इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: सततची नापिकी व कर्जत वाई 47 वर्षीय शेतकऱ्यांनी ढबाळवेस माळीपुरा भागात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण लोखंडे शेतकरी डोबाळवेस माळीपुरा भागात राहत होते,
त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे सव्वा लाख रुपये व मृतकाची आई पार्वती बाई लोखंडे यांच्या नावे सव्वा लाख असे एकूण अडीच लाख रुपये बँकेचे कर्ज असल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेत श्रीकृष्ण लोखंडे राहत होते निसर्गाच्या लहरीपणामुळे सततच्या नापीके मुळे श्रीकृष्ण लोखडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली सततच्या नापिकीमूळे बँकेच्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या कारणाने चिंतीत असलेल्या श्रीकृष्ण लोखंडे या 47 वर्षीय स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेतील मृतक श्रीकृष्ण सुखदेव लोखंडे वय ४७ हे शेतकरी होते. मात्र सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर असलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड करणे त्यांच्याकरिता कठीन होऊन बसले होते. त्यामुळे ते नेहमी चिंताग्रस्त राहायचे,
त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आज सकाळी १० वा सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.