Home Blog Page 85

मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये “शिक्षकदीन” साजरा ( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

lonarnews:दि 5.9.2024 रोजी मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल लोणार मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोहम्मद गुफरान सर कुरैशी होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी शिक्षकांनी कश्याप्रकारे विद्यार्थ्यांना कसे प्रकारे घडवावे व त्यांच्या मनात शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.मो सुफयान सर कुरैशी यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले

. मो फुरकान सर कुरैशी यांनी आपल्या भाषणातून शिक्षक आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांचबरोबर विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांचा तसेच आई वडिलांचा आदर करावा असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद गुफरान सर कुरैशी यांनी केले.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

याच वेळी शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये वर्ग १० ची विदयार्थीनी अलफीया खॉं हीने मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले तसेच शिपाई ची भूमिका वर्ग 8 चा विद्यार्थी शेख अनस यांनी हि भुमिका पार पाडली तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षकांच्या भूमिकेत होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख सलमान सर. मो फरजान सर. मो फुरकान सर व इतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

lonarnews:व कार्यक्रमाची सांगता व सर्वांचे आभार मुख्याध्यापक मोहम्मद गुफरान सर कुरैशी यानी मानले. यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

बारा वर्षांपासून चाललेले क्रीडा संकुलाचे काम कधी होईल पुर्ण ?( lonarnews )

0

 

lonarnews:लोणार तालुक्यातील खेळाडू यांना तालुका क्रीडा संकुल व सोयी उपलब्ध करून देणे बाबत दिनांक 1 सप्टेबर 2024 ला लोणार येथील खेळाडू व लोणारकर’ टीम च्या वतीने मा. आमदार डॉ. संजयजी रायमुलकर आमदार मेहकर विधानसभा मतदारसंघ याना निवेदन देण्यात आले.

सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठे ही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी व खेळाडू क्रीडा संकुल वाचून व क्रीडा सोयीवाचून वंचित आहेत.
लोणार येथील क्रीडा संकुलाचे काम मागील दहा ते बारा वर्षापासून सुरू आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

झालेले काम सुद्धा पडत आहे. काही लोक याचा गैरवापर घेत आहेत. काचा फोडून प्रवेश करत आहेत.
पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच भूषणावह नाही,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे या निवेदनात म्हटले आहे. तरी आमदार साहेबांनी क्रीडा संकुल लवकरच चालू करु त्यात लवकर लक्ष घालू व काम पूर्ण करू व सदर संकुल हे खेळाडूंना उपलब्ध करून देऊ असे आश्वासन या वेळी दिले आहे.

lonarnews:या प्रसंगी लोणार तालुक्यातील खेळाडू शाम आत्माराम कुटे, गणेश भास्कर उंबरकर, विजय मुंढे, कमलेश विनोद आगरकर, संदीप भोसले आणि ‘मी लोणारकर’ टीम सदस्य सचिन रामदास कापुरे इ. उपस्थीत होते.

लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

lonarnews:जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते शहरात देश-विदेशातील लोकांना या शहराचा आकर्षण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ते सरोवराचा सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अवस्थेची किडस यावी अशी परिस्थिती लोणार शहरात झालेली आहे.

लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षेतेमुळे लोणार शहराच्यां रसत्याचे तीन तेरा वाजलेले आहे. लोणार शहरात गटर नाल्याचे काम चालू आहे. ज्या ज्या परिसरात काम झाले त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारची रोडची दबाई करून खड्डे भरले नाही शहरामध्ये रस्त्यावर चालताना अनेक घटना घडत आहे.

रोड झाले खड्डेमय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्या रोडवर खड्डेच खड्डे झालेले आहे. याकडे लोणार नगरपालिका प्रशासनाचा दुर्लक्ष आहे. लोणार वासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यापासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.या रस्त्यावरुन गणपती बप्पाचे अगमण होणार आहे.

