Home Blog Page 86

ज्याची भीती होती तेच झालं ; भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला..(Monkeypox)

0

 

Monkeypox:परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

कोविड-19 महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायररसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागाने (Health Ministry) म्हटलं आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

या व्हायरसविरोधात लोकानी जागरुक राहाण्याचं आव्हानही आरोग्य विभागाने केलं आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणं (symptoms of monkeypox) आढळल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Monkeypox:सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं आरोग्यविभागाकडू

जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर महारक्तदानसाठी हजारोच्यां संख्येने सहभागी व्हावा:रिजवान जड्डा (lonar )

0

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

lonar:16 सप्टेंबर रोजी लोणार इंदिरा गांधी उर्दू हाय स्कुल, जामा मस्जिद चोक, लोणार येथे होणार महारक्तदान शिबिर
लोणार येथे जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर मागील अकरा वर्षापासून सुरू असलेल्या सर्व धर्म समभाव चा

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

प्रतीक असलेले इस्लाम धर्माचे धरम गुरू हजरत मोहम्मद सल्ला अलेसल्मयांचया जयती निमीत्त रक्तदान शिबिर यावर्षीही जमियत ए उलमाए हिंदचा वतीने जगप्रसिध्द लोणार शहरात 16 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 ते 4 वाजे दरम्यान महरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जमियत ए उलमाए हिंद वतीने सलग अकरा वर्षापासून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाजातील युवकांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले होते.

Lonar :यावर्षी ही जमियत ए उलमाए हिंदच्यां वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी रक्तदान श्रेष्ठ दान म्हणून सहभाग घेऊन राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे व जास्ती जास्त संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन जमियत ए उलमाए हिंदचे रिजवान जड्डा यांनी केले आहे.

घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ( atulvandile )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

atulvandile:हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

घरघुती गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी याबक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सहकार नेते वासुदेवजी गौळकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम पुरस्कार पंकज भट्ट यांच्या तर्फे शरद लोणकर, द्वितीय पुरस्कार सुशील घोडे यांच्या तर्फे पूजा कुंभारे, तृतीय पुरस्कार नितीन भुते यांच्या कडून शुभम पालेकर, चतुर्थ पुरस्कार रविकिरण कुटे कडून शुभम शेंडे,पंचम पुरस्कार सुशील घोडे कडून अविरत राऊत यांना देण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा 

यावेळी मंचावर ईरा अर्बन बँकेचे संचालक सपना जाना, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, युवक जिल्हाअध्यक्ष प्रणयजी कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, श्रीकांत भगत, आकाश दाते, ऍड संदीप विरुळकर, अमोल झाडे, शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सचिव सुचिता सातपुते, अमिता पूंनवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

atulvandile:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव राजू मुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव,तालुका संघटक पंकज भट्ट, तालुका सचिव वैभव साठोने, तालुका अध्यक्ष रविकिरण कुटे, आकाश हूरले, विपुल थुल, आकाश थुल, वैभव भुते, मनीष मुडे, निखिल ठाकरे, स्वप्नील पांडे आदींनी परिश्रम घेतले..

बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात चोरट्यांचे धुमाकुळ भुमराळयात घर फोडी एक लाख रु ऐवज लंपास(Policenews)

0

 

कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

Policenews:भुमराळा येथील आरोग्य सेवक नारायण गोविंदराव सानप वय 54 वर्ष यांच्या घरी दि 13 सप्टेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडुन अंदाजे 115000/रू ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

सदर प्रकरणाची माहीती देवानंद सानप यांनी शंभर नंबर वर फोन कळविले असता सदर ठिकाणावर बिबी पोलीस तात्काळ हजर होउन सदर प्रकरणाची शहानिशा करून तात्काळ श्वानपथक व ठसेतज्ञ बोलावून नमुने घेण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथे दि 13 सप्टेंबर रोजीच्या रात्री 9.30 दरम्यान नारायन गोविंदराव सानप हे परीवारा सह जेवन करून झोपले असता रात्री 1.30 वाजेच्या दरम्यान सानप यांना घरात मागील दरवाजा कापल्या जात असल्याचा आवाज आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे त्यांना जाग आली व ते जागी होऊन समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर घराचे सर्व दरवाजे बाहेरुन लावलेले होते.अशा वेळी सानप यांनी मोबाईल पाहीला असता तो दिसला नाही म्हणून घरातुनच आरडा ओरड करुन शेजारील लोकांना आवाज दिले आवाज ऐकताच शेजारी जागी झाले व त्यानी दरवाजे उघडुन सानप व त्याच्या परीवाराला बाहेर आनले तोवर चोरटे हात साप करून पसार झाले होते.

