मोताळा तालुका काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात

 

व उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करा व शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी मोताळा तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1ऑक्टोबर 2020 रोजी तहसीलदार यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती साहेबांना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या तरुणीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे व उत्तर प्रदेश मधील सरकार बरखास्त करण्याचा संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे उत्तर प्रदेश मध्ये 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिच्या बर्र्बर्र्तापुर्वक तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तसेच केरळच्या धर्तीवर पोलीस एन्काऊंटर करणारा अथवा सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची उत्तर लोकशाही देशात पंतप्रधान व संबंधित राज्याचे मुख्यमंत्री देत नाही म्हणून राष्ट्रपती महोदयांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ पीडितांना न्याय मिळवून द्यावा व अत्याचारग्रस्त दलित चळवळीचा जीवनमरणाचा संघर्ष संपल्यानंतर तिच्या निधनाचे वृत्त देखील तिच्या कुटुंबीयांपासून लपवणार्या व तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व कायदा व सुव्यवस्थेची राजरोसपणे होत असलेल्या त्या उत्तर प्रदेशातील सरकार या सर्व गोष्टींमध्ये कमकुवत ठरत असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे यासंदर्भात उत्तर प्रदेशातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार करत व उत्तरप्रदेशात सरकार राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ बरखास्त करीत सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत या तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची कायदेशीर प्रक्रिया फास्ट ट्रॅक वर चालवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे .तसेच मृतकांच्या घरच्या मंडळींचे सांत्वन करण्यासाठी मा राहुलजी गांधी आणि प्रियंका जी गांधी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यांचा सुद्धा निषेध मोताळा तालुका काँग्रेस नोंदवीत आहे आज दिनांक २/१०/२०२० रोजी शेतकरी व कामगार बचाव दिवस विरोधि काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन मोताळा व शहर कॉग्रेस कमिटी चा वतीने करण्यात आले व तहशिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व निवेदन व धरणे आंदोलन देण्यासाठी मा.आ. हर्षवर्धनजी सपकाळ व पक्षनेते मुकत्यारसिंहकाका राजपुत व मोताळा तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्त,नेते मंडळी उपस्थित होते

Leave a Comment