जालना : आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?
Policenews:जालना येथे स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या घटनेमुळे जिल्हा तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेतलेल्या आंदोलकास पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत येत पाठीमागून कमरेत लाथ घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या घटनेवर प्रशासनाच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोपाल चौधरी नावाचा आंदोलक कौटुंबिक वादात न्याय मिळावा म्हणून मागील अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होता. स्वातंत्र्य दिनी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
त्या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता उपअधीक्षक कुलकर्णी यांनी लाथ मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.
या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला आंदोलकाने न्याय न मिळाल्याने आत्मदहनाचा मार्ग पत्करल्याची खंत आहे, तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे प्रशासनाची प्रतिमा डागाळली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रशासन व गृहमंत्रालय मात्र अद्यापही मौन बाळगून आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की –गृहमंत्री कारवाई करतील का?
जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) साहेब या घटनेची दखल घेणार का?
आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई होणार का
व्हायरल व्हिडिओमुळे हा विषय जनतेमध्ये चर्चेचा ठरला असून “सामान्य माणसाने न्यायासाठी आंदोलन केल्यास त्याला अशा प्रकारे लाथा घालून वागवले जाते का?”
Policenews:असा सवाल आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.या घटनेत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.