सदर चोरट्यांनी घराच्या चॅनल गेट चे कुलुप तोडुन जिण्या खालचा दरवाज्याला होल पाडुन कडी उघडुन घरात प्रवेश केला होता सानप यांनी घरातील वस्तुची पाहणी केली अस्ता बेडरुम मधील लोखंडी कपाटातुन 5.ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे 25000/रु ,5.ग्रॅम सोण्याचे झुंबर अंदाजे 25000/रु,4.ग्रॅम सोण्याचे गहु मनी 37 नग अंदाजे 20000/रू,लटकवेलेली पॅनट मधील नगदी रोख 10000/रु,बचत गटाचे ठेवलेले 5000/रु,कपाटातले नगदी पाच -पाचशे च्या 60 नोटा 30000/रु ,मोटार साईकल, कार ची चाबी व मुळ कागद पत्रे असे एकुन अंदाजे 115000/रु औवज अज्ञात चोरट्यांनी पसार केला अशी फिर्याद नारायण सानप यांनी बीबी पोलीस स्टेशनला दिली असतांना पोलीसांनी अप नं 13/2024 कलम 331(4),305 भारतीय न्याय संहीता 2023 नुसार गुन्हा दाखल करून घटनेचा पंचनामा केला असून पूढील तपास ठाणेदार संदिप पाटील, सफो परमेश्वर शिंदे , पोहेकों अशोक अंभोरे, मापोको नितीन मापारी, नापोका अरुण सानप पोका यशवंत जैवळ पोकों रविंद्र बोरे पोका भारत ढाकणे हे करीत आहे.

Policenews :भुमराळा हे गाव डोगराच्या कुशीत बसलेले असून गावाच्या आजू बाजूला वनविभागाचे जंगल असून हे गाव मराठवाड्याच्या सिमेलगत असल्याने या गावात दरवर्षी अशाच प्रकारची घरफोडी चोरटे करतात भुमराळा आणी चोरी हे समीकरण च झाले आहे हे विशेष आता पोलीस या चोरीच्या प्रकरणाकडे कसे गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

0

 

Gold :या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली.

तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे.

चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)

ऑगस्टच्या अखेरच्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला होता. आता सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे.
या आठवड्यात सोन्यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली.

आठवड्याच्या सुरुवातीला सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. 13 सप्टेंबर रोजी त्यात 130 रुपयांची भर पडली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सोन्याने यावर्षात 77,000 रुपयांचा रेकॉर्ड केला आहे. तर चांदीने 87 हजारांचा टप्पा ओलांडला होता.

Gold :या सणासुदीत हा विक्रम तुटण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी या आठवड्यात 5 हजारांनी महागल

परसाडे ग्रामपंचायत सरपंच मिना तडवी अतिक्रमणामुळे झाल्या अपात्र जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश ( Yavalnews )

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी शासकिय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले असुन, या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

या संदर्भातील वृत्त असे की , परसाडे तालुका यावल लोकनियुक्त सरपंचपदावर येथील ग्राम पंचायतच्या झालेल्या २०२२च्या निवडणुकीत मिना राजु तडवी या अटीतटीच्या निवडणुकीत अल्पमतांनी निवडून आल्या होत्या .

येथील शब्बीर कान्हा तडवी व ग्रामसेवक ग्रामपंचायत परसाडे यांनी निवडूण आलेल्या सरपंच मिना राजु तडवी यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध विविध प्रशासकीय यंत्रणेतुन चौकशी करीतसरपंच यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकनियुक्त सरपंच परसाडे मिना राजु तडवी यांना अतिक्रमण प्रकरणी अपात्र करीत असल्याचे आदेश पारित केले आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलतांना तक्रारकर्ते शब्बीर तडवी यांनी म्हटले आहे की, सदरचे अतिक्रमण प्रकरण हे कोणतेही राजकारण व राजकीय वाद किंवा हेवेदाव्यांचा नसुन प्रशासकीय नियमाची लढाई असुन.

Yavalnews:यात आमही वरिष्ठांकडे केलेली वस्तुनिष्ठ तक्रार ही सत्य असल्याने निर्णय आमच्या बाजुला लागल्याची प्रतिक्रीया देत विजय हा सत्याचा झाला असल्याचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण प्रकरणातील तक्रारकर्ते शब्बीर कान्हा तडवी यांनी दिली आहे .

