Home Blog Page 95

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

0

 

अनिलसिंग चव्हाण  संपादक

Pratapraojadhav:देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी , उपचार घेता यावा दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली …

बुलढाणा येथील जिल्हा केंद्रीय बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवुन चौथ्यांदा निवडून दिले.

आणि त्यांच्याच आशीर्वादाने केंद्रामध्ये आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार असलेल मंत्रीपद आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद मला मिळाल .

एक क्लिक 👇👇👇👇👇

https://techmaharashtra.in/cameranews/

या मंत्रिपदाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णांना झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित असलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

देशभरातील आणि राज्यातील कोणत्याही दवाखान्यामध्ये दिल्ली मुंबई हैदाबाद आणि एम्स हॉस्पीटल असेल तेथेही बुलडणा जिल्ह्यातील नागरिकांना व रुग्णांना उपचार घेता यावा त्यांच्या मदतीसाठी हा कक्ष उभारला आहे.

Pratapraojadhav:कोणत्याही आजारातील उपचार आणि शत्रकिया संदर्भातील माहिती या कक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना सहज मिळणार आहे .या आरोग्य कक्षाचे प्रमुख म्हणून राजू भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल नंबर 8830330754 हा असून त्यांच्याशी रुग्णांच्या नातेवाईकनी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले …

विशाळगड येथील त्या घटनेच्या दोशिं वर कारवाई करा मुस्लिम समाजाकडून निवेदन सादर.( vishalgadnews )

0

 

संग्रामपूर ता. प्र अरशद पठाण

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सोनाळा पो. स्टेशन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

सवीस्तर वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथे अतिक्रमण हटविण्याची च्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी राजे यांचे नेतृत्वात कोणतीही परवानगी नसताना१४ जुलै रोजी मोर्चा काढला होता.

या मोर्चात दरम्यान गाजापूर गावाचा व विशालगड अतिक्रमण या कोणताही संबंध नसताना गाजापूर गावातील मुस्लिम समाजाचे लोकांवर अत्यंत ह्दय द्रावक हल्ला केला मोर्चा काढण्या अगोदर तेथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष योग्य सुरक्षा पुरविली नाही याचा परिणाम असा झाला की मोर्चामध्ये सहभागी झालेल्या समाज कंटकांनी मुस्लिम समाजाचे लोकांवर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल चार चाकी वाहन आणि घरांची तोडफोड केली तसेच लहान मुलांना महिलांना मारहाण सुद्धा करण्यात आली या हिंसाचारात मोर्चात सहभागी सर्व गुंडांना अत्यंत अ मानवी वर्तन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे या घटनेची सकल चौकशी करून छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या सोबतच्या गाव गूंड्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना त्वरित अटक करून न्यायालयीन प्रक्रिया चालवावी आणि मुस्लिम समाजांच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

vishalgadnews:निवेदनावर जुनेद खान. शे. किस्मत. सुफियान खान. शेख हसीन. शेख तौफिक. शेख बबलू. शेख मुबारक आदी मुस्लिम बांधवांच्या सह्या आहेत

आषाढी एकादशी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचालित के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल, किनगाव च्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ( Yavalnews )

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yavalnews:आषाढी एकादशीच्या निमित्ताने के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल किनगावमध्ये भव्य आणि भक्तीमय आयोजन करण्यात आले. या प्रसंगी, बाल गोपालांनी विठ्ठल, रुख्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, जनाबाई, अशा अनेक संताच्या वेशभूषा साकारून आणि आकर्षक वस्त्र परिधान करून दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

ए.पी.एस संस्थेचे कार्य अध्यक्ष सचिन तडवी सर व प्राचार्य गणेश मेश्राम सर यांच्या हस्ते दिंडीच्या सुरवातीस पालखी पूजन करून या सोहळ्याची सुरवात करण्यात आली.

