Wardhanews | सिंदी रेल्वे येथे परमात्मा एक मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलन संम्मेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती

 

मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला हजारोच्या संख्येने सेवकांची उपस्थिती

सिंदी (रेल्वे):- येथे परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा आयोजित मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एक सेवक मंडळाचे नागपूर अध्यक्ष राजुजी मदनकर, उद्घाटक एक उपाध्यक्ष मनोहरराव देशमुख, मार्गदर्शक सुधाकरराव सोनटक्के, प्रमुख पाहुणे सिंदी शहराचे ठाणेदार वंदना सोनुने, वि.वि.सो. अध्यक्ष अशोकबाबू कलोडे,सभापती केसरीचंद खंगारे,जेष्ठ सेवक युगल अवचट उपस्थित होते.

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य विशद केले बाबा जुमदेवजी यांच्या जन्म नागपूर मधील एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे वडील विठोबाजी विणकर होते आणि आई सरस्वतीबाई हे ग्रहणी होती.

बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण नारायण आणि जगोबा असे तीन मोठे आणि मारुती नावाचे धाकटा भाऊ होता. वडील विणकर असल्याने आणि त्यांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे बाबा जुमदेवजी आपले शिक्षण चौथीनंतर पुढे करू शकले नाही.

Shegaon news |अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज – रमेश पाचपोर

१९३८ मध्ये वयाच्या १७ वर्षी बाबा जुमदेवजी यांचे वाराणसीबाई यांच्याशी लग्न झालं काही कारणामुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विनकामाचे व्यवसाय सोडला आणि त्यांनी सेठ केसरीमल यांच्याकडे काही वर्ष सुवर्ण काम म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी नागपूर महानगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

कालांतराने बाबा जुमदेवजी ने परमात्मा एक सेवक नाम मानव धर्म मंडळाची स्थापना केली. त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य तथा मानवी जीवनातील अंधश्रद्धा यावर मोठ्या प्रमाणात कार्य केले.

त्यांचे काम आज महाराष्ट्र बाहेर अनेक राज्यात पोहोचले आहे असे मनोगत व्यक्त केले.

Wardhanews: यावेळी सेवक मंडळ पदाधिकारी सचिव सुरुजजी अंबुले, संचालक टिकारामजी भेडारकर,सहसचिव मोरेश्वरजी गभने, संचालक वासुदेव पडोळे, कोषाध्यक्ष प्रविनजी उराडे, संचालक संजयजी महाकाळकर, संचालक फकिरजी जिभकाटे, संचालक विठ्ठलराव क्षिरसागर, मंगलरावजी सोनटक्के, विनोदराव गवळी, विजयराव नखाते, विनोदराव कातोरे, प्रभाकरराव काळबांडे, गणेशराव हांडे, विष्णुजी वाघमारे, श्रीरामजी भट्ट, तुषारजी महाकाळकर, सौरभजी कातोरे, अतुलजी काळबांडे, उमेशराव आष्टनकर, हिरामनजी अवचट, मंगेशजी अवचट, नंदूजी भोयर, राकेशजी नखाते, भगवानजी वाघमारे, दिलीपराव रुहारकर, अमोल ढगे, हंसराज सुरकार, पुरुषोत्तम लांजेवार, हनुमान नखाते यांच्यासह सेवक मंडळाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते…

Leave a Comment