यावल येथे,मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या पथनाटय जनजागृतीस चांगला प्रतिसाद(Yavalnews)

0
3

 

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yavalnews:-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येत असून या मतदान जनजागृती कार्यक्रमास सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावल-रावेर विधानसभा मतदारसंघांमध्ये तालुक्यात पंचायत समिती,महसूल विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” या पथनाट्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने प्रबोधनात्मक सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,पंचायत समिती बीडिओ डॉ.मंजुश्री गायकवाड,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके,केंद्रप्रमुख शाकीर सर कविता गोहिल,मुख्याध्यापकजी.डी.कुलकर्णी,ए.एम.गर्गेजी.एन.खान व यावल तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

येथील बस स्थानकात सरस्वती विद्यामंदिरचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले लिखित” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो “या पथनाट्याचे मतदान जनजागृती पर सादरीकरण करण्यात आले.यामध्ये मतदारांना मतदार नोंदणी पासून ते मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन करून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त मतदान करून वाढवावी यासाठी प्रबोधन करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पथनाट्यमध्ये सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी संचित कोळी महाराज,यश वारके,विनायक बारी व उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी विविध भूमिका साकारत पथनाट्याचे सादरीकरण केले.या पथनाट्यासाठी आगार प्रमुख दिलीप महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले.

Yavalnews:-गट विकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी सुद्धा मतदान जनजागृती साठी नागरिकांना आवाहन केले.आभार डॉ.नरेंद्र महाले यांनी मांडले.कार्यक्रमाच्या प्रसंगी तालुक्यातील सर्व प्रसार माध्यमांच्या पत्रकार बंधूंनी हजेरी लावून या मतदान जनजागृती प्रबोधनामध्ये मोलाचे सहकार्य केले.तर येथील सरस्वती विद्यामंदिर,डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल,इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल,बाल संस्कार विद्या मंदिर या शाळांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here