स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांनी टाळ, लेझिम, पावली, फुगळी खेळून वातावरण भक्तीमय व उत्साहपूर्ण बनवले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

या प्रसंगी, अमीर प्रतिष्ठानचे कार्य अध्यक्ष सचिन तडवी, प्राचार्य गणेश मेश्राम, संपत बारेला, तायडे मॅडम, महाजन मॅडम, तडवी मॅडम, मेश्राम मॅडम,बारेला मॅडम, साठे मॅडम, जुबेर तडवी, रमण तडवी, अल्ताफ पटेल, राजू कुंभार, खलील तडवी,मुकेश भोई सर्व कर्मचारी वृंद व पालक वर्ग उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचालित के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल, किनगाव च्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ( Yavalnews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि धार्मिकता यांचे महत्त्व वाढवण्याचे काम यशस्वीरीत्या झाले.

Yavalnews:आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत झालेल्या या भक्तीमय सोहळ्याने सर्व उपस्थितांच्या मनात भक्तीचा सागर उभा राहिला.

वसंतराव नाईक विद्यालय बीबी येथे शाळेच्या किचन रूम ला लागली अचानक आग ( brekingnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

brekingnews:आज दिनांक 16-7-2024 च्या रात्री ठीक10.30 वाजता शाळेमध्ये असलेल्या किचन रूम समोरील लाकडाच्या गंजीला अचानक भली मोठी आग

लागली ही आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नवयुवक तरुण वसंतराव नाईक शाळेचे प्राचार्य आर -बी- राठोड सर शाळेचे कर्मचारी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच महसूल चे तलाठी व कोतवाल हे सुद्धा हजर होते.

बिबी गावचे सरपंच पुत्र दीपक गुलमोहर उपसरपंच भास्कर खुळे -बिबी येथील सर्व पत्रकार बांधव हे सुद्धा हजर होते त्यानंतर लगेचच लोणार येथून अग्निशमन द ला ला पाचारण करण्यात आले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

वसंतराव नाईक विद्यालय बीबी येथे शाळेच्या किचन रूम ला लागली अचानक आग ( brekingnews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व गावातील तरुणांनी बकेट हंडा मिळेल त्या वस्तूमध्ये पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व ती आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबी च्या साह्याने तिथे

brekingnews:पेटलेल्या लाकडाच्या तुकड्यांना बाजूला करून आग आटोक्यात आणण्यात आली अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांची तारांबळ उडाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप ( eknathshinde )

0

 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन झाले

eknathshinde:सोलापूर, दि. १६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत,आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे, संचालक नितीन गोरे, सिद्धांत कदम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम गेल्या १४ वर्षापासून राबविण्यात येत असून याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या विभागांने आषाढी वारी पुरतेच मर्यादित न राहता राज्यातील गावा गावात पर्यावरणा विषयी नागरिकांमध्ये जनजागृतीची मोहिम राबवावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निधीची चिंता करू नये, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

जगद्गुरु संत तुकाराम यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ या अभंगाप्रमाणे आपल्याला हरित महाराष्ट्र करावयाचा आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वातावरणातील उद्याचा धोका टाळावयास मदत करणे आवश्यक आहे. जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करावी. एक झाड आईच्या नावाने लावून त्याचे संवर्धन करावे. असे केल्यानेच अतिवृष्टी, प्रदूषण, अवेळी पडणारा पाऊस यावर मात करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सर्व शेती पंप सौर उर्जेवर रूपांतरित करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा, मागेल त्याला शेततळे, वारकऱ्यांसाठी महामंडळाची स्थापना, दिंडीला २० हजार रुपये अनुदान देत आहोत. सर्व धर्मियांसाठी तीर्थ यात्रा योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. संत ज्ञानेश्वर यांचे जन्म ठिकाण नेवासा येथे विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतीत चांगले काम झाल्याने या वर्षी राज्याला कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन्ड 

राज्यात २० लाख हेक्टर बांबू लागवड करण्याचे धोरण आहे. त्यासाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान देत आहोत. बांबू मुळे २० टक्के ऑक्सिजन अधिक मिळतो. सौर ऊर्जा वापर करण्यासाठी धोरण आखलेले आहे. प्रत्येक महापालिकेस एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पंतप्रधानांनी देखील आईच्या नावे एक झाड लावण्यास सांगितले आहे. पर्यावरण समतोल सावरण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हरित महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, महसूल मंत्री श्री. विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप ( eknathshinde )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणीकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

eknathshinde:यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, श्रीमती चंदाबाई तिवाडी, शाहीर देवानंद माळी, श्रीमती लता शिंदे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सादर केले.

