Home Blog Page 87

वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्याला मिळाली संजीवनी ( noorulhasan )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

noorulhasan:वर्धा :- 2 वर्षां अगोदर पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे वर्धा जिल्ह्यात आले त्यांच्या नावाची दहशत जनतेला दिसली. त्यांच्या कामाच्या पद्धतीने वर्धा जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे आपोआप बंद झाले.

 

हा त्यांचा प्रभाव त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन ला जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला इतकेच नाही तर तुमचे समाधान झाले नाही तर त्यांनी मला फोन करा सांगितले त्यामुळे त्यांची कामाची पद्धत यामुळे त्यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणात अवैध धंदे बंद झाले

इतकेच नाहीतर अनेक तालुक्यात पोलिसांन कडुन काही अवैध धंदयाकडे हेतूपूरस्पर दुर्लक्ष होत आहे तसेच पार्टनरशिप, पकडलेला माल त्याचे पुढे काय होते?

 

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

त्या बद्दल ची माहिती पोलीस अधिक्षक यांच्या पर्सनल नंबरवर देण्यात येत होती त्यामुळे वर्धा जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक अधिकारी ते पोलीस यांच्या कामात सुधारणा झाली त्यामुळे पोलीस अधिकारी यांच्या कामाची पद्धत त्यांच्या कडुन सर्व सामान्यांना न्याय मिळाला.

त्यांचा कार्यकाळ जवळपास 21 महिण्याचा राहिला त्यांची कामगिरी ही प्रेरणादायी राहली. त्यानंतर त्यांची बदली मुंबई ला करण्यात आली आता भंडारा येथे आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांच्या ठिकाणी नवीन वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नेमणूक करण्यात आली. सध्या सगळीकडे अवैध धंदे यांना संजवीनी मिळाल्याचे लक्षात येते.प्रत्येक चौकात दारू, सट्टा खुलेआम सुरु दिसते गर्दी वरून लक्षात येते याची खबर नाही?

noorulhasan:आज जो अधिकारी नियमानुसार कार्य करतो तो कोणाला पसंद पडत नाही पण जो सर्वाना घेऊन चालतो तुम भी खाओ हम भी खाते या प्रकारचे चित्र सध्या वर्धा जिल्ह्यात दिसत आहे.

यावल शिधापत्रीका धारकांची धान्य सुरू करण्याच्या नांवाखाली तहसील कार्यालयात दलालांकडून आर्थिक लुट ? शिवसेनेचे आंदोलन ( shivsenanews )

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

shivsenanews:येथील तहसील कार्यालयात दलाल व काही भ्रष्ट कर्मचारी यांच्या संगनमताने वाढत्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या शिधापत्रीकेच्या कामाकडे कार्यालयातील अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहेत.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

या दलालांचा व भ्रष्ट कर्मचारी यांचा बंदोबस्त तात्काळ तहसीलदार मला यांनी करावा या मागणी करीता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी आपल्या सहकार्यांसोबत तहसील कार्यालयाच्या दालनात बसुन आंदोलन केले.

यावलच्या तहसील कार्यालयातील काही कर्मचारी व धान्य सुरू करून देतो असे सांगुन नागरीकांची आर्थिक लुट करणारे दलाल यांचे संगनमत झाल्याने आर्थिक स्वार्थासाठी हेतुपुरस्पर खऱ्या गरजु लाभार्थ्यांकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी तहसील कार्यालयात आंदोलन केले.

यावल शिधापत्रीका धारकांची धान्य सुरू करण्याच्या नांवाखाली तहसील कार्यालयात दलालांकडून आर्थिक लुट ? शिवसेनेचे आंदोलन ( shivsenanews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रसंगी गोरगरीब महिलांना न्याय मिळावा म्हणुन तहसील कार्यालयात महसुल अधिकारी यांच्यासमोर प्रश्न मांडलेत. यावेळी महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ या सर्व गरजु शिधा पत्रीका धारकांना धान्य मिळावे या करीता योग्य न्याय मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना यावेळी सांगुन आश्वासित केले.

shivsenanews:-यावेळी शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्यासह पक्षाचे यावल शहरप्रमुख पंकज बारी, शहर उपप्रमुख सागर सपकाळे, ईस्माईल तडवी, राजु बारी, कैलास भोई, किशोर तेली, सागर सपकाळे, राजु सपकाळे, ईरफान तडवी, पिंटू भडकल, बंटी सोनवणे यांच्यासह शिवसेना (शिंदे) गट पक्षाचे विविध पदाधिकारी व शिधा पत्रीकाधारक महिला मोठया संख्येत उपस्थित होत्या.

