Home Blog Page 94

लोणार तहसील कार्यालयात लघुशंकेचे वांधे ! ( tahsilnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

tahsilnews:नागरिकांनाच काय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार;
स्वच्छता करायचे जीवावर आले म्हणून स्वच्छतागृहाला थेट कुलूपच लावले.

“लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या” तहसील कार्यालयात खरच असे सुरू आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र हो, तुम्ही जे वाचलय ते खरचं आहे. सध्या अकोला तहसील कार्यालयाचे रुपडे पालटणारे तहसीलदार सुरेश कव्हळे जेव्हा लोणारचे तहसीलदार होते तेव्हा त्यांनी लोणार तहसील कार्यालयाचा अक्षरशः कायापालट केला.

आय.एस. ओ मानांकन मिळवणारे लोणार तहसील कार्यालय राज्यातले पहिले कार्यालय ठरले. मात्र सुरेश कव्हळे यांची बदली झाल्यानंतर लोणार तहसील कार्यालयाला पुन्हा जुने दिवस आले आहेत,

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

गत तहसीलदारांचा पाहिजे तसा धाक नव्हता त्यामुळे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी बिनधास्त आहेत. तहसील कार्यालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सोडा तहसीलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील उघड्यावर लघुशंका करावी लागत असल्याचे चित्र आहे.

संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र सुरेश कव्हळे तहसीलदार असताना ज्या झपाट्याने कामांचा निपटारा व्हायचा ती गती नंतर च्या कालात दिसत नाही.

नव्याने रूजू झालेले तहसीलदार यांना अधिकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवने गरजेचे आहे. साधे स्वच्छतागृह साफ करून घेणे सुद्धा तहसील प्रशासनाला जमत नाही. तहसील कार्यालयातील पुरुष प्रसाधन गृहाची अतिशय दुरावस्था झाली. याआधी अशा आशयाचे काहि महिन्याअगोदर एक वृत्त झळकल्यानंतर तहसील प्रशासनाने घाणेरड्या स्वच्छतागृहाची सफाई करण्याऐवजी स्वच्छतागृहाला कुलूप लावून टाकले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व त्यावेली पन व आजपन तहसील कार्यालयातील मोजक्या चार दोन कर्मचाऱ्यांजवळ त्याच्या चाव्या आहेत. मात्र सामान्य नागरिकांना आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांना भर पावसात चिखलात उघड्यावर लघुशंकेला जावे लागते. काहि वेली तर चिखलात पाय घसरुन नागरिक पडून जखमी झाल्याचे पन बोलले जात आहे

Tahsilnews :नव्याने आलेले तहसीलदार यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एकीकडे नागरिकांना स्वच्छतेचे धडे द्यायचे अन् दुसरीकडे आपल्या प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर पाठवायचे हे कुणालाही पटणारे नाही.. त्यामुळे तहसीलदार महोदय, बघा तुमच्याकडून जमते का..!

केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवारास सात्वनपर भेट (  Pratapraojadhav )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

Pratapraojadhav:शेगांव .खासदार तथा केंद्रीय आयुष्यमान, व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा मा .न.प.सदस्य विजयबाप्पू देशमुख यांच्या परिवारास दि.२७ जूलै २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता जूनी वस्ती येथील घरी सात्वनपर भेट देवून आस्थेने विचारपुस केली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

मा.न.प.सदस्य तथा शहरातील प्रतिष्ठित नागरिक विजयबाप्पू देशमुख यांचे वडीलबंधु स्व.रमेशराव बाप्पू यांचे दि.१७ जूलै रोजी निधन झाल्यामुळे मा.ना प्रतापराव जाधव हे शेगांव येथे आले असता.

