इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव . महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या दि. १४ डिसेंबर, २०२३ पासून राज्यव्यापी संपास वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
मा.तहसीलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ निवेदनामधील मागण्या या संवैधानीक असून सदरच्या मागण्या मान्य व्हावे तसेच एन. पी. एस. रदद करन जुनी पेंशन योजना [ओ. पी. एस. ] लागू करावी व पी. एफ. आर. डी. र. कायदा रदद करण्यात यावा.कंत्राटी पध्दत बंद करन कंत्राटी कर्मचा-यांना नियमीत करण्यात यावे व समान काम समान वेतन लागू करावे.
राज्या कर्मचा-यांच्या हितासाठी उमादेवी – विरुध्द – कर्नाटक सरकार याबाबाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.खाजगीकरणाचे धोरण व आउटसोर्स पध्दत पुर्णत: कायम बंद करण्यात यावी.
लिपीक, लेखा, आरोग्य कर्मचारी, वाहन चालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, ग्रामसेवक व कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील वेतन त्रुटी तात्काळ दूर करावी. चतुर्थश्रेणी कर्मचारी, वाहनचालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवीण्यात यावी.
मंजूर आकृती बंधाप्रमाणे ४ लाख रिक्त पदे कायमस्वरूपी भरावी. शिक्षणाचे खाजगीकरण [दत्तक योजना व समुहशाळा पोजना] धोरण रदद करावे.
अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट करा, भरती प्रक्रिया वेत पुर्ण करण्यात पावी, यकीत महागाई भत्ता देण्यात यावा व ८ व्या वेतन
आयोगाचे गठन करण्यात यावे. कामगार कर्मचारी संघटनेचे लोकशाही अधिकार सुनिश्चीत करावे व त्यांचे विरोधी कायदे रदद करावे.
जि. प. कर्मचारी वेतन व निवृत्ती वेतन दरमहा १ तारखेला होण्याचे सक्त आदेश व्हावेत.अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अनिल ईखारे, तालुका उपाध्यक्ष, विजय मोतीराम गवई, मोहन विश्वासराव कराळे, आशिष शामराव खंडेराव, रतन पुंडलिक सावदेकर,आशिष साहेबराव शेगोकार , संजय प्रकाश सुरवाडे आदींच्या सह्या आहेत vanchitbahujan