====================
कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती –
मा. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात व मा.किरण पांडव साहेब व जीह्याचे संपर्क प्रमुख मा.गंगाधर बडुरे साहेब, चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा.बंडू भाऊ हजारे यांच्या मार्गद्शनाखाली दिनांक 9/12/2023 रोज चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला.
जिवती तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना आपल्या येणाऱ्या अडचासाठी येणाऱ्या शासकीय कार्यालय व शासकीय योजना व शासकीय दवाखान्यात येणाऱ्या अडचणीत सर्वसाधारण लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो व त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही त्यासाठी त्यांना योग्य ती माहिती तत्काळ मिळावी आणि लवकरात लवकर सर्वसाधारण लोकांच्या समक्ष्या दूर करण्यासाठी जिवती येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. शिवाजी वाघमारे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून मा. लक्ष्मण तोगरे उपस्थित होते.
आज खऱ्या अर्थाने जिवती तालुक्यात सर्वसामान्य जनते साठी अडचणीचा सामना करावा लागणार नाही जेव्हा जेव्हा जिवती तालुक्यातील जनतेला अडचण पडेल तेव्हा तेव्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे माध्यमातून आवाज उठऊन तालुक्यातील जनतेला शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळवून देण्याचं काम करू असे शिवसेना तालुका प्रमुख भरत ज्ञानोबा बिरादार व तालुका संघटक गणेश पवार यांनी आपले मनोगत वेक्त केले व तालुक्यात शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
यादव भालेराव,दगडू मोतेवड, रमेश मेश्राम,मोहन आत्राम , ,ज्ञानेश्वर भाऊ,गुरु छपरे ,राकेश राठोड. Shivsena