बिबी पोलीस स्टेशनची यशश्वि कामगीरी घरफोडीच्या आरोपीला अटक ( policenews )

0
2

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

policenews:बिबि पोलीस स्टेशन येथे दि 13/08/2024 रोजी फिर्यादी नामे आशा किशोर जयभाये रा.मांडवा यांच्या तक्रारीवरून अपराध क्र. 159/ 24 कलम 331(3), 305(A)BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

फिर्यादी यांच्या तक्रारीप्रमाणे त्या शेतमजुरीचे कामावर गेलेल्या असतांना त्यांची मुले शाळेत जात असल्याने त्या घराची चावी खिडकीत ठेवत असत, अज्ञात आरोपीने लक्ष ठेवून फिर्यादी ह्या शेतात गेलेल्या असतांना घराचे कुलूप उघडून आत शिरून घरातील कपाटात ठेवलेले फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

यावरून बीबी पोलीस ठाणेदार संदिप पाटील व पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवी बोरे, यशवंत जैवळ यांनी अज्ञात आरोपीचा कसोशीने शोध घेतला.

जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )

असता दि.23/08/ 2024 रोजी संशयित नामे सूरज उर्फ पप्पू जगदीश बोडखे वय 18 वर्ष 7 महिने रा मांडवा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याच गल्लीत शेजारी राहणाऱ्या दिवसा फिर्यादी ह्या घरी नसल्याचे पाहून त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली.

त्यावरून बीबी पोलीसांनी आरोपीस गुन्ह्यात अटक केली असून आरोपी दि.27/08/2024 पावेतो पोलीस कोठडीत असून आरोपीकडून गुन्ह्यातील गेल्या मालपैकी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक तपास बीबी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक बुलढाणा सुनील कडासने साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील

policenews:यांच्या मार्गदर्शनाखाली बीबी पो स्टे चे ठाणेदार सहा.पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोउपनी बास्टेवाड, पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवींद्र बोरे, यशवंत जैवळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here