आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे आज मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या श्री.मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. /Ravikant Tupkar 

 

 

त्यांची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली आहे हे पाहून काळजाचं पाणी झालं. त्यांना विनवणी केली की आपण या आंदोलनाचा उर्जास्त्रोत आहात. आपल्या प्रेरणेने राज्यभरातील अनेक तरुण आपले सर्वस्व अर्पण करून आंदोलनात उतरले आहेत. आता ही आर या पारची लढाई निर्णायक वळणावर आलेली असतांना तब्येतीसोबत काही अप्रिय घडणे उचित होणार नाही.

आंदोलनकर्त्यांचे आपण बळ आहात, तेव्हा सलाईन लावून घ्यावी किंवा किमान पाणी तरी प्यावे, ही कळकळीची विनंती त्यांना केली.

दरवर्षी आम्ही या कालावधीत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारतो व त्यांना न्याय मिळवून देतो. परंतु यावर्षी मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आपली उद्यापासून नियोजित सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित करत आहोत. लवकरच आपण सोयाबीन-कापूस प्रश्नी आक्रमक पणे रस्त्यावर उतरणार आहोत.

सध्या मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण ताकदीने सहभागी आहोत.

सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षण प्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा सरकारला यांची किंमत मोजावी लागेल. Ravikant Tupkar

Leave a Comment