२ दिवसाचा कालावधी लोटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश…
सिंदी(रेल्वे): … दहेगाव_ सिंदी मार्गावरील चिंचोली फाट्यावर घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप करून वापस येणारी बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच ३२ क्यू ४६२० चा चालक गणेश गजानन राहटे याला पल्सर मोटसायकल वरून आलेल्या दोन इसमाने गाडी आडवी केली व मारहाण करून लुटले सदर घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बोलेरो पीकअप चालक गणेश राहटे सिंदी येथील श्री.जी. गॅस एजन्सी मध्ये काम करतो. तो ५८ सिलेंडर ची विक्री करून आपल्या बोलेरो गाडीने दहेगाव वरून पहेलानपूर मार्ग सिंदी ला येत होता. सायंकाळी ६.३० च्या दरम्यान चिंचोली फाट्याजवळ दोन अज्ञात प्लसर मोटरसायकल धारकाने सिलेंडर च्या गाडी समोर आपली मोटरसायकल आडवी केली.
त्यातील एक मागे बसलेला इसम येऊन गणेश चा मोबाईल हिसकावून गाडीच्या खाली फेकला व गणेश ला गाडीतच मारहाण करत गाडीच्या खाली ओढले व त्याच्या खिशात सिलेंडर विक्रीचे असलेले ३१७८० रुपये सदर इसमाने हिसकावून तिथून पळ काढला सदर घटनेची तक्रार गणेश ने दहेगाव (गो) पोलीस स्टेशन ला दिली.
लागलीच पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांनी आरोपी विरुद्ध भा.द.वी. कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत काही वेळातच दहेगाव पोलीस स्टेशन ला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मंकेश्वर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आपल्या टीम सोबत पोहोचले व घटनास्थळा ची पाहणी केली व आरोपी ना लवकरात लवकर पकडन्याच्या आपल्या टीम ला सूचना केल्या परंतु दोन दिवसांचा कालावधी लोटून ही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही हे मात्र विशेष…