शेगाव येथील गढी जवळ असलेल्या जिम मध्ये क्षुल्लक कारणावरून जखमी करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी (, brekingnews )

0

 

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

brekingnews:-शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगाव शहरातील गडी जवळ असलेल्या मसल गॅरेज जिम येथे क्षुल्लक कारणावरून जखमी करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणे एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल महादेव वाकोडे व 41 वर्ष याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मी 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजे दरम्यान गडी जवळ असलेल्या मसल गॅरेज जिम येथे साफसफाई चे काम केल्यानंतर जिम मारण्यासाठी गेलो.

शेगाव येथील गढी जवळ असलेल्या जिम मध्ये क्षुल्लक कारणावरून जखमी करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी (, brekingnews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्या ठिकाणी अभी कोकाटे आज म्हटली की तुझी चेष्ट मारणे झाले असेल तर बाजूला हो आणि मला चेस्ट मारू दे असे म्हटले असता अभी कोकाटे याने शिवीगाळ करून काउंटरवर असलेली चाबी घेऊन कपाळावर मारली त्यामुळे कपाळावर जखम होऊन रक्त निघाले.

brekingnews:तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये अपराध नंबर 496 ऑब्लिक 24 कलम 118 (1), 352 ,351 (2) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गजानन गावंडे बकल नंबर 669 करीत आहेत

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

lonarnews:महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग व ज्ञानदीप माध्यमिक, प्राथमिक आश्रम शाळा तांबोळा तसेच ज्ञानगंगा आश्रमीय विद्यामंदिर खळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑगस्ट 2024 वार शनिवारला इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी लोणार येथील श्री मंगल कार्यालय या ठिकाणी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बुलढाणाचे अध्यक्ष एड. साहेबराव सरदार साहेब हे होते तर उद्घाटक म्हणून माजी न्यायमूर्ती वामनराव सांगळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये लोणार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री जंगलसिंग राठोड, आनंदराव चनखोरे साहेब, डी.पी.इंगोले साहेब, युवा उद्योजक शंतनू मापारी, प्रा.वसंत मापारी, माजी उपसभापती मदनराव सुट्टे तसेच सदानंद पाटील हे लाभले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवराय, क्रांतीसुर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमापूजनाने झाली.सुरुवातीलाच मुख्याध्याक तुळशीदास घेवंदे यांच्या नेतृत्वाखाली समीरा व भाग्यश्री आणि इतर मुलींच्या संचाने स्वागत गीत सादर केले .या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या टीमने प्रोजेक्टर द्वारा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले.

तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वामनराव सांगळे तसेच गट शिक्षणाधिकारी जंगलसिंग राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव सरदार यांनी

आपल्या अध्यक्षीय भाषणातून विविध योजनांच्या बाबतची माहिती दिली तसेच मुख्याध्यापक तुळशीदास घेवंदे, मुख्याध्यापक अनंत काळे व मुख्याध्याक गणेश सानप यांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन करून इतर बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पत्रकाद्वारे गावोगावी द्यावी असे आयोजकांना आवाहन केले .या कार्यक्रमासाठी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते.

