शेगाव ग्रामीण येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई योगेश हनुमंत जाधव यांचा पोलीस उपनिरीक्षक होण्यापर्यंतचा खडतर प्रवास.( Policenews )

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.policenews : योगेश हनुमंत जाधव हे मोहाडी तालुका जामनेर या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील हनुमंत जाधव हे शेती करायचे त्यांच्याकडे दीड एकर शेती होती वडिलांना सन 2005 मध्ये किडनीचा आजार झाल्याने ते मरण पावले.

तेव्हा योगेश यांच्या घरी पुरेसे धान्य सुद्धा नव्हते तेव्हा आईने योगेश याला धीर देऊन मोठ्या संयमाने व कष्टाने आपण पुढे जाऊ असे सांगितले .त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी योगेश यांच्यावर आली.

योगेश यांचे लहान भाऊ रितेश यांनी योगेश यांना सांगितले की तू हुशार आहेस तू शाळा शिक मी शाळा सोडून शेतीचे व कंपनीचे काम करतो.त्यानंतर लहान भाऊ कंपनीत काम करू लागले.योगेश जाधव हे सुद्धा जळगाव येथील जैन कंपनीत जाऊन सायंकाळी कंपनीतून आल्यानंतर ट्युशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.

दबंग व्यक्तिमत्व असलेल्या पी एस आय ची बदली नको ,जनतेचा सुर , असे व्यक्तिमत्व शहराला पहिल्यांदाच लाभले ,बदली थांबावी हीच अपेक्षा ( policenews )

योगेश जाधव यांनी सन 2006 मध्ये पहिली पोलीस भरती जळगाव येथे केली.तेव्हा ते पहिल्या प्रयत्नात त्यांची चेस्ट कमी भरल्याने फेल झाले.त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2007 मध्येच घरची परिस्थिती बिकट असल्याने पुणे येथे कंपनीत काम करण्याचे ठरवले.

पुणे येथे गेल्यानंतर योगेश यांना त्यांचा मित्र विठ्ठल तायडे याने मदत केली.परंतु पुणे येथे कंपनीत बीएससी चे शिक्षण अपूर्ण असल्याने मनासारखा जॉब न मिळाल्याने योगेश हा घरी परत आला. त्यानंतर योगेशने आपल्याला आता पोलिसात भरती व्हायचे अशी मनाशी खुनगाठ बांधली.सन 2007 पासून योगेश जाधव यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू झाला. योगेश जाधव यांनी सन 2007 मध्ये पुणे येथे पोलीस भरती मारली.

परंतु तेव्हा त्यांचे शरीर हे बळकट नसल्याने त्यांना ग्राउंड ला कमी मार्क आल्याने ते पुणे येथे पोलीस भरतीत अपयशी झाले.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यानंतर योगेश जाधव यांच्या मातोश्री शोभाताई हनुमंत जाधव यांनी त्यांना सांगितले की योगेश तू पोलीस भरती व्हायच आम्ही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2008 मध्ये त्यांच्याजवळ पैसे अपुरे असल्याने लोखंडी गोळ्या ऐवजी दगड घेऊन गोळा फेकची प्रॅक्टिस केली. तेव्हा सर्व मुलं त्यांना हसायचे योगेश वेडा झाला दगड फेकत आहे.

योगेश जाधव यांनी कोणतीही अकॅडमी न लावता स्वतःवर विश्वास ठेवून अत्यंत चिकाटी धरून जिद्दीने प्रॅक्टिस केली.गोळा फेक मध्ये त्यांनी इतकी मेहनत घेतली की ते गोळा फेक मध्ये आजूबाजूच्या चाळीस खेड्यामध्ये अव्वल होते. त्यानंतर योगेश जाधव यांनी सन 2008 मध्ये मुंबई शहर येथे भरती मारली.

परंतु नेमक्या ग्राऊंडच्या दिवशी त्यांच्या पोटात गोळा आल्याने त्यांना ग्राउंड ला पुरेसे मार्क मिळाले नाही ते मुंबई शहर येथे पोलीस भरतीत अपयशी झाले. त्यानंतर योगेश जाधव यांनी मित्र परमेश्वर जाधव,योगेश बागुल यांना सोबत घेऊन पुन्हा जिद्दीने पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुरू केली. सन 2010 मध्ये योगेश जाधव यांनी बुलढाणा पोलीस भरती केली. येथे ग्राउंड ला 92 मार्क आल्याने योगेश जाधव यांनी त्यांचा पेपर चांगला असल्याने व स्वतःवर विश्वास असल्याने पेपर होण्याअगोदर गावात पेढे वाटून दिले. योगेश जाधव यांच्या खडतर आयुष्याचे पहिले यश बुलढाणा पोलीस दलात सन 2010 मध्ये भरती होऊन त्यांना मिळाले.

त्यानंतर योगेश जाधव यांच्या मातोश्री शोभाताई यांना सन 2015 मध्ये हार्ट अटॅक आला परंतु त्यांचे दैव चांगले असल्याने त्या सुदैवाने त्यामध्ये वाचल्या. त्यानंतर योगेश हे वडिलांनी पाहिलेल्या पोलीस उपनिरीक्षक होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करू लागले. तेव्हा योगेश यांना त्यांची पत्नी पूजा यांनी खूप साथ दिली.योगेश यांनी अत्यंत जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सन 2016 मध्ये डिपार्टमेंटल पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली.

 

त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निकालानुसार ते जानेवारी 2024 मध्ये खऱ्या अर्थाने पोलीस उपनिरीक्षक झाले.

Policenews : एखाद्या छोट्याशा खेड्यातला गरीब कुटुंबातील व्यक्ती जेव्हा पोलीस उपनिरीक्षक होतो तेव्हा त्यांच्या गावातील मित्र मंडळी राहुल पाटील,परमेश्वर जाधव, संदीप राजपूत, योगेश बागुल, रमेश बागुल, प्रदीप सोनवणे दिनेश अहिर,रवींद्र सुतार, मोहन बावस्कर, अमोल राजपूत, प्रदीप अहिर, भरत निंबोळकर, हेमंत दलाल, भूषण शिंपी व समस्त नातेवाईक यांना त्यांच्याबद्दल वाटणारा अभिमान हा चिखलातून कमळ उगवल्यासारखे आहे. योगेश जाधव यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम*

Leave a Comment