जळगाव जामोद पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले(ncbnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

ncbnews:आज दिनांक 16/7/2024 ला जळगाव जामोद पंचायत समिती वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या गटाच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर व जिल्हा कार्याध्यक्ष प्रसंजित दादा पाटील यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

विषय सहा महिन्यापासून प्रलंबित घरकुल व मस्टर व घरकुलांचे न पडणारे हस्ते व जनतेचे विविध विषयाला घेऊन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट यांची आढावा बैठक व पक्षप्रवेश जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

जळगाव जामोद पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले(ncbnews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्टी अजित दादा पवार गट यांचे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस माननीय जावेद शेख माजी बांधकाम सभापती

ncbnews:यांची घरवासी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षात पक्षप्रवेश झाले तसेच यांच्यासोबत असंख्य नेते व कार्यकर्ते यांची घरवापसी झाली

लोणार शहरात अजगराच्या पिलाला सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान  ( ajgar news )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

ajgar news:लोणार येथील पटेल नगर येथील रहिवासी संतोष जाधव यांच्या घराच्या गेट मध्ये एक साप दिसला. त्यानी लगेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना याबाबत कळविले त्यानी तात्काळ घटनास्थळ गाठले.

अजगर ताब्यात घेऊन. त्यानंतर त्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याला याची माहिती दिली हा अजगर साप लोणार मानवी वस्ती मध्ये आढळलेली पहिलीच घटना आहे अजगर हा साप वन्यजीव कायद्याअंतर्गत शेडूल वन चा प्राणी आहे कारण त्याचे वाघाएवढेच महत्व आहे.

या नंतर त्याला त्याच्या निसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.यावेळी सर्पमित्र विनय कुलकर्णी म्हणाले की, अजगर हा बिनविषारी साप असुन त्याच्याबद्दल ग्रामिण भागात अनेक गैरसमज आहेत.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

हा साप विषारी घोणस सदृष असल्याने लोक त्याला विषारी समजुन मारतात. लोणार परिसरात अनेक सापाच्या जाती आढळतात. त्यापैकी, नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चारच जाती विषारी आहेत. सापांना मारणे, त्यांची तस्करी करणे, सापाचे खेळ करणे वन्यजीव कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे.

कुलकर्णी यांनी आजवर हजारो सापांना पकडून जीवदान दिले आहे. जर आपल्या घराच्या परिसरात साप निघाला तर त्याला न मारता जवळच्या सर्पमित्राशी किंवा वनकर्मचा-यांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचे पाणी सापाच्या बिळात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतात तसेच सगळ्या सापांच्या पिल्लांचा जन्म या काळात होतो त्यामुळे ग्रामीण भागात काळजी घेणे आवश्यक आहे.

लोणार शहरात अजगराच्या पिलाला सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान  ( ajgar news )

या अजगराला सोडायच्या वेळी RFO प्रकाश सावळे, वनरक्षक कैलास चौधरी सर्पमित्र सचिन कापुरे, कमलेश आगरकर, उमेश चिपडे उपस्थित होते.

लोणार तालुक्यात साप अढळल्यास सर्पमित्रानं फ़ोन करावा.
सर्पमित्र विनय कुलकर्णी
मो- 8888506010
सर्पमित्र कमलेश आगरकर
मो – 9689288516
सर्पमित्र सचिन कापुरे
मो- 8888188508

जुन्नर पोलीस ठाणे विरुद्ध होणार वंचितचा एल्गार..!! – प्रदीप गौतम साळवे_( vanchitnews )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

vanchitnews:पुणे,जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरांमध्ये जुन्नर गावचे भूमिपुत्र प्रशांत जिवाजी सोनवणे, यांचे तक्रार अर्ज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांना प्राप्त झाल्यास सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार, १९९४ सालापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या समितीच्या लागत पानबिडी शॉप चे पान टपरी वर सोनवणे कुटुंब आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करत आहे,

