यावल तालुक्यात सर्वत्र विषारीद्रव्याने तयार केलेली पन्नीची व गावटी दारूची सर्रास विक्री : प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यात सर्वत्र अत्यंत विषारीद्रव्य मिश्रण केलेली पन्नीची व गावठी दारूची अवैद्य मार्गाने सर्रास विक्री करण्यात येत असुन या सहज मिळणाऱ्या दारूमुळे अनेक तरुणाचे कुटुंब व आयुष्य उध्वस्त होत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष वेधुन कारवाई करावी अशी मागणी मोठया प्रमाणावर महिला वर्गाकडुन करण्यात येत आहे. यावल शहर व तालुक्यातील विविध गावा मध्ये मोठया प्रमाणावर सार्वजनिक ठीकाणी मानवी जिवनास अत्यंत धोकादायक असे विषारीद्रव्य वापरून तयार केलेली पन्नीची व गावठी दारूची खुल्लेआम विक्री करण्यात येत असुन, अगदी सहज मिळणाऱ्या तिव्र स्वरूपाचा नशा देणाऱ्या या दारूच्या व्यसनाच्या आहारी जावुन अनेक अल्पवयीन शाळकरी मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी होतांना दिसत असुन , सामान्य कुटुंबातील मजुरी करणारे तरुण दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले आहे तर काही तरूण हे व्यसनाधीन होवुन गुन्हेगारीकडे वळत आहे . अत्यंत विषारी अशा पदार्थांनी बनविली जाणारी ही पन्नीची व गावटी दारू कायमची बंद व्हावी या साठी ग्रामीण पातळीवरील महीलांनी अनेक तक्रारी व आंदोलन केले असुन असे असतांना देखील प्रशासनाच्या स्वार्थी व दुर्लक्षित कारभारामुळे या पन्नी व गावटी दारूच्या अवैध विक्रीवर कुणाचे नियंत्रण राहीले नसल्याचे दिसत आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाने व स्थानिक पोलीस प्रशासनाने या अनेक सर्वसामान्य महीलांच्या कुटुंबाशी निगडीत अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष केन्द्रीत करून तात्काळ ही सर्व अवैद्य पन्नी व गावटी दारूची थांबवावी अशी मागणी आहे .

Leave a Comment