prashantdikkar:शेगाव शहरातील एका घटनेत शेतकरी नेते प्रशांत काशिराम डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप झाला आहे.
ही घटना 21 मार्च 2025 रोजी शेगावच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. फिर्यादी सौ. पुष्पा संदिप मोरखडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत डीक्कर यांनी जिगाव प्रकल्पातील पुनर्वसनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यातून प्रति एकरी चाळीस लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्याबदल्यात त्यांनी पाच लाख रुपये घेतले आणि प्रति एकरी पाच लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर शासनाकडे आंदोलन करून त्यांना कोणताही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी दिली.
पोलीस स्टेशन शेगाव शहरात या प्रकरणाची कायमी अप नं. 150/2025 कलम 308 (2), 308(3), 308 (5) भारतीय न्यास संहिता अनुसार नोंदणी करण्यात आली आहे.
prashantdikkar: फिर्यादी सौ. पुष्पा संदिप मोरखडे या हिंगणा कवठळ, ता. संग्रामपुर येथील रहिवाशी आहेत. आरोपी प्रशांत काशिराम डीक्कर हे ग्राम बोडखा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणाचा तपास तपास अधिकारी सपोनी गजानन सोनटक्के यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