पंरतु अघाप पर्यत तही नगरपालिकेकडुन कोणतीही पाहणी करण्यात आली नाही तसेच लोणार विविध परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याकडे नगरपालिकेचे प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

lonarnews:या घाणीमुळे लोणार शहरात रुग्णांची संख्या वाढ यामध्ये लहान मुलाचा प्रमाण जास्त प्रमाणात आहे लोणार शहरात साथीचे रोग डोके वरी काढत आहे याकडे मुख्य अधिकारी याकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनतेकडून होत आहे व अर्धवट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का असा जनतेकडून बोलल्या जात आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

प्रतिक्रिया
! मुख्याधिकारी यानी लोणार शहरातील संपुर्ण प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते तात्काळ संपूर्ण शहरातील वार्डीची स्वत:हा लक्ष देवुन सफाई करून घेण्यात यावी जनेकरुन जनतेच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही यांची काळजी घ्यावी शहरामध्ये सदृर्श डेंगु,वायराल सारखे आजारामुळे अनेक रुग्णांचा संख्यामध्ये वाढ दिसुन येत आहे त्यामध्ये लहन मुलांचा मोठा प्रमाणात दिसुन येत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच शहरामधील गटार नाळयाच्या खोद कामामुळे शहरातील रस्ते मध्ये गड्ढेच गड्ढे झाले आहे यांची दखल त्वरीत घ्यावी व याची जबाबदारी प्रशासना वर राहिल. *शेख समद शेख अहमद लोणार शहर काँग्रेस अध्यक्ष
प्रतिक्रिया
माळीपुरा परिसरात एअरटेल कंपनीच्या केलेल्या खोद कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे वारंवार तक्रार करूनही मुख्याधिकारी व बांधकाम विभागाला माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही उद्यापासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन त्या रस्त्यावरून होत असल्यामुळे जर त्यांची विटंबना झाली तर नगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहील खोट काम परवानगी दिली असेल तर पूर्वत काम करून का घेतले नाही खोदकाम व केबल टाकल्यानंतर नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे येऊन सुद्धा पाहिला नाही गजानन जाधव सर शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलिंची विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड.(Hingnghat )

0

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयामार्फत दि.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

5 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यात महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलींनी न्यू इंग्लिश स्कूल, वर्धा विरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महेश ज्ञानपीठ शाळेने 19 वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सलग 6 वर्षे विजेतेपद पटकावले आहे.या विजयाचे श्रेय संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधर राठी, सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ यांना दिले.

उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रीडा अधिकारी सायली चन्नावर, तालुका क्रीडा समन्वयक बी. एल.खांद्रे, क्रीडा शिक्षक मुस्तफा हबीब बक्ष, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार यांच्यासह सर्व शिक्षकांना त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सत्कार ( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonarnews:ज्ञानेश्वर चिभडे मामा यांची राजीव गांधी पंचायत राज समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांच्या कडून सत्कार करन्यात आला.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

शिवसेना भवन लोणार येथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात ज्ञानेश्वर चीभडे यांच्या कार्याची गुरु गौरव करून राजीव गांधी पंचायत राज समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली.

त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

lonarnews:याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, अल्पसंख्यांकाचे तालुकाप्रमुख उमर सय्यद, अशोक सरदार, गणेश पाठे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते चिभडे मामांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:

polanews:-रोटरी क्लब हिंगणघाटने आपल्या परंपरेला अनुसरून या वर्षीदेखील पोला उत्सवानिमित्त मोहता चौक येथे भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरात रक्तगट, रक्त शर्करा आणि हिमोग्लोबिन तपासणी अत्यल्प शुल्कात करण्यात आली, ज्याचा 240 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घघाटन पोलिस निरीक्षक गभने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय राठी, पत्रकार किरण वैद्य, पत्रकार संजय अग्रवाल, पत्रकार राजेश कोचर, गीमाटेक्स्टचे अधिकारी ब्रजमोहन भट्टड, क्लबचे अध्यक्ष जितेंद्र वर्मा, सचिव उदय शेंडे, सचिव सुभाष कटारिया, प्रकल्प संचालक अशोक डालिया, सतीश डांगरे, राजू गुलकरी, स्वप्निल सांबरे, डॉ. अशोक मुखी, डॉ. प्रकाश लाहोटी, डॉ. रंका, प्रा. राजू निखाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

दीप प्रज्वलनानंतर पोलिस निरीक्षक गभने यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली.

