पिकविम्या साठी एल्गार संघटनेचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शेतकऱ्यांना पिकविमा विज बिल माफी याच्यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी हजारो अन्याय ग्रस्त शेतकरी एल्गार संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पीक विम्याचे क्लेम फॉर्म घेऊन हजारो शेतकरी कॉटन मार्केट येथे जमले होते तेथून मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा स्थानिक दुर्गा चौकात येऊन धडकला त्या ठिकाणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे क्लेम फॉर्म जमा करण्यात आले जर का शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तर यापुढे मोर्चाची धडक निवेदन देवुन 11 दिवसात मागण्याची पुर्तता न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी प्रशासनास दिला— निर्धारित वेळेत पिक विमा न मिळाल्यास 15 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन- प्रसेनजीत पाटील(खुटं मोर्चा सभेत ऐलान—)जळगाव जामोद 37 पैसे पीक आणेवारी जाहीर झाली असून तालुक्यातील पिक विमा धारक शेतकरी नियमाप्रमाणे पिक विमा मिळण्यास पात्र आहेत, परंतु पीक विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे जर निर्धारित वेळेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर 15 फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर एल्गार संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज चार फेब्रुवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी मोर्च्याच्या सभेत ला संबोधित करताना दिला आहे.रिलायन्स विमा कंपनी ही पात्र लाभार्थ्यांना हक्काचा विमा क्लेम देण्यास टाळाटाळ करत आहे म्हणून आज हा मोर्चा एल्गार संघटनेच्या वतीने प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आपापले ट्रॅक्टर घेऊन जमले होते तसेच अनेक शेतकरी हे हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा हा शहरातील विविध मार्गांनी एसडीओ कार्यालयावर जात असताना स्थानिक दुर्गा चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी एल्गार संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पिक विमा देण्याची तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला समर्थन व्यक्त केले, यावेळी मंचावर प्रसेनजीत पाटिल,प्रशांत डिक्कर,विजय पोहनकार,रमेश बानाईत,आसिफ .राजेंद्र देशमुख,गौतम गवई,परशुराम येऊल, रवि धुळे,संतोष देशमुख,राजू पाटिल अवचार,अनंता वाघ,श्रीकृष्ण जाधव,भागवत अवचार,आशिष वायझोड़े,ईरफान शेट्टी,मुजहिर मौलाना,रोशन देशमुख आदींची उपस्थिती होती

Leave a Comment