त्यांनी देशमुख परिवारांच्या घरी भेट देवून स्व.रमेशराव बाप्पू यांचे प्रतिमेला अभिवादन करुन सात्वन केले यावेळी त्यांचे सोबत मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर हे सुद्धा हजर होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, थारकर,उमेश अवचार, मयुर पाटील यांची उपस्थिती होती

Pratapraojadhav:तर यावेळी स्व.रमेशराव देशमुख यांचे बंधु सुभाषराव देशमुख, विजयबाप्पू देशमुख, मुले दिनेशबाप्पू देशमुख,  उमेशबाप्पू देशमुख, गणेशबाप्पू देशमुख व नातु साहिल देशमुख यांच्या सह परिवारातील सदस्य हजर होते.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नूतून कार्यकारणी जाहीर( medianews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

शेगाव.पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना रजिस्टर नंबर एफ 5595 या संघटनेची शेगाव तालुका व शहर कार्यकारिणी दिनांक 25 /7/ 2024 रोजी विश्रामगृह शेगाव येथे एका बैठकीत गठीत करण्यात आली सदर बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष देवचंद्र समदुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

यावेळी बैठकीला उमेश भाऊ शिरसाट श्रीकांत भाऊ कलोरे सागर शिरसाट उमेश राजगुरे अर्जुन कराळे संजय ठाकूर गौतम इंगळे ऋषिकेश देठे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

यावेळी शेगाव तालुका अध्यक्षपदी सागर बाळकृष्ण शिरसाट तर शेगाव शहर अध्यक्षपदी श्रीकांत गोविंद कलोरे यांची निवड करण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच शेगाव तालुका सचिव पदी गौतम इंगळे तर शेगाव शहर सचिव पदी उमेश राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शेगाव तालुका उपाध्यक्षपदी अर्जुन कराळे तर शहर उपाध्यक्षपदी संजय ठाकूर तालुका कोषाध्यक्षपदी ऋषिकेश देठे तर शहर कोषाध्यक्षपदी दिनेश घाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली.

medianews:तसेच सदस्य पदी कमलेश शर्मा, अक्षय सावदेकर, मिलिंद सराटे, दादा बाराहाते आदिंची निवड करण्यात आली

लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे अदोंलन ( Congressnews )

0

 

सय्यद जहीर लोणार तालुका प्रतिनिधि

Congressnews:आज लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

तसेच थकीत पिक विमा रक्कम वितरण तसेच इतर समस्यांबाबत अदोंलन लोनार तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेश मापारी, शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात आज तहसील समोर धरणे अदोंलन करून निवेदन देण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

मागील ६ महिन्यात राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून राज्य शासनाने कर्जमाफी करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत,

कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी. त्याचप्रमाणे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना आर्थ‍िक दिलासा मिळण्यासाठी शासनाने पिक विमा योजना सुरु केली आहे.  खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी आहे.

परंतु असे असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2023-2024 मध्ये पिक विमा योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातून एकुण 1042801 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 302112 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरुन त्यांना 272.7 कोटी रु. वितरीत होते अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत 77156 शेतकऱ्यांना 51.32 कोटी रु. निधी वाटप करण्यात आला आहे. अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची 221.26 कोटी रु. नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे.

जवळजवळ 224992 शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. त्याचबरोबर खत, बियाणे अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे. मात्र शेतमालाचे बाजारभाव घटतच आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतजमीन बऱ्याच प्रमाणात वनविभागाच्या हद्दीला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते. रोही, हरिण, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

वारंवार शासनाकडे या समस्यांचा पाठपुरावा करून देखील वनविभागाकडून शेतजमीनींना कुंपणाची व्यवस्था केली जात नाहीये. तसेच वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतमाल नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यातील शेतकरी अद्यापपर्यंत प्रतीक्षेत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थ‍िक बळ देण्यासाठी शासनाने त्यांची हक्काची पिक विमा नुकसान भरपाईची थकीत रक्कम तातडीने वितरीत करावी, शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून संरक्षणाची हमी द्यावी, मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा निधी वितरित करावा तसेच कृषी पंपासाठी वाढविलेल्या प्रतियुनिट वीज दरामध्ये कपात करण्यात यावी.