व पानबिडी शॉप चे भाडं हे पीडब्ल्यूडी च्या अंतर्गत असताना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांना भरत होते, लाईट बिल हा पुरावा देखील आहे, जागा पीडब्ल्यूडी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असल्याने २०१४ या सली राजगुरुनगर (खेड) न्यायालय मध्ये याचिका दाखल करण्यात आली,

case type : Regular Civil Suit , filling no : 3200622/2014, Register no : 3200187/2014, CNR no : MHPU22-00552-2014 अंतर्गत न्यायप्रविष्ठ बाब असताना व न्यायालयामध्ये संघर्षा चालू असतानाही सोनवणे यांचे पान बिडी शो तोडण्यात आले आहे. सोनवणे कुटुंब हे पान पानबिडी शॉप च्या आधारावर कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असताना, दिनांक १०/०७/२०२४ रोजी, न्यायप्रविष्ट बाब असून असे माहिती असताना देखील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या भारतीय संविधान च्या माध्यमातून कायद्याचं व शांततेचा भंग करून लोकशाही विरुद्ध हुकुमशाही पद्धतीने गोरगरीब जनतेवर दडपशाही प्रमाणे दुकान हटवण्यात आले आहे.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

तक्रारदार प्रशांत भिवाजी सोनवणे यांची माहिती अनुसार पानबिडी शॉप हटवण्यासाठी कोणत्याही शासकीय ऑर्डर व कोणतीही माहिती न देता कायद्याचे उल्लंघन करून संपूर्ण पानबिडी शॉप तोडून संपूर्ण मालाचे नुकसान होऊन पानबिडी शॉप गुंडशाही प्रवृत्तीने पान टपरी तोडून गुंडशाही प्रवृत्तीने कोणत्याही अधिकार नसताना ताब्यात घेणारे संजय शिवाजीराव काळे, रुपेश सुभाष कवडे, व त्यांचे सहकारी असून यांच्या मागे कोण मास्टर माइंड आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व पाणबिडी शॉप चे नुकसान भरपाई च्या माध्यमातून पाणबिडी शॉप परत उभारण्यात यावे,

पानबिडी शॉप हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारे शासकीय ऑर्डर नसताना पोलीस बंदोबस्त आदेश देणारे पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने जुन्नर पोलीस ठाणे विरुद्ध इच्छा नसताना देखील जनतेला न्याय देण्यासाठी दिनांक ३१/०७/२०२४ रोजी आंदोलन करण्यात येईल. आशा करतो आपण लवकरात लवकर सखोल चौकशी करून गुन्हेगारांना अटक करून गोरगरीब जनतेला न्याय द्याल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे पत्र द्वारा मागणी वंचित बहुजन आघाडी कामगार जुन्नर तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांनी जुन्नर डी वाय एस पी कार्यालय चे अधिकारी राजेंद्र चौधरी साहेब व जुन्नर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांना निवेदन देण्यात आले.

vanchitnews:सोबत जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा निरीक्षक), मारुती खरात पाटील,पंकज भाऊराव सरोदे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), अविनाश भाऊ रोकडे (आंबेगाव तालुका सचिव),नफीस भाई शेख (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), मंगेश भाऊ राठोड (घोडेगाव शहराध्यक्ष), आकाश शिंदे (घोडेगाव शहर सचिव), ऍड. रंजीत यादव (आंबेगाव तालुका सचिव), संकेत भाऊ अस्वार (ओतूर शाखा अध्यक्ष), अर्चनाताई (कशी केदार जुन्नर तालुका उपध्यक्षा), सुरैया ताई शेख (जुन्नर तालुका संघटक), गणेश भाऊ आस्वार (जुन्नर तालुका सचिव) अरुण दादा सोनवणे, मेहबूबा कुरेशी, नितीन भाऊ काशी केदार, सीताताई मोरे, संगीता ताई मिर्के, संतोष रोकडे, अमित रोकडे, बाळासाहेब वाघ, सुरेश दादा रोकडे, उत्तम भाऊ वाघमारे, आशुतोष मोरे, ज्ञानेश्वर गाडेकर,प्रशांत भिवाजी सोनवणे यांचे परिवार उपस्थित होते.

