हिवाळी परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जीवन चेके यांचे अमरावती कुलगुरूंना निवेदन !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण देशामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण हे राबवले जात आहे बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देणे हे सुद्धा सुरू झालेले आहे ‘कोरोना सदृश्य पूरस्थितीचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णता संपलेला नाही सध्या तरी सर्वच महाविद्यालय हे ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवत आहेत ।शाळा महाविद्यालय वर्षभरापासून बंद आहेत .त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे .हिवाळी परीक्षा तोंडावर आलेली आहे .अशातच अमरावती विद्यापीठाने मार्च महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन चालवले आहे .त्याला फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हा संपर्कप्रमुख जीवन चेके यांनी विरोध दर्शवला आहे यासंबंधी त्यांनी प्र-कुलगुरू अमरावती राजेश जयपुरकर यांना रीतसर निवेदन दिले आहे !तरी अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या याचा सारासार विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हा !संपर्कप्रमुख जीवन चेके यांनी दिला आहे !

Leave a Comment