Congressnews:यावेळी कांग्रेस पक्षाचे जेष्ट नेते प्रकाश धुमाळ, अन्नाभाऊ सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव पटोळे,माजी पंचायत समिति सभापति ज्ञानेश्वर चिभडे,ओ.बी.सी.सेल जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात,गट नेते भुषण मापारी, मा.नगर सेवक शेख करामत अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तौफिक कुरैशी, युवक कांग्रेस जिला अध्यक्ष अनिकेत मापारी,माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे,रामचद्र कोचर,ओ.बी.सेल शहर अध्यक्ष अबांदास इंगळे,माजी नगरसेवक सतोंष मापारी,अरुण जावळे,युवक शहर अध्यक्ष विकास मोरे,तालुका युवक अध्यक्ष अमोल सोनुने, गणेश घायळ, कैलाश घायळ,कृण्णा बाजाड, मदन परसुवाले,शंकर कोकाटे,विनोद राउत,सुरेश वाठोरे,विलास मोरे,सिध्देश्वर वाफुडकर,विलास मोरे,योगेश थोरंवे,मुरली चिभडे,गोपी आखाडे,शुभम कोकाटे,जनार्दन घायाळ,सुरेश वाटोळे,नाथा घुगे, शिवाजी तनपुरे,

पाण्याची टाकी जमीन दोस्त झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण? कार्यवाही करण्यासाठी झोपेचे सोंग,जीवनावश्यक गरजच झाली दूर्लक्षीत….?( brekingnews )

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

brekingnews:बुलडाणा:-संग्रामपूर तालुक्यातील चिचारी हे आदिवासी बहुल भाग असलेला छोटंसं गाव, गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होवू नये.

यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.परंतू काही दिवसांपासून गावात पाण्याची टाकी अचानक जमीन दोस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटला आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

तरीही शासन व प्रशासन डोळेझाक करीत असून आंधळे पणाचे सोंग घेतल्याचे चित्रण पहायला मिळत आहे.अजूनपर्यत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.शासन आणि प्रशासन डोळेझाक करीत आहेत,कुंभकर्णाच्या स्थितीत आहेत की काय?

असा प्रश्न उपस्थित होत आहे? आमच्या प्रतिनिधीला अशी माहिती प्राप्त झाली की टाकीच्या बांधकामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे अशी अवस्था बघायला मिळते आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी सगळीकडे चर्चा पण सुरू आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदार टेंडर यांच्यावर कारवाई का केली नाही?वरिष्ठ अधिकारी सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

brekingnews : परंतू अद्याप ही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.कुणाचा आशिर्वाद आणि कुणाचा पाठिंबा आहे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.ब्युरो रिपोर्ट सूर्या मराठी बुलढाणा.

प्रतिकिऱ्या 👇👇👇👇

चिचारी येथिल निकृष्ट बांधकाम केलेला जलकुंभ कोलमडून पडल्या प्रकरणी संबंधित विभागाकडे रितसर तक्रारी केल्या आहेत, मतदार संघातील आदिवासी भागात असे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होऊन ते नामशेष होत आहेत,

 

पण या भ्रष्टाचार बाबत लोकप्रतिनिधी सभागृहात ब्र शब्द बोलत नाहीत. अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वाद घेऊन अधिकारी व ठेकेदार निधड्या छातीने मोकळे फिरत असुन कोणत्याही प्रकारची कारवाई होतांना दिसत नाही.

रितसर तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दोषींवर कारवाई होत नसेल तर लवकरच आम्ही न्यायालयात जाणार..

प्रशांत डिक्कर
विदर्भ अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

मेहकर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वत आल्या पासुन लोणार चालुक्याला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करन्याची संधी मिळाली नाही.कॉंग्रेस पक्षाने आता पर्यंत मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही.

मेहकर मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यात यावी व साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी देण्यात यावी. मागणी लोणार तालुका व शहर कॉंग्रेसने केली आहे.

अजातशत्रु असलेले साहेबराव पाटोळे यांनी नेहमीच विकासाला महत्व दिले.या भुमिकेतून त्यानी लोणार नगरपालिकेच्या विकासात भर घातली अनेक वर्षापासुन लोणार नगर पालिका मध्ये त्यांच्या कुटुंबातील नगरसेवक दोन वेळा नगराध्यक्ष एक वेळ विरोधी पक्षनेते तर एक वेळा महीला व बाल कल्याण समिति सभापती पद त्यांच्या परिवारितील सदस्यांनी भुषविलेले आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

आघाडीकडुन ही जागा घेऊन कॉंग्रेस पक्षाने साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी दिल्यास निच्श्रितच विजयी होतील.
साहेबराव पाटोळे यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे.