बिबी परिसरामध्ये साथीच्या रुग्णात वाढ आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज.( brekingnews )

0

तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:बिबी परिसरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून.डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकला, संडास, उलटी, व्हायरल इन्फेक्शन च्या साथीने रुग्ण बेजार आहे ,

सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र डास ,मच्छर यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

परंतु बिबी ग्रामीण रुग्णालयात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पदावर असून सुद्धा दोन डॉक्टर स्वतःच्या सोयीनुसार नोकरी करत असल्याची चर्चा रुग्ण नातेवाईकांकडून होत आहे.

एमबीबीएस डॉक्टर नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. व आयुष विभागाच्या डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेऊन समाधान माणून माघारी फीरावे लागते व खाजगी उपचार घ्यावे लागत असून गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तसेच बीबी येथे पोलीस स्टेशन असल्यामुळे आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून होणे गरजेचे असते तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुलं यांना फिटनेस साठी नियमित वैद्यकीय दाखल्याची गरज असते मात्र येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी हजर राहत

नसल्यामुळे तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी दाखले आणावे लागत असल्याचा मनस्ताप ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनातेवाईक सर्वांनाच होत आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी संबंधित आरोग्य विभाग दखल घेईल का ? याकडे रुग्ण नातेवाईक जनतेचे लक्ष लागून आहे.

brekingnews: तपासणीसाठी आयुष विभागात झालेली महिला ,पुरुष जेष्ठ नागरिक ,बालक गर्दी. तर भरती असलेले रुग्ण .

यावल तालुक्यात खाजगी सेतू सुविधा केंद्र चालकांचा मनमानी कारभार बंद करा ग्रामपंचायत ऑपरेटर यांची मागणी (  grampanchayatnews )

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

grampanchayatnews:यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून शासनाने नेमून दिलेल्या ४०० पेक्षा जास्त केन्द्रांच्या माध्यमातुन सुविधा ग्रामीण नागरीकांना दिल्या जात.

असताना तालुक्यातील खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेल्या सीएससी आय डी महाऑनलाईन वापर करून नेमून दिलेले क्षेत्र सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध कामे करत नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत शासनासह नागरीकांची फसवणूक करत.

असल्याने खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांची चौकशी करून त्यांचे वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील ग्रा. पं. सेवा केंद्र चालकांनी येथील गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून शासनाने नेमून दिलेल्या ४२० पेक्षा जास्त सुविधा ग्रामीण नागरीकांना दिल्या जात.

असताना तालुक्यातील खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेल्या सीएससी आय डी महा ऑनलाईन वापर करून नेमून दिलेले क्षेत्र सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध कामे करत नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत शासनासह नागरीकांची फसवणूक करत.

असल्याने याचा रोष ग्रामीण पातळीवरील गावातील ग्राम पंचायतच्या आपले सरकार सेवा केन्द्रातून माफक सेवा देणाऱ्या केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की खाजगी सेवा केंद्र चालकांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांना सेवा केन्द्राच्या माध्यमातुन गैरप्रकार करण्यास वाव मिळत आहे.

यामध्ये शासकीय ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र बदनाम होत असल्याची तक्रार निवेदनात केली असून त्यांचे वर तात्काळ योग्य दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावल तहसीलचे निवासी तहसीलदार संतोष विनंते यांना दिलेल्या निवेदनावर न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीचे संजय तायडे, रौनक तडवी परसाळे, प्रभाकर तायडे बामणोद, विठ्ठल कोळी मनवेल, विजय बाविस्कर साकळी, गोकुळ तायडे म्हैसवाडी, सुजाता ढाके किनगाव बुद्रुक,  वड्री, पुनम धनगर किनगाव खुर्द, विजय बाविस्कर साकळी ,

grampanchayatnews:सुलतान पटेल पाडळसा ,जिवन भंगाळे अंजाळे, दिपमाला पारधे हिंगोणा, राकेश कोल्हे वढोदे प्रगणे सावदा, अर्चना काटे शिरसाड , दिलीप धनगर सांगवी , सतिष गावंडे थोरगव्हाण,अरकान तडवी नायगाव ,वसीम तडवी कासारखेडा,आकाश चौधरी बोरखेडा बु , संजय कपले आमोदा, यांचे सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केन्द संचालकांच्या सह्या आहेत