यावल ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजगी. ( Yavalnews )

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवे चे तिन तेरा वाजले असुन.

यातच एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या रुग्णांशी उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आरोग्य प्रशासनाच्या अशा दुर्लक्षीत कारभारा बद्दल प्रचंड नाराजी नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असुन,

आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी रूग्णांशी निगडीत या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत गरजे आहे . यावल शहर हा आदिवासी क्षेत्रातील तालुक्यातील प्रमुख शहर म्हणुन ओळखले जाते ,

मराठी सॉंग मुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आभिनेञी नितल शितोळेनी (  nitalshitole )

या ठीकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी रूग्णांची मोठी गर्दी असते परन्तु असे असतांना यावल ग्रामीण रुग्णालयाला मागील दोन वर्षापासुन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पदाची चार पदे ही रिक्त असल्याने तातपुरत्या स्वरूपात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांचे अर्धवट उपचार होत आहे.

असुन,दरम्यान भुसावळ येणाऱ्या एक महिला डॉक्टर या रुग्णांशी अत्यंत निंदनीय व उद्धटपणाची वागणुक देत असल्याने रुग्णांमध्ये त्यांच्या कार्यपध्दीतीबद्दल प्रचंड नाराजी रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे .

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Yavalnews:दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी लाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वारंवार आरोग्य शिबीर घेण्याएवजी यावल ग्रामीण रूग्णालयात मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारींची पदे भरल्यास अशा प्रकारे शिबीरांचे प्रसिद्धीसाठी गोंधळ घालण्याची गरज पडणार नाही अशी संत्पत प्रतिक्रिया रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे .

Leave a Comment