त्यामध्ये प्रामुख्याने माणिकराव राऊत सरपंच धायफळ ,लक्ष्मणराव आटोळे तंटामुक्ती अध्यक्ष तांबोळा, रवींद्र गोवर्धन राठोड माजी उपसरपंच तांबोळा, राहुल आनंदा मोरे माजी सरपंच तांबोळा,भीमराव गवई मांडवा, लहाने साहेब बीबी, शिवाजी डोंगरदिवे सर, संतोष गावडे धायफळ, भरत मापारी सर, कांबळे सर , इंगळे सर, विनोद मोरे तांबोळा, नागसेन साबळे सर ,पत्रकार तथा भाजप नेते उद्धवराव आटोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदर कार्यक्रमाचे संचालन विठ्ठलराव घारोड यांनी तर आभार प्रदर्शन अशोकराव ढोणे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी मुख्या.घेवंदे सर काळे सर ,सानप सर, बाजोड सर, ससाने सर, गुंजकर सर, किसन जाधव सर, बलकार सर, घारोड सर, ढोणे सर, गायकवाड सर, पवार सर, कार्तिक काळे सर,

lonarnews:वडतकर सर, गायकवाड मॅडम, केदार सर, जाधव सर ,राठोड सर, संतोष राठोड ,पृथ्वीराज चव्हाण, गोवर्धन पवार, विजय चव्हाण ,हनीफ चौधरी, गोविंद राठोड, गजानन गायकवाड, दत्तात्रय नवले, सनी गवई व ज्ञानदीप माध्यमिक -प्राथमिक आश्रम शाळा तांबोळाचे आणि ज्ञानगंगा आश्रमीय विद्यामंदिर खळेगावचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांचे ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग ( Ravikanttupkar )

0

 

रविकांत तुपकरांनी पुन्हा उगारले आंदोलनाचे हत्यार ; माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर करणार अन्नत्याग

कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन-कापूस प्रश्नी राज्यभर आंदोलन पेटणार – तुपकर

बुलढाणा (प्रतिनिधी ता.३१) Ravikanttupkar- सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ३ सप्टेंबर पर्यंत ठोस निर्णय घेतले नाही, तर ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलना सुरुवात करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार आमचा हा शेवटचा अल्टिमेटम असून जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर मात्र ४ सप्टेंबर पासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मग मात्र ते सरकारला जड जाईल असा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आंदोलन हे समीकरणच तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकरांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. गेल्या आठवड्यात रविकांत तुपकरांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची हाक दिली होती,

पत्रकारांसाठी सुवर्णसंधी डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर (social media)

 

त्यावेळी आंदोलनासाठी जात असतांना मरीन ड्राईव्ह परिसरात त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी येथे शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवून आंदोलन केले होते. त्यावेळी मला अटक करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही,

लवकरच आपल्या हक्कासाठी महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला होता. त्यानंतर आज रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.

https://youtu.be/mOu3-6cMwrs?si=Jsg0MNyeq5pQhzrV

यावेळी डॉ.ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, सदाशिव जाधव, अनिल पडोळ, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, राम अंभोरे, अविनाश डुकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभर आंदोलन पेटणार

रविकांत तुपकर अन्नत्यागाला बसल्यानंतर राज्यातील २७ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार असून गावागावात आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालवली आहे, त्यामुळे हे आंदोलन निश्चित पेटणार असून राज्य सरकारला अडचणीत आणणारे ठरणार आहे.

हे आंदोलन जात, धर्म, पक्ष , संघटना विरहित असणार आहे, त्यामुळे आपल्या हक्कासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन रविकांत तुपकरांनी केले आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्या..?

