दिव्यांग स्वंय रोजगार मेळाव्याकरिता बैठक संपन्न  shegaonnews

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.. वाढती बेरोजगारी असलेल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी रोजगार मिळावा याकरिता विधवा निराधार दिव्यांगांनी आपल्या ताकदीवर कर्तुत्वावर आत्मनिर्भर व्हावे याकरिता दिनांक 24/ 12/ 2023 रोजी शासकीय विश्राम गृह शेगाव येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने रोजगारासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक शेतकरी शेत मजूर कामगार संघटना राष्ट्रीय सचिव चंद्रकांत शिंदे दिव्यांग नेते शत्रुघन इंगळे प्रमुख उपस्थित होते तर यावेळी मानव अधिकार आयोग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतिभाताई जगदाने पाटील यांचीही उपस्थिती बैठकीला लाभली.

तर वाढत असलेली बेरोजगारी व यावर मात करण्याकरीता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग विधवा निराधारांना बांधवांना समाज कल्याण जिल्हा उद्योग केंद्र वित्तीय महामंडळ राष्ट्रीय बँका बचत गट आदी स्वरूपातून लाभ मिळावा आपली कागदपत्रे व्यवस्थित असली तसेच आपले सिविल स्कोर पत सुस्थित असली तर कुठल्याच प्रकारची अडचण कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जात नाही.

https://www.suryamarathinews.com/congress-2/

या विषयावर मार्गदर्शन बैठकीत मनोज नगरनाईक यांनी केले तर सरकारच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट चे प्रोग्राम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये होतकरू जास्तीत जास्त बांधवांनी सहभाग नोंदवावा कामगार विभागातूनही आपणास लाभ मिळत असतो व आपली कला अवगत झाल्यानंतर आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे असे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले तर हा जिल्हास्तरिय दिव्यांग रोजगार मिळावा 11 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी शेगाव येथे विविध कंपनी उद्योजक शासनाचे अधिकारी प्रशिक्षण संस्था राजकीय मान्यवर यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले.

या बैठकीला पद्माकर धुरंदर शिवशंकर पाटील कुटे मोहम्मद रईस, गजानन असोलकर जावेद खान संतोष निंबाळकर अनंता भांगे मिथुरा प्रकाश चवरे चंदाताई ददगाळ, शेखर तायडे आयोजक गजानन कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते  shegaonnews

Leave a Comment