गोंदिया-लोणार फेरीचे कामगार बदल बंद करण्याची मागणी(Pratapraojadhav)

 

केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची रास्त मागणी

गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक देतात फक्त अमरावती पर्यंत प्रवाशांना टिकिट”

कटबुकिंग मुळे सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे थांबते दिड तास प्रवाशांना त्रास”

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

Pratapraojadhav:भंडारा विभागाअंतर्गत येत असलेल्या गोंदिया आगाराची गोंदिया,लोणार,गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव बसफेरी 12 एप्रिल 2024 पासुन सुरू करण्यात आली आहे,सदर फेरी सुरवातीपासुनच गोंदिया आगाराकडुन थेट जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ लोणार पर्यंत चालविण्यात येत होती,परंतु काही वर्षापासुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल दिल्याने हि फेरी प्रवाशांना डोकेदुखी बनली आहे.

समृद्धी महामार्गावरील डीझेल चोर जेरबंद( brekingnews )

,सदर फेरीवर कार्यरत असलेले गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाताना व येताना फक्त अमरावती पर्यंत टिकिट देतात तसेच सदर फेरीस अमरावती येथे कामगार बदल असल्याने जो पर्यंत दोन्ही आगाराचे कामगार अमरावती बसस्थानक येथे हजर होत नाही तो पर्यंत गोंदियाकडे व लोणारकडे जाणारी व येणारी फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास उभी राहते,राज्य परिवहन महामंडळाच्या सदाउदासिन कारभारामुळे याचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे,

कारण सदर फेरीवर कार्यरत असलेले वाहक अमरावती पासुन पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट तिकीट देत नाही तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास थांबत असल्याने प्रवाशांना अमरावती बसस्थानक येथुन बसफेऱ्या बदलून पुढील प्रवास करावा लागतो या मध्ये लहान-लहान मुलं,महिला,व वयोवृद्ध यांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो,लोणार येथील प्रवाशी सेवा संघटना यांनी या बाबत राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयकडे गत सहा महिन्यापासुन सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करून सदर फेरी गोंदिया आगाराच्या दोन चालक व एक वाहक कडुन थेट लोणार पर्यंत चालविण्याची वारंवार मागणी केली आहे.

मात्र त्यांची रास्त मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे,या बाबत अनेक प्रवाशांनी सदर फेरीची समस्या सोडविण्यामागणी केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती,प्रवाशांची रास्त मागणी असल्याने व प्रवाशांना सुखमय प्रवास राज्य परिवहन महामंडळाकडुन उपलब्ध व्हावा या करीता केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक,(वाहतुक) मुंबई यांना दि.10 ऑगस्ट 2024 रोजी सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करणे बाबत पत्राद्वारे मागणी केली होती,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,माधव कुसेकर यांना दि.1 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा पत्राद्वारे सदर फेरीचे अमरावती येथील कामगार बदल बंद करण्याची मागणी केली असुन सदर पत्राची प्रत महाव्यवस्थापक (वाहतुक) मुंबई आणि प्रादेशिक व्यवस्थापक,अमरावती-नागपुर यांना दिलेली असुन अद्याप पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,जर केन्द्रीय राज्यमंत्री यांच्या मागणीची पुर्तता होत नाही.

Pratapraojadhav :तर सामान्य नागरिकांची रास्त मागणीची काय पुर्तता होईल हि बाब राज्य परिवहन महामंडळाच्या हिताची नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा प्रवाशांच्या नजरेत मलीन होत आहे हे मात्र खरं!

Leave a Comment