तात्काळ खतांचा साठा उपलब्ध करून बोगस बियाणे विक्री करणार्यांवर कारवाई करा” हर्षल पाटील फदाट यांची कृषी अधिकारी यांच्या कडे मागणी.

 

जाफ्राबाद:- सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे . बाजारपेठेत जास्त प्रमाणात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे
पेरणीच्यावेळीच मोठ्या प्रमाणावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने तोंडाशी आलेली पेरणी करायची तरी कशी? असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला आहे
हर्षल पाटील फदाट यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करुन खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे .
खतांचा तुटवडा भासत असल्याने याचा फायदा घेत कृषी सेवा केंद्र चालक शेतकर्यांची लुट करत आहे अशा लुट करणार्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करण्यात यावा.
तालुक्यामध्ये कोणी बोगस बियाणे विक्री करत असेल तर त्यांच्या नजर ठेवून अशा घटना उघडकीस आल्या तर बोगस बियाणे विक्री करणार्यांवर व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी,कृष्णाजी माकोडे , उमेश फदाट, मयुर बोरगावकर, , रविराज जाधव,रवी फदाट ,संदेश फदाट, यांची उपस्थिती होती..
सततचे लॉकडाऊन , वाढलेला उत्पादनाचा खर्च, पडलेल्या शेतीमालाच्या किंमती, व आत्ता पेरणीवेळीच खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे
तात्काळ खतांचा साठा उपलब्ध करून , बोगस बियाणे विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी.
खतांचा तुटवडा भासत असल्याने, कृषी सेवा केंद्र चालक याचा फायदा घेत, शेतकर्यांची लुट करत आहे अशा लुट करणार्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करावा
लवकरच तालुक्यातील शेतकरी बांधवाचे प्रश्न घेऊन राजाचे कृषीमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी चर्चा करणार .
– हर्षल पाटील फदाट

Leave a Comment