यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
waternews:येथील यावल शहरातुन गेलेल्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावर पावसाळयात एका बाजुला पाऊसाचे साचलेले पाणी तर.
दुसऱ्या बाजुला खड्डे अपघात टाळण्यासाळी वाहनचालकांना वाहन चालवितांना करावी लागत आहे तारे वरची कसरत संबधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष वेधुन रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे .
यावल शहरातील विविध शासकीय कार्यालय , बस स्थानक व आदी ठीकाणी जाण्यासाठीचा एकमेव प्रमुख म्हणजे बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या महामार्गावर पादचाऱ्यांपासुन तर ईतर वाहनाची प्रतिदिन मोठी गर्दी असते,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान गेल्या दहा दिवसापासुन पाऊसाची रिपरिप सुरू असल्याने या मार्गावर दुभाजच्या एका बाजुला मध्यभागी मोठमोठी खड्डे निर्माण झाले असुन तर दुसऱ्या बाजुला मार्गावरील रस्ता सिंक झाल्याने दाबला गेला असुन त्या ठिकाणी पाऊसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.
असल्याने वाहनचालकांना आपली वाहन काढतांना तारेवरची कसरत करावी लागत असुन ,पादऱ्यांसह ईतर सर्व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
waternews:तरी संबधीत राज्य महामार्गा वरील देखरेख करीता नेमणुकीस असलेल्या अधिकाऱ्यांनी अपघात होण्या आदीच तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजुन दुसऱ्या बाजुला साचणाऱ्या पाण्याचा मार्ग काढावा अशी मागणी वाहनधारक व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .