अरुण वानखडे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी ४० वर्षांपासून अविरत काम केले
प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर
तालुक्यातील लाखपुरी येथील वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते अरुण वानखडे यांच दि.०७ डिसेंबर रोजी लाखपुरी येथे दुखद निधन झाले.अरूण वानखडे नेहमी गोर गरीबांचा मदतीला धावून जात असे त्यांच्या निधन झाले हि बातमी कळताच तालुक्यात शोककळा पसरली होती.
अरूण वानखडे यांच व्यक्तिमत्व,अभ्यासु,मनमिळावू,नेहमी हसत मुख व एक कुशल राजकारणी असुन कधी कोणाशी वैर नव्हतं.अरूण वानखडे सर्वांचे प्रिय होते.अरुण वानखडे गेल्या मुळे मुर्तिजापूर तालुका पोरका झाला.त्यांच्या जाण्याने त्यांची जागा कोणीही घेवू शकणार नाही.
त्यांच्या अंतिम यात्रेचा कार्यक्रम दि.०८ डिसेंबर रोजी होता,अरुण वानखडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये सतत ४० वर्षांपासून कार्यरत करत होते.अरूण वानखडे यांच्या परिवाराचे सात्वन करण्यासाठी दि.०९ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरुण वानखडे यांच्या लाखपुरी या मुळ गावी जाऊन त्यांच्या राहत्या घरी मुलगा अशोक वानखडे व परिवाराची भेट घेतली, त्यांचे सात्वन केले.
या मध्ये उपस्थीती मध्ये वंचित बहुजन,कश्यप जगताप,दिलीप बुदगिरकर,संजय नाईक,भैय्यासाहेब तायडे,तालुका अध्यक्ष सुनिल सरदार,शहर अध्यक्ष तसवर खान,प्रधान गुरुजी,विनायक नवघरे,लियाकत पटेल,गोवर्धन जामनिक,लाखपुरी सरपंच राजप्रसाद कैथवास,दुर्गाताई भोपत,सचिन दिवनाले,तोताराम देशमुख,अरविंद जामनिक,दिपक जामनिक,अजय तायडे,दत्ता जामनिक,माणिकराव नवघरे,दत्तु वानखडे,गौतम वानखडे,तालुका प्रसिध्दी प्रमुख अतुल नवघरे सह संपुर्ण वानखडे कुटुंब व लाखपुरी सर्कलचे शकोडो वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व गावकरि उपस्थित होते. vanchitbahujanaghadi