Home Blog Page 97

मारवाडी ब्राह्मण समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन डॉक्टरांच्या हस्ते सत्कार ..(buldhananews )

0

 

इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव

buldhananews:शेगाव: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणारी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण करणाऱ्या मारवाडी ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा समाजातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार प्रमाणपत्र, व भेटवस्तू देऊन सत्कार ,सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शेगाव शहरातील मध्यभागी असलेल्या भैरव चौकातील मारवाडी ब्राह्मण हितैषी मंडळ म्हणजेच परशुराम भवन येथे मारवाडी ब्राह्मण एसएससी मंडळ मारवाडी ब्राह्मण नवयुवक मंडळ मारवाडी ब्राह्मण महिला मंडळ आणि मारवाडी ब्राह्मण भाऊ भेटी मंडळ शेगावच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमांमध्ये बारावी एच एस सी बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्के पेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या कनक अजय शर्मा, आशिष नवल शर्मा ,अदिती नितेश शर्मा, युवराज नरेंद्र तिवारी वेद किशोर उपाध्याय अंजली दीपक शर्मा, श्रुती

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

योगेश शर्मा, मोहित राजकुमार व्यास, तर इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अथर्व गोपाल शर्मा, लक्ष विठ्ठल तिवारी, सिद्धी निलेश शर्मा, विश्वनाथ चंद्रप्रकाश शुक्ला, निशा शामकुमार शर्मा आस्था महेश कलावटे, प्रियंका

राजपुरोहित प्रज्ञा संदीप पांडे, यांच्या सोबतच एमबीए व सीईटी मध्ये 94.15% मार्क्स मिळवणाऱ्या खुशी रितेश शर्मा यांचा डॉक्टर प्रेमचंद पंडित, डॉक्टर संतोष मिश्रा अखिलेश कलावटे डॉक्टर निखिल पांडे डॉक्टर निखिल मिश्रा डॉक्टर विजया जोशी बजरंग लाल शर्मा सुरेश शर्मा अरुण शर्मा

परमानंद शर्मा रामेश्वर शर्मा विनोद शर्मा पवन शर्मा रवी झाडोलीया, शोभा चुलेट ,गिरिजा प्रतीक शर्मा, यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार वितरित करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मंजू अशोक शर्मा, निर्मला मिश्रा मंजू दिनेश शर्मा, मनीषा शर्मा ,मीनाक्षी व्यास, किरण शर्मा ,सीमा शर्मा, सोनल शर्मा, रमा शर्मा, प्रेमलता शर्मा, माधुरी तिवारी, स्वाती मिश्रा, डॉक्टर सोनल कलावटे,

buldhananews:अनिता शर्मा, शोभा चुलेट, राणी शर्मा सुनीता तिवारी ,श्वेता तिवारी, गीता शर्मा, महेक शर्मा, कुंजन मिश्रा, रूपाली शर्मा, आरती शर्मा ,उर्मिला तिवारी, यांच्यासह मारवाडी ब्राह्मण हितेशी मंडळ, नवयुवक मंडळ, महिला मंडळ व बहुबीटी मंडळ च्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले

यावल तालुक्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार दोन ते तिन किलो धान्य कमी देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तक्रार निवेदन ( Yavalnews )

0

 

यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील सर्व धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकड्डन शासनाने ठरवुन दिलेल्या धान्यातुन दोन ते तिन किलो धान्य कमी दिले जात असुन,

अशा प्रकारे तालुक्यातुन लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जात असल्याने या मागे मोठा रेशनिंग घोटाळा तर नाही ना असा प्रश्न देखील या वेळी मोर्चा प्रसंगी उपस्थितांनी केला

असुन,याशिवाय संत्पत झालेल्या लाभार्थ्यांनी शिधापत्रिकां च्या प्रश्नासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार केल्यावर देखील यांच्या कड्डन आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( अजीत पवार ) गटाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील युवकचे यावल तालुका अध्यक्ष आकाश फेगडे, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या.

