आ डाॅ संजय कुटे यांनी पुष्पवृष्टी करत रामभक्तांचे शेगावात स्वागत जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणला,रामभक्तांचा उत्साह (dr SanjayKute )

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

dr SanjayKute: शेगाव : अयोध्येहून दर्शन घेवून परतलेल्या कारसेवक व रामभक्तांचे शेगांव रेल्वे स्टेशनवर आ डाॅ संजय कुटे,डाॅ अपर्णाताई कुटे यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले.तर अयोध्या दर्शनाने धन्य झाल्याच्या भावना कारसेवक व रामभक्तांनी व्यक्त केल्या.


दर्शनाहून आल्यावरचा आनंद ,उत्साह ओसांडून वाहत होता.प्रमोद कुटे,विनोद वाघ,गणेश भोपळे यांचेसह कारसेवक व रामभक्तांचा यावेळी आ डाॅ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ डाॅ संजय कुटे यांनी स्टेशनवर आलेल्या प्रत्येक कारसेवक व रामभक्तांचे चरणस्पर्श केले.यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाश्रु तरळत होते.तर आ डाॅ संजय कुटे यांचेही डोळे पानावले होते.विशेष म्हणजे रामभक्तांनी आ डाॅ संजय कुटे व डाॅ अपर्णाताई कुटे यांचा भगवा दुपट्टा देवून एकत्रित सत्कार केला.तेव्हा जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले रस्त्यावर (Revenuenews )

तसेच होय, मी गर्वाने सांगतो मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे आणि जनतेचा सेवेकरी आहे.

श्री रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवकांचा सन्मान म्हणून आस्था या विशेष अयोध्या धाम रेल्वेने रामभक्त अयोध्येला दर्शनासाठी गेले होते, सर्व रामभक्त रामललाचे दर्शन घेऊन शेगाव नगरीत परतले आहेत, त्यांचे सपत्नीक स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले याचा एक रामभक्त म्हणून नक्कीच आनंद आहे.

अनोळखी युवकाकडून १४ वर्षीय मुली सोबत जबरदस्ती शारीरीक संबंध,व विनयभंग ( crimenews )

हा काळ आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आहे, आपले श्रीराम थाटात त्याच्या घरी परतले आहेत, 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

 

dr SanjayKute: मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे म्हणत काही लोक हीनवायचे, त्यांनी सुद्धा आता एकदा तरी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी गेले पाहिजेत.असेही यावेळी आ डाॅ संजय कुटे म्हणाले.

Leave a Comment