सरकार व वीज वितरण कर्मचारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे हाल ? शिवसेना आक्रमक

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा मार्फत मा.उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट यांना निवेदन देण्याचे मुख्य कारण की शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात वीज वितरण कर्मचाऱ्यांचा 72 तासाचा संपाबाबत शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले .

निवेदन देण्याचे कारण असे की, वीज वितरणनाच्या खाजगीकरणाला विरोध करणे खाजगीकरणाद्वारे राज्यात ठाणे, मुलुंड, भांडुप ,नवी मुंबई ,बेलापूर, पनवेल ,तळोजा व उरण या ठिकाणी अदाणी यांच्या खाजगी वीज वितरण कंपनीला सरकारद्वारे काम देणे हा प्रमुख विषय आहे.म्हणून राज्य संपूर्ण वीज वितरण कर्मचारी, अधिकारी, अभियंते ,कंत्राटी कामगार ,व इतर सर्व राज्यातील जवळपास 31 संघटना या 72 तासाच्या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत .वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणताही आर्थिक मागण्या नाहीत. असे दिसून येत आहे.

सदर मागणी फक्त अदानी यांना खाजगी काम वीज वितरण चालवण्यासाठी देण्याचे ठरले या विरोधात आहे. सदर संपामुळे असे लक्षात येते की अखंडित वीज पुरवठा सुरू राहणे शक्य होऊ शकत नाही. वीज वितरण कंपनीचे जवळपास 28 लक्ष ग्राहक या राज्यामध्ये आहेत आणि जवळजवळ 12:5 कोटी जनता या वीज वितरण च्या संपामुळे प्रभावित होऊ शकते. जर वीज खंडित झाली तर त्यांचा परिणाम शेती ,उद्योगधंदे, दवाखाने व इतर सर्व बाबी ज्या विजेच्या वर आधारित आहे .अशा सर्व जनतेला ज्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

उदा. काल सुरू झालेल्या रात्री 12:00 वाजता दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी आंदोलन सुरू झाल्याबरोबर रात्री जोराच्या वाऱ्यासह पाऊस या हिंगणघाट शहरात पडला त्यामुळे ज्ञानेश्वर वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, जुनी वस्ती चे काही भाग, तहसील कार्यालय चा परिसर इत्यादी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती करण्याकरीता कुठलीही कर्मचारी कामावर नाही. तसेच शेतात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील पिके चना ,गहू, सरसो, जवस इत्यादी पाण्या विना राहू शकत नाही .

पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दवाखान्यातील रोगी व्यक्तीला व्हेंटिलेटर व इतर साधनांची आवश्यकता आहे. रोग्याला जगण्याकरीता दवाखान्यात वीज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विजेच्या वर बरीचशी उपकरणे चालतात. या विषयावर सरकार व वीज वितरण कर्मचारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे हाल होऊ शकते. सर्व व्यवस्था कोलमडून जाऊ शकते. या विषयावर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेची बाजू मा. जिल्हाधिकारी यांना शासनाला जागी करावे याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे कळविण्यात याव्या .

अन्यथा शिवसेना जनतेकरीता रस्त्यावर उतरतील! निवेदन देण्याकरीता या तालुक्याचे तालुकाप्रमुख सतीश धोबे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, शहर संघटक मनोज मिसाळ, गजानन काटोले, युवा सेनेचे भूषण कापकर, उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, विभाग प्रमुख रुपेश काटकर, नितीन वैद्य, सचिन मुळे, शंकर झाडे ,शंकर मोहम्मारे ,अनंता गलांडे ,आशिष भांडे ,हिरामण आवारी, नरेश भजभूजे,वसीम शेख ,अतिक मिर्झा, कुमार चव्हाण ,निखिल झिबड,आशिष जयस्वाल, इत्यादी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते *

Leave a Comment