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला प्रत्यक्ष बांधावरील उत्पादन खर्चाच्या आधारे 50% नफा या सूत्राप्रमाणे भाव मिळावा (उदारणार्थ गेल्या वर्षी सोयाबीन प्रत्यक्ष बांधावरील उत्पादन खर्च हा प्रति क्वि. 7,240 रु. होता. हा उत्पादन खर्च + 50% नफा गृहीत धरून सोयाबीनला कमीतकमी प्रति क्वि.9,000 रु. भाव मिळावा, तसेच कापसाला कमीतकमी 12,500 रु. भाव मिळावा.), गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात पिकविमा भरलेल्या सर्व (पात्र-अपात्र) शेतकऱ्यांना सरसकट 100% पिकविमा तात्काळ मिळावा, गेल्या वर्षीच्या सोयाबीन-कापसाला हेक्टरची मर्यादा न लावता प्रति क्वि. 3000 /- रु भाव फरक मिळावा, या वर्षीच्या म्हणजेच 2024 च्या खरीप हंगामातील सोयाबीनला प्रति क्वि.9000/- रु. व कापसाला प्रति क्वि. 12,500/- रु. भाव मिळण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, शेतीला उद्योगाचा दर्जा देवून पूर्णवेळ वीज, पाणी, नवीन तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीला सरकारने सौर उर्जेचे नाही तर सिमेंटचे / तारेचे मजबूत कंपाऊंड करून द्यावे, तसेच शेतीपिकांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी, शेतकऱ्यांना सुलभतेने पेरणीपूर्व पिककर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था राज्य सरकारने उभारावी.शेतमजुरांना सरकारकडून विमा सुरक्षा कवच व मदत मिळावी,महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणारे पण ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन अनुदान मिळावे, धानाला प्रति क्वि.२०००/- रु.बोनस मिळावे, संत्रा-मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, विहरी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने द्यावे, फळबाग व सिंचन अनुदान तातडीने द्यावे, महा डी.बी.टी. अंतर्गत कृषि अवजारांचे थकलेले अनुदान तातडीने जमा करावे, शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसंदर्भात सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

गेल्या ४ वर्षांत तुपकरांचे ३ रे अन्नत्याग आंदोलन

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकरी प्रश्नावर रविकांत तुपकरांनी नेहमीच जीवाची बाजी लावली आहे, गेल्या ४ वर्षांत हे त्यांचे ३ रे अन्नत्याग आंदोलन असून मागील २ आंदोलनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा इतिहास आहे. २०२१ मध्ये तुपकरांनी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून बुलढाणा येथे आणले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराच्या दारात अन्नत्याग आंदोलन केले होते

Ravikanttupkar:-हे आंदोलन चांगलेच चिघळले होते, त्यावेळी सरकार सोबत झालेल्या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय झाल्याने त्यावर्षी सोयाबीन-कापसाला उच्चांकी भाव मिळावा होता, तर गेल्या वर्षी सन २०२३ मध्ये चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन केले होते व अन्नत्याग चालू ठेवत हजारो शेतकऱ्यांसमवेत त्यांनी मुंबई धकड दिली होती, त्यावेळीही सरकार सोबत झालेल्या बैठकी काही सकारात्मक निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता, त्यामुळे तुपकरांच्या या अन्नत्याग आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

स्वाभिमानीची आंदोलनाची दिशा ठरली.. कापुस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी यांसह विविध मागण्यासाठी स्वाभिमानीची शिव जनस्वराज्य यात्रा..( prashantdikkar)

0

 

prashantdikkar:४ सप्टेंबर २०२४ पासुन श्री क्षेत्र नागझरी येथुन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकार वठणीवर यावे याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना १९१ गावातुन ‘शिव जन स्वराज्य यात्रा’ काढणार असल्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शिव जनस्वराज्य यात्रा ४ सप्टेंबर नागझरी येथुन १६ दिवसात १९१ गावात भ्रमण करीत सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी मा.खा.राजु शेट्टी यांच्या उपस्थित संग्रामपूर येथे शिव जनस्वराज्य यात्रेचा महामेळावा होणार असुन सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन पेटणार हे विशेष..

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन…( andolannews )

माझा मायबाप शेतकरी सुखी व्हावा. त्यांचे प्रश्न मार्गी लागावे हेच या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आणि धोरण आहे असे मत प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केले.

माझ्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने बरोबर येऊन लढा द्यावा आणि शिव जन स्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले.

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या बैठकीत कापूस, सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी यांसह विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरवली गेली, तसेच संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांना पद नियुक्त करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांनी एकत्र येऊन आपली संघटना हे आपले घरच आहे असे समजून काम करावे अशा सूचना नवनियुक्त आणि उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

prashantdikkar::धान्य मार्केट वरचा हॉल उपबाजार समिती वरवट बकाल येथे आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना संघटनेच्या जबाबदाऱ्या देऊन पदनियुक्त करण्यात आले..