धान्य वाटप संदर्भात तक्रार निवेदन दिले,या निवेदनात म्हटले आहे की यावल तहसील कार्यालयाने आय.एस. ओ. कार्यालयाप्रमाणे दलालमुक्त शिधावाटप मोहीम राबवावी यासह पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे ११ विविध मागण्यांचे निवेदन दिले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी तहसीलदार यांनी ताभार्थ्यांचे तक्रारींची सविस्तर माहिती घेत आपण या मागण्यांचा योग्यरित्या पाठपुरावा करू असे आश्वासन शिधापत्रिका धारक महीलांना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना दिलेत ,

Yavalnews:याप्रसंगी यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते व आदि अधिकारी उपस्थित होते .मोर्चात शिधापत्रीकेवर धान्य मिळवणाऱ्या महीला लाभार्थी उपस्थित होत्या .

आठ दीवसात सुविधा ध्या अन्यथा ठीय्या आंदोलन ( andolannews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

andolannews:येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या अन्यथा ठीय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा ईशारा,

बीबी ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची तसेच गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली रक्त लघवी तपासणीची मशीन तात्काळ नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,

बीबी येथील ग्रामीण रुग्णालय हे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे 30 खाटांचे रुग्णालय आहे रुग्णालयामध्ये 3 अधिकारी कार्यरत असून त्यापैकी एक अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तर दुसरे एक अधिकारी हे बीबी येथे कार्यरत असताना ते बीबी येथे उपस्थित न राहता खामगाव या ठिकाणी ड्युटी करतात तर उर्वरित एक महिला अधिकारी ह्या नेहमी सुट्टीवर असतात गेल्या काही महिन्या अगोदर या रुग्णालयापासून जवळच असलेल्या खापरखेड घुले सोमठाणा

या गावांमध्ये भगरी मधून काही लोकांना विषबाधा झाली असता शेकडो विषबाधा झालेल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय बीबी येथे आणले असता त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता तर दुसरीकडे या रुग्णालयातील रक्त लघवी तपासणी मशीन ही गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना खाजगी लॅबमधून रक्त लघवी तपासून आणावी लागते त्यामुळे गोरगरीब रुग्णावर याचा फार मोठा भुर्दंड पडत आहे.

andolannews:तरी येत्या 1,जुलै पर्यंत रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी व रक्त लघवी तपासणी मशीन उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयामध्ये बेमुदत ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सहदेव लाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे निवेदनावर कार्तिक धाईत, आणिल लांडगे, ऋषिकेश धाईत ,भागवत मुळे, तुषार मुर्तडकर ,उद्धव आटोळे ,राम डुकरे, चेतन ढाकणे ,सागर मुर्तडकर, अजय कायंदे ,पांडुरंग कुलकर्णी ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेला कुलूप लावू :-डॉ. गोपाल बछिरे ( buldhananews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

buldhananews:लोणार नगरपरिषदेने किमान दहा दिवसातून एकदा स्वच्छपाणीपुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार न.प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.

जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ असलेलं लोणार शहराला महिन्यातून एकदा दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे पाणी जे पिण्याजोगे नाही असा अहवाल मुख्य अणुशास्त्रज्ञ बुलढाणा यांनी १२ डिसेंबर २०२३ व ८ फेब्रुवारी २०२४ ला दिलेला आहे असे असताना देखील नगरपरिषद दूषित पाणी नळ योजनेद्वारे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पुरवले जातो.

म्हणून डॉ. बछिरे यांच्या तक्रारी नंतर विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी श्री जोग यांच्या माध्यमाने दि. ७ जून रोजी पाण्याचे नमुने घेऊन मुख्य अनूजीवशास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीस पाठविले होते त्यानंतरही नळा द्वारे सोडलेले पाणी हे दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झाली आहे, जलशुद्धीकरणांमध्ये लागणारी रेती ही तीन वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही.

