प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दि. 16/08/2025 रोजी पेट्रोलींग डयुटी करीत असतांना मिळालेल्या माहिती प्रमाणे एक इसम हा त्याचे ताब्यातील मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 ए.झे 3922 ने सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन होला कंपनीचा संुगधीत तंबाखु एकुन 10 की.लो की. 13,250/ व मोपेड गाडी की.80,000/रू. असा एकुन 93,250/रू. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
महाराश्ट्र राज्यामध्ये शासनाने प्रतिबंधीक केलेला तंबाखु आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने अन्न सुरक्षा विभाग वर्धा यांना माहिती देवुन अन्न सुरक्षा विभाग वर्धा येथील अधिाकरी यांचे लेखी रिपोर्ट वरून आरोपी सुरज रमेश कामडी वय 31 वर्ष राहणार हनुमान वार्ड हिंगणघाट विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन , वर्धा , अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट ठाणेदार पोलीस निरिक्षक देवेन्द्र ठाकुर यांचे
Policenews /मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार. प्रविण बावणे, पोलीस नाईक निलेशसिंग सुर्यवंशी, नरेंद्र आरेकर, पोलीस शिपाई सागर सांगोले, संतोष गिते यांनी केली.