मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
—————
बातमीदार ऋषिकेश सुरवसे, उमरगा
उमरगा प्रतिनिधी -: उमरगा-लोहारा तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि१९) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा-लोहारा तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची आर्थिक अडचण अत्यंत गंभीर झाली असून शेती उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांचे उपजीविकेवर संकट आले आहे.
तसेच शासनाने यांचा सहानभुतीपूर्वक विचार करून तातडीने ओला दुष्काळ घोषित करून बांधित शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात यावे, आणि शेतकऱ्यांच्या पुढील रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी सेना उबाठा पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
Shivshenanews/यावेळी, जिल्हा प्रमुख शेतकरी सेना विजयकुमार नागणे, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना विजयकुमार तळभोगे, मा.नगराध्यक्ष रझाक आत्तार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, मा.सभापती रणधीर पवार, जेष्ठ शिवसैनिक महावीर आण्णा कोराळे, तालुका सोशल मीडिया प्रमुख दत्ता शिंदे यांच्यासह डी.के. माने, राजेंद्र समाने, अप्पाराव गायकवाड, संगमेश्वर स्वामी, धीरज बेळमकर, संतोष कलशेट्टी, संतोष जाधव, तानाजी जाधव, पवन त्रिमुखे, आदिनाथ काळे, विजय गायकवाड, अभिषेक स्वामी, आकाश गायकवाड, सगर उमशेट्टी, सदाशिव पाटील, जयराम चव्हाण, बिराजदार श्रीकर, रवी बडोरे, मल्लिकार्जुन बिराजदार, रमेश पवार, आकाश शर्मा, शहाजी गायकवाड, पंडित माशाळे, विशाल गायकवाड, मारुती थोरे, अण्णाराव माने, शिवाजी गायकवाड, सिद्धराम हत्तरगे, निकेश मारेकर, विलास माने, प्रकाश बेळंबे, सदाशिव भातागळीकर, शंभूलिंग स्वामी, हरी मदने आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