म्हणून १८ दिवस उलटून सुद्धा अद्याप सदरील पाण्याचे रिपोर्ट नगरपरिषदेस प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अणू जीवशास्त्रज्ञ यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा रिपोर्ट पाठविलेला नाही अथवा सदरील पाणीच प्रयोग शाळेत घेतलेही नसावे

असा आरोप डॉ. बछिरे यांनी मुख्याधिकार्‍यावर केला आहे. लोणार येथील जलशुद्धीकरण केंद्र ही शोभेची वस्तू झालेली आहे येत्या ८ दिवसात जलशुद्धीकरण यंत्र पूर्ण तया दुरुस्त करावे त्यात शुद्धीकरणासाठी लागणारी रेती आणून टाकावी व दहा दिवसातून एकदा शुद्ध पिण्याजोग पाणी नळ योजनेद्वारे शहरवासीयांना देण्यात यावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अन्यथा आठ दिवसानंतर नगर परिषदेच्या इमारतीला कुलूप ठोकून नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यावर संविधानाचे अनुच्छेद २१ म्हणजेच मानव मौलिक अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

buldhananews:असा इशाराच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे नगरसेवक तथा शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार न.प.मुख्य अधिकाऱ्यांना दिला याप्रसंगी सुदन अंभोरे, परमेश्वर दहातोंडे, तेजराव घायाळ, राजू बुधवत, गणेश पाठे, अजय बछिरे, किरण कमडे, कृष्णा बछीरे प्रसेनजित बछीरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

चिचारी येथील पाणी पुरवठा पाईपलाईन व पाण्याच्या टाकीच्या इस्टिमेट रद्द करा / लायसन्स ब्लॅक लिस्ट मध्ये टाका :- अॅड गणेश क्षीरसागर ( Breakingnews )

0

 

अनिल सिंग चव्हाण  ( मुख्य संपादक )

Breakingnews:बुलढाणा :- जिल्हातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या गट ग्रामपंचायत लाडणापूरच्या ग्राम चिचारी येथे निर्माणधीन पाण्याची टाकी कोसळल्याची घटना १२ जून च्या मध्य रात्री तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली.

मध्यरात्री कोसळलेल्या निर्माणधीन पिण्याच्या पाण्याचे टाकीची घटना घडून १० दिवस झाले. परंतु अध्यापही शासनाच्या वतीने संबंधित कॉन्ट्रॅक्ट दारावर कुठलीही कारवाई झाली नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली.

ही टाकी कोसळल्याचा आरोप संग्रामपूर येथील ऍड. जी. ए. क्षीरसागर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना लेखी तक्रार द्वारे केली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या कार्यावर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

रात्रीच्या वेळी टाकी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही. तरीही घडलीली घटना ही गांभीर्य जनक असून शासनाने याची दखल १५ दिवसात घ्यावी.

चिचारी येथील पाणी पुरवठा पाईपलाईन व पाण्याच्या टाकीच्या इस्टिमेट रद्द करा / लायसन्स ब्लॅक लिस्ट मध्ये टाका :- अॅड गणेश क्षीरसागर ( Breakingnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार संबंधी चौकशी करून संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदारावर कठोर कारवाई करून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट परवाना रद्द करावा.

Breakingnews :अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ऍड. जी. ए. क्षीरसागर यांनी दिला आहे.

हाके व वाघमारे यांना लोणार मधून पाठिंबा ( buldhananews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

buldhananews:हाके भाऊ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास लोणार मधून पाठिंब्याचे पत्र तहसीलदारा रामप्रसाद डोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले व ओबीसी बचाव च्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या सात दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना पाणी पिणे व उपचार घेण्याची विनंती केली आहे.

