यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे
Yavalnews:आज रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगोडे ,यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एम.एच.तडवी,
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
यांच्यासह मंडळ अधिकारी सौ. बबीता चौधरी,यावल तलाठी गजानन पाटील यांनी जिजामाता जयंती,स्वामी विवेकानंद जयंती पत्रकारांच्या उपस्थितीत साजरी करून व औचित्य साधूत नुकताच पत्रकार दिन सर्वत्र साजरा झाल्याने यावल व फैजपूर येथील पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव व कौतुक केले.
तसेच ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांना सुद्धा स्थानिक मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या मार्फत सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित सर्व पत्रकारांनी आयोजक तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
यावल येथील तहसीलदार, मोहनमाला नाझीरकर यांनी पत्रकारांचा केला गौरव आणि सन्मान.(Yavalnews)
Yavalnews:या कार्यक्रमांमध्ये यावल फैजपूर येथील तालुका प्रतिनिधी आयुब पटेल शेखर पटेल सुरेश पाटीलअरुण पाटील सुधीर चौधरी रणजीत भालेराव प्रमोद वाणी सुनील गावंडे विकी वानखेडे अशोक तायडे जीवन चौधरी सुधाकर धनगर भूपेंद्र झोपे राजेंद्र तायडे फारुख शेख मिलिंद टोके समीर तडवी संजय शराफ योगेश व सर्व उपस्थित होते