Home Blog Page 84

विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी(Lonarnews)

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

Lonarnews :लोणार तालुक्यातील खापरखेड घुले या ठिकाणी कित्येक वर्षापासून विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा असलेल्या जागेवर गावातील एका व्यक्तीने आपल्या शौचालयाचे आउटलेट काढून पाणी काढलेले आहे.

सदर जागेवर काही झाडे लावून केरकचरा लाकूड फाटे टाकून अतिक्रमण करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे असे एका निवेदनाद्वारे सुनील गोपाळ मस्के राहणार खापरखेड घुले यांनी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केलेली आहे.

गटविकास अधिकारी लोणार तहसीलदार लोणार आणि ग्रामपंचायत खापरखेड घुले यांना सुद्धा अशी तक्रार केलेली आहे परंतु स्थानिक सरपंच ग्रामसेवक याविषयी अनास्था दाखवत असल्यामुळे दिनांक 2. 9.2024 वार सोमवार पासून झेंड्याच्या जागेवर खापरखेड घुले येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे परंतु स्थानिक सरपंच सचिव पाच पंच यांनी केलेल्या स्थळ निरीक्षणा नुसार सदरहू जागा ही(गाव नमुना 8 सह) भीमराव दगडू पंडागळे यांच्या व पंचफुला भीमराव पंडागळे यांच्या नावाने असल्याचे दिसून आले आहे.

सदरहू जागेत लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा हा मालकीच्या जागेत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याच्या गाव नमुना आठ नुसार मालकीची असल्यामुळे आमच्याकडे सदर जागेचे सर्व कागदपत्र पुरावे आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

असा दावा करून सदरहू तक्रारदाराने सभा मंडपाची सुद्धा मागणी केली परंतु गाव नमुना आठ नुसार दाखविलेल्या जागेच्या चतुर सीमा नसल्यामुळे वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवता येत नाही असे ग्रामपंचायत सचिवांचे म्हणणे आहे.

वृत्त प्रतिनिधी यांनी दोन्ही बाजू तपासल्या असता मोठा पेच प्रसंग या ठिकाणी दिसून येत आहे यातून शासकीय अधिकारी आणि गावकरी कसा उपोषणकर्त्यांना न्याय देतात ही देखील तारेवरची कसरत आहे

Lonarnews :वंचित बहुजन आघाडीचे नेते भाई नागवंशी संगपाल पनाड यांनी उपोषण मंडपास भेट देऊन चर्चा केली बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

हिंगणघाट येथील माजी नगरसेवक बाबाराव दादाजी ठाकरे यांचे सह अनेक पुरुषांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश(Bjpnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Bjpnews:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

आज दि. ०८ रोजी हिंगणघाट येथील पुरुषांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०८ सप्टेंबर २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने बाबाराव दादाजी ठाकरे , विजय वाघ, भारत नेरकर, हर्ष ठाकरे ईत्यादीसह अनेक पुरुष कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Bjpnews :-सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समाजसेवक सुनील डोंगरे, हिंगणघाट भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, समाजसेवक संजय मगर, रवी काटवले, अजय ठोंबरे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

फरार असलेल्या गुन्हेगार हैदर खान अन्वर खान याला खामगाव पोलिसांनी केली सीताफिने अटक.(crimenews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

crimenews:-खामगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी फरार असलेल्या हैदर खान अन्वर खान नावाच्या आरोपीला खामगाव पोलिसांनी मोठ्या सीताफिने अटक केली.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

याबाबत खामगाव पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हैदर खान अन्वर खान याच्याविरुद्ध पो.स्टे. खामगाव शहर येथे गुन्हा क्र.392/2024 क. 296, 126 (2), 352, 351 (2), 3/5 सह कलम 3(1) (r)(s), 3 (2) (va) SC. तसेच मागील पोस्ट. रामतीर्थ जी.एस. नांदेड गुन्हे क्र. 22/2014 अ. 20 (b) N.D.P.S. अधिनियम,

पो.स्टे. खामगाव शहर गुन्हा क्र.70/2014 क. 143, 144, 145, 147, 148, 341, 336, 324 I.D.V. कं ए. 3(1), (10) अत्याचार प्रतिबंधक कायदा. इत्यादी गंभीर गुन्ह्यातील आरोपी हैदर खान अन्वर खान राहणार हरी फैल खामगाव हा अनेक दिवसापासून फरार होता घटनास्थळावरून फरार झाला होता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पोलिसांना गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की फरार असलेला आरोपी हैदर खान अन्वर खान हा हरी फाईल भागात त्याच्या घरी आला आहे.

घरी आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या आदेशाने खामगाव पोलिस आरोपी हैदरला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तो मागच्या दाराने पळून गेला.