त्यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम च्या माध्यमातुन संकल्प मेळावा , परीवर्तन मेळाव्याचे उर्जामंत्री नितीनजी राऊत व महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजन करुन कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Congress :-साहेबराव पाटोळे मातंग समाजातील आहे.हा समाज अनुसुचित जाती मधुन दुसर्या क्रमांकावर आहे.त्यामुळे मेहकर मतदार संघात ह्या समाजाचे मतदार निर्णायक आहे.या बाबींचा विचार करून साहेबराव पाटोळे यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी ध्यावी अशी मागणी लोणार तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने केली आहे.

धान्य वितरण कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्या साठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने तहसीलदारांना निवेदन..( buldhananews )

0

 

इस्माईल शेख सह अमिन शेख

buldhananews:शेगाव: स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने धान्य वितरणाचे कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्यासाठी चे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने शेगाव येथील तहसीलदार यांना सोपविण्यात आले..

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की धान्य दुकानातून ग्राहकांना धान्य वितरण व ई केवायसी नोंद ही पोस्ट मशीनद्वारे करण्यात येत आहे.

मात्र सर्वरमध्ये वारंवार प्रॉब्लेम येत असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत अनेक वेळा हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचलेले आहेत त्या कारणाने रेशन धान्य दुकानदारा विरोधात असंतोष निर्माण होताना दिसत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत ठोस पर्याय काढण्यात यावा तसेच इ के वाय सी चे काम इतर सेवा केंद्र मार्फत करण्यास परवानगी देण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या आहेत अन्यथा ही केवायसी कामावर बहिष्कार घालण्याचा इशाराही या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

buldhananews:निवेदन देताना स्वस्त धान्य संघटनेचे शेगाव शहराध्यक्ष मंगेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष विजय भालतीळक दीपक धमाल विनोद लांजुळकर सोनू मोहोळ जि.ओ काळे मोहन धनोकार मंगेश ढोले अक्षय देशमुख गोपाल पल्हाडे व इतर उपस्थित होते.

विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Andolannews:जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना च जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे.

तसेच बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित मागण्याविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरण विरोधात प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी मा. विजेंद्रकुमार धोंडगे , जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात दि. 16.07.2024 रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे.

प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, प्रशासकीय बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशन घेऊन बदल्या करणे,विनंती व आपसी बदल्या करणे , जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे .,जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात देणे , प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी /मं.अ.यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून तहसील कार्यालय लोणार समोर विदर्भ तलाठी संघ नागपुर -२ यांच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनास श्री. विजेंद्रकुमार धोंडगे जिल्हाध्यक्ष विदर्भ तलाठी संघटना नागपुर -२ जिल्हा शाखा बुलडाणा व श्री शिवानंद वाकदकर जिल्हा सचिव यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले.सदर धरणे आंदोलनाला श्री.नंदकिशोर मापारी अध्यक्ष शिवछत्र मित्रमंडळ लोणार, प्रा. बळीरामजी

मापारी शिवसेना जिल्हाप्रमुख, पांडुरंग सरकटे शिवसेना शहर प्रमुख,लोणार, श्री.राजुभाऊ मापारी तालुका अध्यक्ष काँग्रेस,डॉ. गोपाल बच्चीरे जिल्हा संघटक शिवसेना (उ.बा. ठ.),श्री साहेबराव पाटोळे काँग्रेस नेते, श्री.भूषण पाटील तहसिलदार लोणार,रामप्रसाद डोळे नायब तहसीलदार,

श्रीमती योगेश्वरी परळीकर नायब तहसिलदार लोणार, यांनी एकदिवसीय धरणे आंदोलनाला भेट देऊन मनोगत व्यक्त केले. विविध पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.

