खामगांव शहरातील मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक! पीडितेची आई घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार /rep 

0
204

 

इस्माईल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

खामगांव आई कामाला गेली असता, आत्याच्या घरी आलेल्या मुलीवर ४२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुलढाणा खामगाव शहरातील एका वस्तीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

: पीडितेच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती कामासाठी शुक्रवारी बाहेर गेली होती. यावेळी घरी कोणी नसल्याने महिलेने अल्पवयीन मुलीला आत्याच्या घरी सोडले. आत्याच्या घरी असताना ती शौचास गेली. परत येत असताना आरोपीने पीडितेचा डावा हात पकडला तोंड दाबून त्याच्या घरात नेले.

तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार आहे. केल्याचे तक्रारीत नमूद केले. वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कैलास निमकर्डे विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला तातडीने अटक केली आहे. Rep

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here