#shivjanaswarajyayatra #prashantdikkar #rajushetti #swabhimanishetkarisanghatana #jalgonjamod

राज्य माहिती आयोगाच्या आदेशाची अव्हेलना (Lonarnews)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

 

Lonarnews:-जन माहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोणार अंतर्गत ग्रामपंचायत ,पर्डा,धायफळ गावातील विविध विकास कामांच्या संदर्भात मागितलेल्या माहितीविषयी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे सादर केलेल्या द्वितीय अपिलावर राज्य माहिती आयोगाने दिनांक,16.5.2024 ला आदेश देऊनही जन माहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोणार अधिकारी यांनी सुनावणीस टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन…( andolannews )

आदेशा नंतर 30 दिवसांच्या आत सुनावणी घेऊन प्रकरण निकाली न काढता आयुक्त यानी दिलेल्या आदेशाची अवहेलना केली आहे.

माहिती आयोगाच्या आदेशानंतर 30 दिवसांच्या आत अपील अधिकारी यांनी सदर प्रकरण निकाली लावण्याचे अपेक्षित होते.

बातमी लाईव्ह  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आदेशाला 3 महिने उलटले तरीही अपिल अधिकारी तथा गट विकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत जन माहिती अधिकार अर्जावर सुनावणी न घेता आदेशाची अवहेलना केलेली आहे,

Lonarnews :या प्रकरणी सम्बंधित अधिकारी यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अपीलार्थी शेख जावेद शेख याशिन ,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीती (माहाराष्ट्र राज्य )

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन…( andolannews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

andolannews:हिंगणघाट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात निदर्शने देत आंदोलन करण्यात आले.

बांधकामंत्र्यांनी महाराष्ट्रांची माफी मागावी – सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटात केले आणि अनावरण करून या घटनेला एक वर्षही लोटले नाही,

तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. याप्रकरणी बांधकाम मंत्री यांनी राजीनामा देऊन अवघ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी व मुख्यमंत्री यांनी याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे,

अनलिमिटेड कॉलिंग डाटा प्लान होणार बंद Airtel, jio, vi ( Airtel vi jio )

 

अशी मागणी करत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हिंगणघाट तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अपमान सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी दिला.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत , प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहाराध्यक्ष बालू वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर,

प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, जावेद भाई मिर्झा, उपसरपंच मंगेश गिरडे, उपसरपंच प्रवीण कलोडे, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, सुचिता सातपुते, विद्या गिरी, सुजाता जांभूळकर, दिपाली रंगारी, नालंदा राऊत, मंगला कुमरे मॅडम, अमिता पूनवटकर, सुनीता तामगाडगे, अजय

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परबत, सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, गणेश जोशी, , प्रल्हाद तूराळे, राजू मेसेकर, उमेश नेवारे, बबलू खान, हेमंत घोडे, कुणाल येसंबरे, राजू मेसेकर, सचिन भडे, विपुल थूल, मोहम्मद शाहीद, बचू कलोडे, राजू सराटे, विपुल वाढई, पंकज

andolannews:भट्ट, प्रवीण भूते, सुशील घोडे, आकाश हूरले, गजानन महाकाळकर, सौरभ घोडखांदे, संकेत वंजारी चेतन येनोरकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

शासनाच्या योजनेत आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र कारवाई करण्याची मागणी ( samirkunavar )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

samirkunavar:हिंगणघाट :- उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट दी.२७ ऑगस्ट २०२४ मंगळवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख सतीश धोबे, मनीष देवडे, सिताराम भुते यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

निवेदनातून मागणी केली की, तहसीलदार, समुद्रपूर यांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजुरीच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांचे प्रमाणपत्र दि.१९ ऑगस्ट २०२४ च्या झालेल्या तहसीलदार यांच्या समितीच्या सभेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना वितरित करणाऱ्या प्रमाणपत्रावर या योजनेचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे.