Andolannews :आंदोलनाचे प्रास्ताविक सचिन शेवाळे तर आभार वसुदेव जायभाय यांनी केले.सदर आंदोलनाच्या वेळी आजी माजी पदाधिकारी व लोणार तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सभासद हजर होते.

तेल्हारा तालुक्यातील अतिक्रमण निकाशीत करू नये  रिपाइं(आठवले) पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन ( ramdasathvale )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

तेल्हारा 23 जुलै:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने,तेल्हारा तालुक्यातील गायरान ई-क्लास जमिनीवर शेती व रहिवासी साठी केलेले अतिक्रमण निकाशीत करू नये,अशी मागणी रिपाइं अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या समवेत शिष्ट मंडळाने निवेदनाच्या माध्यमातून तेल्हारा तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

या निवेदनाच्या द्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे पार पडलेल्या अधिवेशनात आपल्या विधान भवनातील भाषणात महाराष्ट्रातील गायरान, वन जमिनावर शेतीसाठी आणि रहिवाशी करिता 4 हेक्टर पर्यंतचे केलेले.

अतिक्रमण, निकषित न करता,नमूद जमिनीचे सातबारे आणि रहिवाशी साठी करण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावावर नमुना आठ ‘अ’ करण्यात यावे अशा प्रकारच्या तरतूद करण्यात आली आहे.

ही बाब तेल्हारा तहसीलदार यांना पटवून दिले.त्याचं प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मंत्री आणि दोन आमदारांची समिती गठीत करण्यात आली.

असून,नमूद समितीला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिल्याचे आपल्या भाषणात सांगितले,या कडे तहसीलदार यांचे लक्ष वेदले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तेल्हारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर ,जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, यांच्या समवेत जिल्हा महासचिव जे.,पी.सावंग,तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात,तेल्हारा शहर अध्यक्ष भारत पोहरकर,तेल्हारा सचिव भीमराव तायडे, अकोट तालुका महासचिव दिनेश पेटकर, संघटक सुरज

ramdasathvale:तायडे,ओबीसी आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष विलास मनतकार ,दिलीप थोरात, शेषराव तायडे,गजानन बोदडे,प्रकाश तायडे,भास्कर पाचपोर, वसंतराव खेट्टे,शहादेव कुरवाडे,वेणूताई डोंगरे,रामा अलकर,दिलिप भगेवार, नंदू भगेवार,देवानंद तायडे,गजानन भांगे,अर्जुन दामोदर,यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

पळशी (झा.) ग्रा.प.मार्फत ग्राम स्वच्छता सप्ताहाचे आयोजन ( grampanchayatnews )

0

 

grampanchayatnews:संग्रामपूर तालुक्यातील पळशी( झा.)येथे ग्रामपंचायत च्या वतीने आज दिनांक 22 जुलै 2023 रोजी गावामध्ये धूर फवारणीची सुरवात करण्यात आली.

विशेष या पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई मलेरिया डेंगू चे प्रमाणात वाढ झाली असल्याने, ग्रामपंचायत प्रशासनाने पळशी झाशी येथील मेन रस्ता वार्ड नंबर एक दोन तीन चार या वार्डात फवारणी केली तसेच उर्वरित फवारणीचे काम ग्रामपंचायत करत आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

यापूर्वीही ग्रामपंचायतीने नाल्या काढणे गावातील नाल्यांमधील गाळ बाहेर फेकणे. पाण्याची टाकीची साफसफाई करणे, गावातील लाईट लावणे , लेक लाडकी सारख्या योजनेची ग्रामपंचायत मध्ये अंमलबजावणी करणे, तसेच बऱ्याच प्रकारचे उपक्रम ग्रामपंचायत करत आहे. हे करत असताना गावातील नागरिक व शाळकरी मुलांमध्ये सुद्धा खूप उत्साह दिसू लागला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच नागरिकांच्या आरोग्य बाबतीत तसेच प्राथमिक गरजांमध्ये ग्रामपंचायत कुठेही कमी पडणार नाही.

grampanchayatnews:असे सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद याबाबतही सरपंच यांनी आभार व्यक्त केले.