले होते.

Lonar :यावर्षी ही जमियत ए उलमाए हिंदच्यां वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी रक्तदान श्रेष्ठ दान म्हणून सहभाग घेऊन राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व जास्ती जास्त संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन जमियत ए उलमाए हिंदचे रिजवान जड्डा यांनी केले आहे.