बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 27/ 1 /2021रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवशीय आंदोलन उभारून त्यांना बळ देण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले .या दरम्यान त्यांचेकडून दिवसभरामध्य शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या विविध उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अंदाजे 5 वाजेच्या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिल्ली येथील किसान आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर केले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या किसान आंदोलनास मानवता प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला व सदर पत्रामध्ये नमूद केले की .शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमची संघटना शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांना प्रशासना सुद्धा दिला. त्यामुळे दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान बागेच्या आंदोलनास सुध्दा मानवता प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे. मानवता प्रतिष्ठानच्या वतीने दिलेल्या समर्थनपत्रावर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अमिन शेख बुलढाणा .जिल्हा उपाध्यक्ष विशाल गवई. सलीम मोहम्मद शहा अध्यक्ष सुरत जिल्हा गुजरात, .सलीम पठाण बुलढाणा जिल्हा संघटक इत्यादी स्वाक्षरी देऊनऊन आपले जाहीर समर्थन व्यक्त केले आहे.