त्यावर शासनाचा लोगो व राजमुद्रा प्रकाशित करण्यात आला आहे. सदर प्रमाणपत्रावरील प्रकाशित केलेले छायाचित्र हे कुठल्या नियमात बसते ? यावर आपल्या विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात यावे.

जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )

त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील इमारत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने मिळणारा किचन सेट व सुरक्षा पेटी मिळत असताना त्या ठिकाणी सुद्धा आमदार समीर कुणावार यांनी स्वतःचे फोटो व स्वतःच्या नावाचे स्टिकर व टोकनवर त्यांचा फोटो असलेले टोकन वितरित करण्यात आले.

ते सुद्धा नियमात बसत नसतानाही प्रशासनाने या संदर्भात आजच्या तारखेपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. वरील सर्व विषय जर नियमात बसत असेल तर, आमची व आमच्या पक्षाची कुठलीही हरकत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगार गोरगरीब व गरजू लोकांच्या उत्थानाकरिता अशा योजना निर्माण केल्या. परंतु या योजनेला लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम शासनाचे असताना, परंतु शासन मात्र यात कुठेही दिसत नाही.

स्थानिक आमदार समीर कुणावार हे आपल्या पद्धतीने प्रशासनावर दबाव टाकून या योजनेचा लाभ स्वतःला मतदानातून कसा होईल यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असताना या कृत्याबाबत आपल्याकडून (प्रशासन) कुठली कारवाई केलेली दिसून आली नाही.संबंधित विषयावर आपण कोणती कार्यवाही करणार ?

याबद्दल सविस्तर लेखी माहिती द्यावी. अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही यावेळी पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे , मनोज वरघणे, शंकर मोहमारे, गजानन काटवले ,भास्कर ठवरे, अनंता गलांडे ,आशिष जयस्वाल ,चंदू भुते ,प्रशांत सुपारे,नितीन वैद्य, दिलीप वैद्य, फिरोज खान, फारुख खान, पप्पू घवघवे ,अमोल वादाफळे ,आशिष वाघ, शंकर भोंमले,दिनेश धोबे, संजय सोनुरकर, नथुजी कुकडे, आकाश सुरकार ,गणेश ढेकले,अनेक शिवसैनिक उपस्थित होते

प्रतिक्रिया :- समीर कुणावार (आमदार ) मला विधानसभेतील जनतेने निवडून दिले. मला संविधानिक अधिकार दिले. मी त्यानुसार कार्य केले.

वंदना सौरंगपते उपविभागीय अधिकारी हिंगणघाट

samirkunavar:प्रशासना कडुन दिलेले प्रमाणपत्र नाही.आमदार समीर कुणावार यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र त्यांनी आपल्या स्तरावर वाटले. माहिती वरिष्ठानकडे पाठवली ते निर्णय घेतील.

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांची उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक.. कापुस सोयाबीन भाववाढसाठी स्वाभिमानी आक्रमक.( prshantdikkar )

0

 

prshantdikkar:संग्रामपूर/कापूस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी सह ईतर महत्वपूर्ण प्रश्नावर उद्या शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी उपबाजार समिती वरवट बकाल येथे कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

शेतकरी विरोधी असलेल्या भाजपा सरकार विरोधात शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर मोठ्या आंदोलनाची दिशा उद्याच्या बैठकीत ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )

 

मागिल आठवड्यात मा.खा.राजु शेट्टी यांच्या उपस्थित काटेल धाम व शेगाव येथे आठ दिवसांच्या अंतराने कार्यकर्त्यांचे दोन मेळावे नुकतेच पार पडले असतांना तातडीने बोलावलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशांत डिक्कर नेमके आंदोलनाचे कोणते शस्त्र उपसतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कापुस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी सह ईतर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करुन भाववाढ व कर्जमाफीसाठी सरकारमधील सत्ताधाऱ्यांना प्रशांत डिक्कर जेरीस आणु शकतात अशी चर्चा शेतकऱ्यांनमधे होत आहे.

prshantdikkar:उद्या बैठकीत प्रशांत डिक्कर नेमकी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.