या उपोषणाला पाठिंबा देत असताना ओबीसी आरक्षणाला आमचा कोणाचाही विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षण देत असताना लोकसंख्येनुसार ओबीसी आरक्षण कोटा केंद्र सरकार कडून वाढवुन घ्या व आरक्षण द्या असे निवेदनात म्हटले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

buldhananews:तहसीलदार रामप्रसाद डोळे यांना निवेदन ॲड. शिवाजी सानप, डॉ. गोपाल बशीरे , गजानन जाधव, शहर लुकमान कुरेशी, राजूभाऊ बुधवत, सुदन अंभोरे, किसनराव आघाव बळीराम दराडे सुनील सानप सुनील सांगळे, विनोद डोळे, रामेश्वर आघाव, सुनील आघाव, गणेश पाठे, अजय बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

sharadjadhav:जळगाव जामोद येथील सर्पमित्र शरद उखर्डा जाधव यांचा १७ जून रोजी ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम दिल्ली द्वारा पर्यावरण वन्यजीव संरक्षण आणि सर्पमित्र राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राजधानी दिल्ली येथील द्वारका सेक्टर मध्ये आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ग्लोबल ह्यूमन राइट्स फोरमचे राष्ट्रीय व्हाईस प्रेसिडेंट काशीराम पैठणे, फाउंडर चेअरमन महानंदा सरकार दत्ता, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉक्टर प्रकाश खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण क्षेत्र वन्यजीव क्षेत्र आणि सर्पमित्र म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शरद जाधव यांना यावेळी मान्यवरांनी सन्मानित केले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

जळगाव जामोद येथील सर्पमित्र वन्यजीव आणि पर्यावरणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे जाधव हे एकमेव आहेत.

त्यांच्या या पुरस्कारामुळे तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांनी आतापर्यंत सर्पमित्र म्हणून ५ हजार सापांना जीवदान दिले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एवढेच नव्हे तर पर्यावरणासंबंधी विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. पर्यावरणाची लहानपणापासूनच आवड आहे त्यामुळे वन्यजीव पर्यावरण संरक्षण संदर्भात जनजागृती करणे सापांना जीवदान देऊन तो शेतकऱ्यांचा मित्र आहे हे लोकांना पटवून देणे तसेच सापांविषयी जनजागृती करणे हे काम ते गत पंचवीस वर्षापासून अविरत करीत आहेत.

sharadjadhav:त्यामुळे माझा झालेला सन्मान हा सर्व पर्यावरण प्रेमींचा सन्मान आहे. निसर्गावर प्रेम करा निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. असे सर्पमित्र शरद जाधव यावेळी म्हणाले

यावल आदिवासी प्रकल्प अधिकारी पवार शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या तक्रार संबधित एक्शन मोड पर ( Yavalnews )

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी एक्शन मोड पर आले असुन जामनेर जिल्हा जळगाव येथील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना संस्था चालकांच्या भोंगळ गलथान व दुर्लक्षीत कारभारने विद्यार्थ्यांना निकृष्ठ जेवणासह शासकीय सोयी सुविधा व आदी योजना पासुन वंचीत ठेवण्यात येत असुन

,संप्तत झालेल्या विद्यार्थी पालकांनी व आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांची भेट घेवुन आपल्या तक्रारी मांडल्यात यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी संबधीत स्कुलच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरून पन्द्रा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांंच्या बाबतच्या सर्व तक्रारींचे निराकरण न झाल्यास आपण संस्थेची मान्यता रद्द करू अशी तंबी दिली आहे.

या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांचे पालकवर्ग व आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या संयुक्तरित्या देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

की जामनेर जिल्हा जळगाव येथील जैन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासुन निकृष्ठ प्रतिचे अवेळी जेवण दिले जात आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना एकच गणवेश व नाईट ड्रेस दिला जातो , विद्यार्थ्यांना वेळेवर वहया पुस्तके मिळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे .विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वस्तीगृहाची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन त्यांना दिले.

