शेगांव वैद्यकीय अधिकार्यास शिवीगाळ करत केबिन ची काच फोडली, मद्यपी चंद्रशेखर विरूध्द गुन्हा दाखल crimenews 

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगांव .स्थानिक खडकपुरा येथील चंद्रशेखर गणगणे यांनी मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांना शिवीगाळ करत अपघात कक्षाचे काचा फोडून नुकसान केल्याची घटना दि.१०/१२/२०२३ रोजी रात्री दरम्यान घडली. असून दि..११/१२/२०२३ रोजी दुपारी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हकिकत अशाप्रकारे आहे की डॉ. अतुल गोपालकृष्ण पाटील वय ३८ वर्षे वैदयकीय अधिकारी स.मो.सा.रु. शेगांव रा. गांधीचौक शेगाव हे सामान्य रुग्णालय शेगाव वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षामध्ये कर्तव्यावर हजर असताना चंद्रशेखर विजय गणगणे वय ४० वर्षे रा खडकपुरा शेगाव याने दारू पिऊन वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ करून अंगावर धावून आला.

व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व इतर कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून शासकीय रुग्णालयातील अपघात कक्षातील कॅबिनची काच फोडून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान केले.

याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यावरून पोलीसांनी आरोपी चंद्रशेखर विजय गणगणे वय ४० वर्षे रा खडकपुरा शेगाव याचे विरुद्ध अप नं ६११ /२०२३ कलम ३५३,४२७, ५०४ भादवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोउपनि कुणाल जाधव हे करीत आहेत.crimenews

Leave a Comment