यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
यावल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी
गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड, विस्ताराधिकारी, ग्रामविकास अधिकारी
सरपंच , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी थकीत मालमत्ता कर धारकांवर वसुलीसाठी जप्ती कारवाईस सुरुवात केलेली आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)
या कारवाईचा धसका घेऊन मागील
दोन दिवसात चार लाख 40 हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात या चार ग्रामपंचायती यशस्वी ठरली आहे.
शिरसाळ 155000 , आडगाव 90000, अठरावल 20000, न्हावी प्र या,175000 ,तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये मालमत्ता कर थकीत आहे.थकीत कराची वसूली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर होऊन ती कामे ठप्प होत आहेत.ही बाब गांभीर्याने घेत , यांनी सर्व ग्रामपंचयाय लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना विश्वासात घेत मागील दोन दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसात 4 लाख चाळीस हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे.
Yavalnews:ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता असून त्या मालमत्तांना अजूनही मालमत्ता कर आकारणी केलेली नसल्याने अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर दंडासह मालमत्ता कर आकारणी करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ केली जाईल अशी माहिती गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी दिली आहे.