जाणारे गादया,चादर,अंघोळीचे साबण,तेल, ईत्यादी वस्तु या नावालाच दिल्या जात असुन , या ठीकाणी वस्तीगृहातील शौचालयची अवस्था ही अत्यंत वाईट असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुल आणी मुली हे एकाच वस्तीगृहात राहतात याशिवाय अनेक तक्रारी या निवेदनात करण्यात आल्या असुन, विद्यार्थी पालक व संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची भेट घेवुन समस्यांचा पाढाच वाचला ,यावेळी जैन इन्टरनॅशनल स्कुलचे उपप्राचार्य निविन वानखेडे यांना प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आलेल्या तक्रारीबाबत १५ दिवसा दुरूस्ती करावी अशी सक्त ताकीद दिली असुन , १५ दिवसानंतर प्रकल्प स्तरीय समिती संबधीत स्कुलला भेट देवुन तक्रारींचे निराकरण झाले आहे का नाही.

याची तपासणी करेल त्या जर दुरूस्ती आढळुन न आल्यास संबधित संस्थे विरूध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल असा ईशारा प्रकल्प अधिकारी पवार यांनी दिला आहे .

Yavalnews:प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नामा पावरा , संस्थेचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रविण पावरा यांच्यासह आदि पदाधिकारांच्या स्वाक्षरी आहे .यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , प्रकल्प विकास निरिक्षक जावेद तडवी , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिनाक्षी सुल्ताने यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते .

बीबी बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी.( busnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

busnews:बीबी बस स्थानकावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असून मुख्य बाजारपेठेही बस स्थानक परिसरात असल्यामुळे छत्रपती संभाजी नगर ते नागपूर जाण्यासाठी सोयीस्कर असा मार्ग बीबी येथूनच जात असल्यामुळे या महामार्गावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र खाजगी वाहनधारक कोणाचीही भीती न बाळगता रोडवरच वाहने उभी करून इतरत्र फिरत असतात . गाडी रोडवरच उभी करून गप्पा मारत उभी असतात.

खाजगी फेरीवाले सुद्धा चार चाकी वाहनांमध्ये फिरते माल विक्रेते बिनधास्त रोडवर उभी करून मालाची विक्री करतात .त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे कोणीही पालन करताना दिसत नाही .त्यामुळे एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याकरिता वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी व वाहनधारक करत आहेत .

busnews:तसेच बस स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची गरज भासत असल्याचेही प्रवाशी वाहनधारकांकडून बोलल्या जात आहे.

पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा ( policenews )

0

 

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली, तालुकाध्यक्ष-: शेख कदिर भाई यांच्या कडुन उपोषणाचा इशारा,

policenews:संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस स्टेशन तामगाव अंतर्गत खामगांव बुलडाणा मलकापूर व अमरावती पोलीस पथक अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे खुलेआम सर्रासपणे सुरू आहेत .

यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध,देशी व विदेशी दारू – विक्री जोमात सुरू असून, नकली दारू ब-हाणपूर मार्गे संग्रामपूर तालुक्यात येत – आहे.

ही दारू दलालांमार्फत तालुक्यातील काही गावाखेड्यात विक्री होत. असल्याचे प्रशासनास ठाउक आहे. अशाप्रकाराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तसेच तालुक्यात खुलेआम. रस्त्यावर ,तीनपत्ती जुगार, विमल गुटखा, वरली मटका, तसेच तितली भवरा सारखे बरेच अवैध व्यवसाय सुरू आहेत.

या सर्व व्यवसायत राजकारणी लोकांचे सहकार्य असल्याने पोलीस प्रशासन का त्या लोकांना सहकार्य करीत आहेत. दारू बंदी प्रशासन भेसळयुक्त प्रशासन आहे हे फक्त नावा पुरते असल्याचे दिसून येते .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संग्रामपूर तालुक्यातील सुरू असलेले सर्व अवैध धंदे येत्या ४ जुलै पर्यंत बंद न झाल्यास .

policenews:राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर ,तामगाव पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण करणार आहेत.असा इशारा आज दिनांक 20 जून रोजी तामगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार मा. श्री राजेंद्र पवार यांना निवेदना व्दारे देण्यात आला .