मात्र, हरिफिल येथील रस्त्यात त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडून अटक केली. अधिक तपास खामगाव पोलीस करीत आहेत सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब यांचे

crimenews:मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद ठाकरे यांचे आदेशाने पथकातील पो.उप.नि. मनोज वासाडे, स.फौ. सुनिल राऊत, विश्वनाथ जाधव, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, प्रदीप मोठे, पो.कॉ. रविंद्र कन्नर, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.कॉ. स्वाती जाधव यांनी केली आहे.

विदर्भ विख्यात तान्हा पोळा स्पर्धेत दोन हजार बालकांच्या उपस्थितीने रंगत( amarkale )

0

 

खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारीच्या हस्ते बक्षिस देऊन चिमुकल्यांचा सन्मान ( amarkale )

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

amarkale:सिदी (रेल्वे) ता.७ :तान्हा पोळा कृती समितीच्यावतीने सलग विसाव्या वर्षी येथील जुन्या पोलीस ठाणापरिसरात मंगळवारी (ता.३) ला दुपारी तीन ते सहा वाजता दरम्यान आयोजित बाल तान्हा पोळा दोन हजार बालगोपालांच्या उपस्थितीने रंगत आली.

 

तर दोरीने ओढणारा नंदीगट,कठड्यावरील नंदीगट आणि फॅन्सी ड्रेस परिधान करनारा नंदीधारक गट अशा तिनं गटात विभागणी करुन परिक्षनातुन निवडलेल्या १०० चिमुकल्या नंदी धारकांना विशेष भेट वस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारी, माजी आमदार राजु तिमांडे,सभापती सुधीरबाबु कोठारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य किशोर दिघे, हिंगणघाटचे माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,श्वास संघटनेचे संस्थापक विठ्ठल गुळघाने, काँग्रेसचे प्रविन उपासे ,कामगार नेते आफताब खान आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण शहरातुन जवळपास दोन हजार बालगोपालानी आपला नंदी व स्वतः विवीध वेशभूषा करून सामाजिक संदेश देत भाग घेतलेल्या नंदीधारकातुन पोळा कृती समीतीनी नियुक्त केलेल्या परिक्षण मंडळातील सदस्या सुरेखा साठे,धृतीका गवळी,भारती मुळे,स्वाती गहेरवार ,अमोल गवळी यांनी निवडलेल्या तिन्ही गटातील मिळुन शंभर नंदीधारक चिमुकल्यांना भेट वस्तुचे वाटप करण्यात आले.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

सहभागी दोन हजार बालगोपाल नंदी धारकांना बोजारा म्हणून आमदार तथा उत्कृष्ट संसदपटु समीर कुणावार यांच्या तर्फे टिफीन, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले यांच्या कडुन रजिस्टर तर हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या कडुन दिलेल्या बिस्किट पुडा आणि थैलीचे कृती समीतीच्या बोजारा समितीच्या सदस्यानी वाटप केले.

सहभागी दोन हजार बालगोपाल नंदी धारकांना बोजारा म्हणून आमदार तथा उत्कृष्ट संसदपटु समीर कुणावार यांच्या तर्फे टिफीन, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले यांच्या कडुन रजिस्टर तर हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या कडुन दिलेल्या बिस्किट पुडा आणि थैलीचे कृती समीतीच्या बोजारा वाटप सदस्यानी वाटप केले.

तर परिक्षण मंडळाने निवडलेल्या शंभर बाल नंदीधारकांना श्वास सेवाभावी संघटना हिंगणघाटचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुळघाने यांच्याकडून ट्रॉफी तसेच हिंगणघाटचे माजी नगराध्यक्षचे पंढरी कापसे यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे गिफ्ट देण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याचप्रमाणे सिंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा,जनता दरबार सामाजिक संघटना सिंदी,केसरी नगर विद्यालया सिंदी ,कृष्ण एजन्सीचे पुरुषोत्तम व्यास, सामाजिक कार्यकर्ते सागर अंभोरे ,इंजिनीयर सतीशजी ढोक,सुनीलजी पाटेकर वर्धा, हिंगणघाटचे सचिनची चरडे,साई हार्डवेअरचे संजय तडस,भाजप शहराध्यक्ष ओमप्रकाश राठी, अजय फेब्रिकेशनचे अजय वांदीले आदी दानदात्यांकडुन पुरस्कार स्वरुपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

amarkale:कार्यक्रमाचे संचालन मोहन सुरकार यांनी केले. उपस्थिताचे आभार आशिष देवतळे यांनी मानले.तान्हा पोळा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तान्हा पोळा कृती समितीच्या सर्व पदाधिकार्यानी अथक परिश्रम घेतले.