त्यांनी सांगितले की, दरवर्षी पोला उत्सवात रोटरी क्लबद्वारे आयोजित हे शिबिर समाजासाठी अत्यंत लाभदायक आहे आणि यामुळे मोठ्या संख्येने लोकांना आरोग्य सुविधा मिळतात. सर्व उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या प्रयत्नांची भरभरून प्रशंसा करत त्यांचे अभिनंदन केले.

रक्त तपासणीची जबाबदारी डॉ. सतीश डांगरे आणि त्यांच्या टीमने पार पाडली, तर तपासणी रिपोर्ट कार्डचे वितरण प्रा. माया मिहानी, प्रभाकर साठवने आणि डॉ. रीना यांनी केले. डॉ. अशोक मुखी यांनी रक्त तपासणी शिबिराच्या महत्त्वावर सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की, असे शिबिर लोकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.

पराग कोचर आणि शाकिर खान पठाण यांनी शिबिराच्या फायद्यांची माहिती देत उपस्थित नागरिकांना जागरूक केले. नोंदणीचे कार्य विवेक तडस, प्रा. शंकर बोंडे आणि रोट्रॅक्ट टीमने कुशलतेने हाताळले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जितेंद्र केदार यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उदय शेंडे यांनी केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुरली लाहोटी, मुकुंद मुंधडा, सुरेश चौधरी, शशांक खांडरे, वैभव पटेलिया, अशोक मिहानी, सूरज ढोमणे, निशांत बोरकुटे, उदय बोकरे, अनुप राजपुरिया यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले.

polanews:रोटरी क्लब हिंगणघाटचा हा प्रयत्न समाजाप्रती त्यांची बांधिलकी आणि सेवाभावाचे प्रतीक आहे, ज्यामुळे पोला उत्सव अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय बनला आहे।

चष्मा आता विसरा! भारतात जादुई ‘आय-ड्रॉप’ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी..(glasses)

0

 

glasses:कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नवीन ‘आय ड्रॉप्स’ला भारतात मान्यता देण्यात आलीय.

मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रीस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop विकसित केला आहे. प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) विषय तज्ञ समितीने (SEC) या उत्पादनाची यापूर्वी शिफारस केली होती.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

त्यानंतर आता ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून अंतिम मंजुरी मिळाली. PresVu हा भारतातील पहिला आय ड्रॉप असल्याचा दावा केला जात आहे, ज्याची रचना प्रेस्बायोपिया असलेल्या लोकांमध्ये चष्मा लावून वाचण्याची गरज कमी करण्यासाठी केली गेली आहे.

चष्मा आता विसरा! भारतात जादुई ‘आय-ड्रॉप’ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी..(glasses)

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाली. उत्पादकांनी या अनोख्या फॉर्म्युलेशनसाठी आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पेटंटसाठी अर्ज केला होता. PresVu ची मान्यता नेत्ररोग शास्त्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.

glasses:- ENTOD फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल के मसुरकर यांनी या मान्यतेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “PresVu हे अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. PresVu हे केवळ एक उत्पादन नाही, तर हा एक उपाय आहे जो लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश टाकेल.”

पारडी येथील गरजू नागरिक ५० वर्षांपासून घरकुलाचा लाभापासून वंचित…( gharkulyojna )

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

gharkulyojna:हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील पारडी (नगाजी) येथील महिलांना ५० वर्षांपासून कोणताही घरकुलाचा लाभ मिळाला नाही.

त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

या महिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते घर बांधू शकत नाही. त्या पडक्या घरामध्ये, कुडाकाडाच्या घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांना घेऊन राहत आहेत.

