थीम आधारित वेशभूषांनी दिला सामाजिक संदेश, शेतकरी, जिजाऊ, डॉक्टर, पोलीस यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
हिंगणगाट (प्रतिनिधी): सचिन वाघे
हिंगणगाट शहरातील लोकप्रिय माँ राणी नवरात्री गरबा महोत्सव 2025 यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचा आठवा दिवस विशेष ठरला, कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात एक वेगळीच झळाळी निर्माण झाली.
समाजप्रबोधनाचा एक वेगळा पैलू महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही थीम आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांनी समाजप्रबोधनात्मक विषय हाताळत शेतकरी, डॉक्टर, पोलीस, वकील, माँ जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, संत परंपरा यांसारख्या विविध भूमिकांद्वारे आपली सादरीकरणे साकारली.
विशेषतः शेतकरी वेशभूषेत तरुणांनी सादर केलेले सादरीकरण हृदय हेलावणारे ठरले. मुलींनी साकारलेली माँ जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाईची भूमिका देखील प्रेरणादायी ठरली. या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना भावनिक केलं आणि प्रचंड प्रतिसाद मिळवला.
सोनाली कुलकर्णींचा गौरव आणि गौरवोद्गार
सोनाली कुलकर्णी यांचे महोत्सवात विशेष स्वागत फुलांच्या वर्षावात आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणगाटकरांच्या उत्साहाचे व महोत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत म्हणाल्या,
Sonalikulkarni/> “हिंगणगाटचा गरबा उत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही, तर सामाजिक जाणीव जागवणारे व्यासपीठ आहे. येथे प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हेच या उत्सवाचे यश आहे.”गरबा, डांडिया आणि भक्तिभाव संपूर्ण कार्यक्रम साई मंदिर हॉल येथे पार पडला. आयोजक अतुल वांदिले आणि माँ राणी उत्सव समितीने हा सोहळा अत्यंत सुंदर रित्या पार पाडला.