अखेर राज्य सरकारचे तुपकरांना बैठकीचे निमंत्रण; उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ११ सप्टेंबरला शेतकरी प्रश्नी बैठक; पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांची मध्यस्थी.= (Ravikanttupkar )

0

 

रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण…

उद्याचे आंदोलन तूर्त स्थगित; ११ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबर पासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार – रविकांत तुपकर

Ravikanttupkar:सिंदखेडराजा, (प्रतिनिधी ता.७) :- सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे.

ना.पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे,

त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले. बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू, जर ठोस निर्णय झाले नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
मातृतीर्थ सिंदखेड राजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन गेल्या ४ दिवसांपासून सुरू होते.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

सोयाबीन – कापसाची दरवाढ, पीक विम्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून शेतीपिकांचे रक्षण यासह विविध मुद्यांवर तुपकरांनी हे आंदोलन सुरू होते. आज ७ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातल्या शेकडो गावात व राज्यातील हजारो गावांत तुपकर यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात आले. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे ठराव विविध ग्रामपंचायतीने घेतले आहेत.

तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असतांनाही सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. ८ सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन असल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान आज सायंकाळी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून खुद्द उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी रविकांत तुपकर यांना 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीचे लेखी निमंत्रण जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी खडसे यांनी रविकांत तुपकर यांना दिले. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली हे आंदोलनाचे आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश आहे. केवळ आंदोलन करणे आणि कायदा हाती घेणे हा आपला उद्देश नसून शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या न्याय हक्क मिळवून देणे हा आपला उद्देश असल्याने आपण उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून आपल्या आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

जिजाऊंच्या या पावनभूमीत आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या कमलबाई डोईफोडे, मीनाताई डोईफोडे या माऊलींच्या हस्ते तुपकरांनी आपले अन्यत्याग आंदोलन तोडले. ११ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत काय निर्णय होतात आणि कोणत्या कोणत्या मागण्या मार्गी लागतात हे पाहूनच पुढील निर्णय घेऊ तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी शांत रहावे, जर ठोस निर्णय झाले नाही तर आक्रमकपणे रस्त्यावर उतरू असे, रविकांत तुपकर यांनी सांगितले

आ.डॉ.राजेंद्र शिंगणेंसह विविध नेत्यांच्या आंदोलन स्थळी भेटी

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्याचे माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. मागण्या समजून घेतल्या, रविकांत तुपकर हे राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे, त्यामुळे त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी,असा सल्ला देखील आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

Ravikanttupkar:-तसेच माजी आमदार तॊताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबुब शेख, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके,ज्योतीताई खेडेकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गीते प्रा.नरेश बोडखे, कु.गायत्री शिंगणे, स्वातीताई नखाते यांनी आंदोलन स्थळी पोहचून रविकांत तुपकर यांची भेट घेतली.

स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवून वाहिली आदरांजली..( ptrakar )

0

 

संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण येथील प्रसिद्ध पत्रकार शेख अनिस भाई यांचा दुचाकी अपघात झाला होता त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पत्रकार शेख अनिस भाई यांच्या स्मृतिदिन निमित्त 6 सप्टेंबर 2024 रोजी मित्रमंडळी कडून विविध उपक्रम राबवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली वरवट बकांल येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व अनाथ मुलांना कपडे तसेच निराधार महिलांना साडी व किराणा किट वाटप करून

शेगाव सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

तर वरवट बकाल येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी विविध कार्यक्रम प्रसंगी साबीर तौसीफ जमदार शेख रेहान विकी देऊळकर शेख आरिफ पंकज इंगळे शेख नासिर शेख साकिब योगेश इंगळे सह मित्रपरिवार उपस्थित होते

शेख अनिस भाई पत्रकार यांनी पत्रकार क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान घेतलेले होते

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध विषयावर आपले मत व्यक्त करताना आणि जनतेचे मत घडवताना स्वतःच्या अनुभव वर आणि ज्ञानावर आधारित लेखन करत होते

ptrakar:-अनेक वर्षापासून पत्रकारी चे अनुभव असल्याने वरिष्ठ पत्रकारांना समाजातील नाजूक मुद्दे हे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून दाखवत होते त्यांच्या लेखणीला अनुभवाचा आधार असल्यामुळे वाचक त्यांना अधिक प्रिय पत्रकार समजत होते त्यांचं राहणीमान त्यांची भाऊक बोल भाषा आणि त्यांचे विचार सर्वधर्मीय लोकांचे मन जिंकणारे तसेच सर्व लोकांच्या मनावर राज करणारे अधिकारी कर्मचारी सुद्धा त्यांची आजही आठवण काढतात असे माझे एक मित्र शेख अनिस भाई पत्रकार होते त्यांना मनापासून मी कोटी कोटी नमन करतो

*जिवलग मित्र विनोद भाऊ बाळ वरवट बकाल*

विभागीय ज्युदो मधे महेश ज्ञानपीठ शाळेची निवड ( Hingnghat )

0

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

Hingnghat:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या कार्यालय मार्फत 6

सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येधे जिल्हा स्तरिय शालेय ज्युदो मधे महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगणघाटच्या अंडर 19 मुली विधी वाटमोडे अंडर 17 मुली धनाश्री भोयर आणि 17 मुले तुषार देवतळे यांची जिल्हा स्तरावरील ज्युदो सामन्यात उत्कृष्ट विजय मिळवून यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

त्यांनी आपले विजयाचे श्रेय संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधर राठी, सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ , उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे,

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रीडा अधिकारी सायली चन्नावर, तालुका क्रीडा संयोजक बी. एल.खांडरे, क्रीडा

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:-शिक्षक मुस्तफा हबीब बक्ष, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार ,अर्चना चौधरी व सर्व शिक्षकांना दिले
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

गुणवंतविद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या हस्ते संपन्न.( Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:गिरड : दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी उपस्थित कामगार नेते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक.

तसेच गिरड ग्रामपंचायतचे सरपंच राजू नौकरकार. निर्भिड लोक क्रांतीचे संपादक व सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर गजानन गारघाटे सर. समाजसेवक विनोद येनोरकर. गजू धात्रक. राजू बोबडे. अरविंद तामगाडगे.

व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते. डॉक्टर उमेशजी वावरे सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

डॉ. उमेश वावरे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना एक ऊर्जा त्यांच्यात कशी निर्माण होईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व पुढील वाटचालीस गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी विकास विद्यालय गिरड चे विद्यार्थी S.S.C. परीक्षा उत्तीर्ण होऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला यामध्ये पियुष सुधाकर मोटघरे 92.60%. समीक्षा खुशाल गाठे 86.60%. किंजल संजय पानबुडे86.20%. साक्षी संजय वांदिले 86.60%. जिया देवानंद लोहकरे84.80%. तसेच H.S.S.C. परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

Hingnghat:कल्याणी रमेश कापटे.74.50% सलोनी चंद्रभान लोहोट 73.00% तसेच जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा गिरड चे विद्यार्थी श्रुती विकास वाघे वर्ग 7वा प्रथम क्रमांक व समीक्षा रमेश बावणे वर्ग सातवा द्वितीय क्रमांक घेऊन या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे गिरड गावाचे तालुक्याचे नाव जिल्ह्यात लौकिक केले.

म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच करणार असाल तर जाणून घ्या नियम ( hartalika )

0

 

hartalika:हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वर्तव्यकल्यांचा समावेश आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रत केली जातात त्यापैकी एक असलेल्या व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरे केले जाते यंदा हे वृत्त सहा सप्टेंबरला शुक्रवारी साजरे केले जाईल.

धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावेत यासाठी हे हरतालिका व्रत केले त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा.

यासाठी कुमारी का आणि सुवासिनी हे व्रत मनापासून करतात हरतालिका व्रत करताना काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागते यंदा जर तुम्ही हरतालिका हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर त्यासाठीचे काही नियम आज आम्ही सांगणार आहोत

तालुका व्रताचे नियम काय आहेत हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावे

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

हे व्रत सुहासिनी आणि कुमारिकांनी करावे

शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते आजन्म पाळावे मध्येच सोडून देऊ नका

दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरतालिकेची पूजा मांडवी आणि कथा वाचावी

शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत निर्जळी करावे चुकून पाणी किंवा अन्नाचा सेवन करू नये

या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे

हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी आणि कथा वाचून आरती करावी या दिवशी आळस करू नये किंवा झोपून राहू नये

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हरतालिकेचे व्रत करताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावे घरातील व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मन शांत ठेवावे

हरतालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात

hartalika:दुसऱ्या दिवशी हरतालिकेची मांडलेली पूजा फुले वाळू इत्यादी गोष्टींचा विसर्जन पाण्यात करावे

पातूर्डा जी. प. उर्दू शाळेला संरक्षण भिंत बांधणे बाबत ( grampanchayatnews )

0

 

संग्रामपूर ता. प्र शकील शेख

वरील विषयास अनुसरून समस्त गावकरी यांची नम्र विनंती आहे की जि. प. उर्दू शाळेची भिंत दोन वर्षापूर्वी पाळण्यात आली होती शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळें कोणीही ये जा करत आहेत त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

तसेच गुरे ढोरे सुद्धा शाळेच्या आवारात येत आहे तरी आपण होत असलेल्या त्रास लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेची संरक्षण भिंत बांधण्याचे काम करावे गावकऱ्यांची व पालकांची नम्र विनंती यावेळी ग्राम विकास अधिकारी एस पी मेहेंगे यांना निवेदन देण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Grampanchayatnews :निवेदन देताना गावकरी व पालक वर्ग शेख शकील सय्यद अमीर शेख साबीर अवेज काझी शाहरुख खान