सरपंच आणि सचिवांना विचारल्यावर तुमची यादी मंजुरी साठी पाठवली आहे, असे ते उत्तर देत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, या महिलांना यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांची मागणी ही अत्यंत रास्त आहे.

gharkulyojna:त्यामुळे या सर्व महिलांना त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले.यावेळी नलू नगाजी मेश्राम, सुनीता कांबळे, गिता जगताप, संगीता जगताप, कमला पाटील, पंचशिला कांबळे, कविता साबळे, इंदिरा मांडवकर, मंगला सराटे, सिंधूबाई शेंद्रे, गिरजा शेंद्रे, वंदना कचवे उपस्थित होते…

गिमाटेक्सच्या कंत्राटी कामगारांना कंपनी मस्टर रोलवर घेऊन किमान वेतन बदली कार्डचे वितरण..( Hingnghat )

0

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट दि.०५ सप्टेंबर

Hingnghat:गिमाटेक्स वणी युनिट येथिल कंत्राटी कामगार म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षापासुन काम करीत होते.
वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटने अध्यक्ष तथा आमदार श्रीयुत समिर कुणावार व संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर पठाण यांचेमार्फत पाठपुरावा करून उत्कृष्ठ कामगारांना ज्येष्ठता व तिन वर्षांची हजेरी सेवा पाहून कंत्राटी कामगारांना कायम स्वरुपी करण्यात यावे असे बैठकीत ठरविण्यात आले होते.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

गिमाटेक्सच्या कंत्राटी कामगारांना कंपनी मस्टर रोलवर घेऊन किमान वेतन बदली कार्डचे वितरण..( Hingnghat )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या अनुषंगाने दि. ०२ सप्टेंबर रोजी आमदार तथा संघटनेचे अध्यक्ष समिर कुणावार व संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्या वतीने २४ कंत्राटी कामगारांना किमान वेतन बदली कार्डचे वितरण करण्यात आले.

Hingnghat :यावेळी संघटनेचे पदाधिकारी दामोदर देशमुख, जिवन भानसे, प्रशांत शेळके, राकेश तराळे, जयंत बावणे, हेमंत भगत, श्रावण थुटे, विनोद कोल्हे, लक्षण जयपुरकर, राहुल देशमुख, विनोद कावळे, मनोज जुमडे,विजय थुल, दिवाकर बरबटकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन ट्रँक्कर पकडले ( Yavalnews )

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews :आज दिनांक 05/09/2024 रोजी सकाळी 10:15 वाजता सातोद कोरपावली रस्ता येथे अवैध गौणखनीज वाहतूक करताना दोन ट्रकटर पकडुन तहसिल कार्यालय यावल येथे जमा करण्यात आले आहेत, .

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

यावल : नायब तहसीलदार संतोष विनंते ,यावल याच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथकाने येथे अवैध गौणखनिज वाहतूक करणारे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा केले.

धानोरा येथील ट्रँक्टर मालक मनोहर सुधाकर पाटील यांचे महिंद्रा होते.ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CZ 1253 रेती एक ब्रास, दुसरे ट्रॅक्टर क्रमांक MH34,BF,1260 येथील ट्रँक्टर मालक रवींद्र गजानन कोळी राहणार भालशिव
स्वराज .ट्रॅक्टर होते.

यांचे एक ब्रास रेती भरलेले महसूल पथकास आढळून आल्याने जप्त करण्यात आले असून गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाळु माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मीना तडवी मंडळ अधिकारी भालोद, भारत वानखेडे तलाठी भालोद , शरीफ तडवी तलाठी बोरखेडा खु., संदीप गोसावी तलाठी हिंगोणे ,गजानन पाटील तलाठी डोगरकठोरा ,

Yavalnews :-मिलिंद कुरकुरे तलाठी दहिगाव, राजू गोरटे तलाठी सांगवी बु., आढळे कोतवाल डोगरकठोरा, सागर तायडे कोतवाल सांगवी बू.,सोनू सिंग कोतवाल कोळवद हे
या पथकाने कारवाई केली आहे.