केंद्र सरकारकडून सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा( former )

0

 

Former :राज्यासह देशातील सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने माल विकावा लागण्याच्या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळण्याची समस्या
2022 आणि 2023 या दोन्ही वर्षांमध्ये सोयाबीन आणि कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने आपला माल विकला. याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, अशी जोरदार मागणी केली होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्य सरकारची मागणी महाराष्ट्रात कृषी विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या गेल्या.

Former :केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. शिवराज सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

राजकीय संदर्भ आणि निवडणूक प्रभाव

लोणार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन; 12 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग (lonar)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

 

जमियतचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचे हस्ते 22 सप्टेंबर रोजी होणार भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम”
ईद मिलादुन्नबीच्या पावन प्रसंगी 13.9.2024 रोजी डॉक्टर जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज लोणार आणी जमीयते उलेमा ए हिंद लोणार व शहरातील मान्यवर यांच्या संयुक्त विद्यमाने सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या 12.465 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत 70% गुण प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची 22 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज लोणार मध्ये अंतिम परीक्षा घेतली जाईल.

या फाइनल परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सऊदी अरब येथील मक्का-मदीना शहराचे दर्शन‌ अर्थात उमराह टूर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
प्रथम दोन बक्षीसांपैकी एक कॉलेज तर्फे तर दुसरा शेख सर, विदर्भ अकॅडमी संचालक लोणार यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या दोन प्रथम बक्षीसा पैकी एक संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तर एक फक्त लोणार शहरातून निवडला जाईल, तर द्वितीय क्रमांकास शेख गय्यूर भाई, कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे फ्रिज, तृतीय क्रमांकास लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल च्या तर्फे वॉशिंग मशीन,चतुर्थ क्रमांकास हाजी रिजवान जड्डा यांच्याकडून पाणी फिल्टर तर पाचव्या क्रमांकाला सोनू सायकल स्टोअर्स तर्फे एक सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.

याशिवाय ही अनेक रोख बक्षिसे वितरण करण्यात येणार असून अंतीम राउंडमध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना हाजी महेमूद सेठ यांच्या तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील.

22 सप्टेंबर रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल आणि याच दिवशी सिरतुन्नबी वर आधारित ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला जमीयते उलेमा ए हिंदचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील.

lonar:सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जमीयते उलेमा ए हिंदचे तालुकाध्यक्ष हाजी रिजवान जड्डा, शहराध्यक्ष हाफिज शेख अयाज़ सह डॉक्टर जाकिर हुसैन कॉलेजचे अध्यक्ष हाजी शेख मसूद तसेच प्राचार्य डॉक्टर फिरोज खान व व्यवस्थापक मंडळांनी केले आहे.

कांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकरी,निर्यातदारांना मिळणार दिलासा ( former )

0

 

 

former:केंद्र सरकारने कांद्यावरी किमान निर्यात मूल्याची अट (MEP) हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मे 2024 मध्ये, मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती, परंतु किमान निर्यात मूल्य 550डॉलर प्रति मेट्रिक टन निश्चित केली होती. आता प्रमुख देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

त्याचवेळी, महाराष्ट्रात तसेच जेथे प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते,अशा राज्यामध्ये शेतकरी किमान निर्यात मूल्य हटवण्याची मागणी करत होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्याची अट रद्द करण्याची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी काढला आहे.

former:550 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क यामुळे जूनमध्ये भारतातील कांद्याच्या निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली होती

केसांची शेपटी झाली? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-लांबसडक होतील केस(hair)

0

 

Hair:मुली केसांना काळे, दाट बनवण्यासाठी नेहमीच ट्रिटमेंट घेत असतात. जेणेकरून केसांचे सौंदर्य टिकून राहील. कारण यात निष्काळजीपणा केल्यास केसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांची चमक परत आणू शकता. ज्यामुळे केस सुंदर आणि दाट दिसतील. मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यानं केस लांबसडक आणि दाट  मदत होईल.

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करा :लोणार काग्रेंस कमीटीची मागणी ( rahulgandhi )

 

मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यानं केसांना काय फायदे मिळतात

१) कापूराचे तेल वेगवेगळ्या प्रकार वापरले जाते. यात मुख्य स्वरूपात जळजळ, खाज, वेदना आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो याव्यतिरिक्त केसांसाठीसुद्धा उत्तम मानले जाते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

२) जर तुम्ही मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावाल तर केसांचं गळणं, केसांना फाटे फुटणं थांबवता येतं, याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवत नाही.

३) hair:मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून तळव्यांना लावल्यानं डोळे चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. कंबरेच्या वेदना औषधी तेलानं कमी होतात. याशिवाय शरीराचा त्रास दूर होण्यास मदत हो