मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही हे ही आता मोदी ठरवणार का?”; मला मंदिरात जाण्यापासून का रोखले ( Rahul Gandhi )

0
4

 

Rahul Gandhi : अयोध्या काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये पोहचली आहे. तर जिथे काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पोहोचले आहेत पण त्यांना आता आत जाण्याची परवानगी दिली जात नाही.

तर आता या दरम्यान, राहुल गांधींना परवानगी न मिळाल्यानंतर आता काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मंदिराबाहेर धरणे धरून बसले असून आत जाण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत.

आता तर दुसरीकडे तर मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा आहे किंवा नाही हे देखील मोदीच ठरवणार का ? असा संतप्त सवाल या ठिकाणी राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

तर आता आसामच्या बटाद्रवा पोलिस स्टेशनच्या व्यवस्थापनाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपल्यावरच मंदिरात जाण्यास सांगितले आहे. तर तो पर्यंत मंदिराबाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते,राहुल गांधी म्हणतात,

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

“काय प्रॉब्लेम आहे? मी आत का जाऊ शकत नाही, माझा काय दोष आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही. असं काय असा संताप आरोप त्यांनी व्यक्त करताना दिसून येत आहे.

फक्त या वेळेस राहुल गांधी यांना काय अडवले जात आहे असं यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गौरव गोगोई, जयराम रमेश आणि इतरही दिसत आहेत. जयराम रमेश म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे,

मग काय इथल्या खासदारालाही मंदिरात जाऊ दिले जात नाही, ही लोकशाहीची हत्या आहे. हे का केले जात आहे?”

तर आता जयराम रमेश पुढे म्हणाले, “आपण लोकशाही देशात राहतो. मात्र स्थानिक खासदार गौरव गोगोई यांनाही येथे रोखले जात आहे. हा अन्याय आहे.”

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Rahulgandhi : मग आता गौरव गोगोई म्हणाले की, सर्वांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे, फक्त राहुल गांधींनाच नाही, का? त्याला मंदिरात जायचे आहे, तो भगवान शंकराचा भक्त आहे पण त्याला आत जाण्यापासून रोखले काय जात आहे असं संतप्त सवाल या ठिकाणी व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here